While Pune has topped the national Ease of living index, neighbouring Pimpri-Chinchwad bagged the 69th spot in the list of the most liveable cities in the country. Residents, however, say that the ranking does not justify the ground situation of the industrial township.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 17 August 2018
दोन वर्षे इंटरनेटसाठी 2 कोटी 11 लाख
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कार्यालयांसाठी इंटरनेट बॅण्ड विड्थ व एमपीएलएलद्वारे इंटरनेट सुविधा पुरवली जाणार आहे. ही सुविधा रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडकडून 2 वर्षांसाठी घेण्यात येणार असून, त्यासाठी 2 कोटी 10 लाख 85 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
संकटसमयी पोलीस मदतीसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जाहीर
पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. आता पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पोलिसांच्या कोणत्याही मदतीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयाऐवजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी संपर्क करावा लागणार आहे.
‘अदृश्य पोलिसिंग’वर आयुक्तांचा भर
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात मनुष्यबळ कमी आहे. त्यावर उपाय म्हणून आम्ही अदृश्य पोलिसिंग करण्यावर भर देणार असल्याचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले. पोलिस समोर नसले, तरी कारवाई होईल; त्यासाठी नागरिकांनी समाजात सुरू असलेल्या गैरप्रकाराचे फोटो ‘व्हॉटसअॅप’ करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पत्रकारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर, यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पोलीसच मदतीसाठी नागरिकापर्यंत पोहोचणार; पोलीस आयुक्त पद्मनाभन यांचा दावा
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांचा पत्रकारांच्या हस्ते सन्मान
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्यामुळे या शहराला आवश्यक तो पोलीस स्टाफ उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी मदतीसाठी पोलिसांपर्यंत जाण्यापेक्षा पोलीसच नागरिकांच्या मदतीला धावून जातील. बटन दाबा, पोलीस हजर अशा पद्धतीने नव्या पोलीस आयुक्तालयामार्फत कामकाज केले जाणार आहे. असा विश्वास पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्यामुळे या शहराला आवश्यक तो पोलीस स्टाफ उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी मदतीसाठी पोलिसांपर्यंत जाण्यापेक्षा पोलीसच नागरिकांच्या मदतीला धावून जातील. बटन दाबा, पोलीस हजर अशा पद्धतीने नव्या पोलीस आयुक्तालयामार्फत कामकाज केले जाणार आहे. असा विश्वास पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केला.
पाऊण कोटी खर्चूनही सीमाभिंतीला घरघर
वाल्हेकरवाडी : आकुर्डी प्राधिकारणातील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या सीमाभिंतीच्या डागडुजी व नुतनीकरण करण्यासाठी सन 2015 च्या अखेरीस महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाऊण कोटीच्या निविदेकरिता मंजुरी देण्यात आली आणि 2017 मध्ये सीमाभिंतीचे काम पूर्ण करण्यात आले. त्या काळात काही जागरूक नागरिकांकडून सदरच्या कामाकरिता आक्षेपही घेण्यात आला. कारण दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होणार आहे हे लक्षात येत होते. जुनी सीमाभिंतही अनेक वर्षांपासून सुस्थितीत उभी होती. दगडी बांधकाम चांगल्या स्थितीत होते. परंतु टक्केवारीचे राजकारण आणि महापालिका प्रशासनाची भ्रष्टाचारी वृत्ती यामुळे सेक्टर 28 मधील संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या मजबूत दगडी भिंतीला नजर लागली.
चाकणमध्ये कंपनी कामांसाठी स्थानिक तरूणांमध्ये स्पर्धा
काम देण्यासाठी उद्योजकांना दिल्या जातात धमक्या
चाकण : कारखाना उभारणीसाठी लागणार्या मुरूम भरावासह अन्य कामे देण्यासाठी स्थानिक तरूणांमध्ये स्धर्पा सुरू आहेत. यासाठी स्थानिक युवक उद्योजकांना त्रास देत आहेत. या स्पर्धेमुळे अनेकदा भांडणाचे प्रसंग उद्भवतात. याचा फटका कारखानदारांना बसतो आहे. फुकटचा मुरूम उचलणे आणि त्यातून लाखोंची माया जमा करणार्या दोन गटांमध्ये वारंवार वाद होत आहेत. या सर्वांना संभाळणे उद्योजकांसाठी मोठी डोकेदुखीचा विषय होत आहे. आतापर्यंत चाकण परिसरामध्ये एमआयडीसीचे 4 टप्पे पूर्ण झाले आहेत. आता पाचवा टप्पा होणार आहे. नागरिकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने नव्याने कारखाने उभे रहात आहेत. मात्र सध्या येथील उद्योजकांना धमकी देण्याचे प्रकार उघड होत आहेत.
‘अ’ प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास प्रथम प्राधान्य देणार – महापौर राहुल जाधव
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ प्रभागात इतर प्रभागाच्या तुलनेत अधिक झोपडपट्ट्यांचा भाग आहे. या प्रभागातील पाणी, कचरा, आरोग्याविषयी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असून प्रथम प्राधान्य देणार असल्याची, ग्वाही महापौर राहुल जाधव यांनी दिली.
उद्योजकांना शास्ती कर आकारु नका
पिंपरी – शास्ती कर पुर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामधील त्रुटी लवकरच दुरुस्त केल्या जाणार आहेत. त्यामुळे सरकारचा निर्णय येईपर्यंत भोसरी, एमआयडीसीतील लघु उद्योजकांकडून शास्ती कर व दंडाची रक्कम आकारु नका, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्तांना केली. तसेच उद्योजकांनी सुद्धा दंड व शास्तीकर भरु नये, असे आवाहनही त्यांनी केले.
शास्ती कराचा चेंडू महापालिकेच्या “कोर्टात’
पिंपरी – महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांकडून आकारला जाणारा शास्ती कर ठरविण्याचा अधिकार पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या शहरातील आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळाला आहे.
#PuneTraffic पुणेकर आणखी पाच वर्षे वाहतूक कोंडीतच
स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल टाकलेल्या पुण्यात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. परिणामी शहराला वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागतोय, असे ३५ टक्क्यांहून अधिक पुणेकरांचे म्हणणे आहे. ही समस्या सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत ११ प्रकल्पांची घोषणा झाली; परंतु यापैकी मेट्रोच्या दोन मार्गांचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. बाकीचे प्रकल्प कागदोपत्रीच. त्यांच्या पूर्ततेचा कालावधीही अजून तीन ते पाच वर्षे आहे. हे प्रकल्प पूर्ण होतील अन् वाहतुकीच्या जीवघेण्या कोंडीतून सुटका होईल, अशी अपेक्षा पुणेकर बाळगून आहेत; पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाला मात्र त्याबद्दल खेद ना खंत...
Defence finance management academy to come up in Sangvi
A National Academy of Defence Financial Management (NADFM), ..
‘पंतप्रधान आवास’ गृहप्रकल्पात दीडशे कोटींचा भ्रष्टाचार
पालिकेतर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत चर्होली, रावेत व बोर्हाडेवाडी येथील गृहप्रकल्प बांधकामाचे दर दुप्पट आहेत. यात दीडशे कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. गरिबांच्या घरांच्या नावाखाली स्वत:ची घरे भरण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या निविदा रद्द कराव्यात, अशी मागणी सेनेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तणाव मुक्ती कार्यक्रम; शिक्षण समितीचा निर्णय
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ताण-तणाव मुक्तीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसा निर्णय महापालिका शिक्षण समितीच्या गुरुवारी (दि.१६) बैठकीत घेण्यात आला.
देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार; आमदार महेश लांडगे यांची माहिती
पिंपरी (Pclive7.com):- देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला वाजपेयी यांचे नाव दिल्यास त्यांना ख-या अर्थाने आदरांजली असेल, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरातून वाजपेयी यांच्या ‘अटल’ आठवणींना उजाळा
माजी पंतप्रधान वाजपेयींना आंदराजली
निर्भीडसत्ता न्यूज –
महामार्ग जोडल्याने देशाची आर्थिक स्थिती भक्कम : महापौर राहुल जाधव
महामार्ग जोडल्याने देशाची आर्थिक स्थिती भक्कम : महापौर राहुल जाधव
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे केवळ भाजपचे नाही तर, संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे. वाजपेयींनी देशात प्रमुख महामार्ग बनवून ती जोडण्याची योजना राबविल्याने वाहतुक सुरळीत होऊन अनेक मोठी शहर एकमेकांना जोडली गेली आहेत. परिणामी बाजारपेठा जोडल्या जाऊन, देशातील आर्थिक स्थिती बळकट होत गेली. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पण करीत आहे, असे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.
रोहन कुंभार यांना ‘आयर्न मॅन’ पदक
पिंपरी - जगातील सर्वांत खडतर आणि आव्हानात्मक म्हणून ओळखली जाणारी जर्मनी येथील २२८ किलोमीटर अंतराची ‘आयर्न मॅन’ शर्यत निगडी प्राधिकरण येथील धावपटू रोहन कुंभार यांनी १३ तास ५ मिनिटांत पूर्ण केली. या स्पर्धेत प्रथमच सहभागी होताना कुंभार हे ‘आयर्न मॅन’ पदकाचे मानकरी ठरले. मलेशिया येथील २०२० मधील नियोजित ‘आयर्न मॅन’ शर्यतदेखील पूर्ण करण्याचे लक्ष्य कुंभार यांनी ठेवले आहे.
देशप्रेमाचा जागर
पिंपरी – चौकाचौकात ध्वजारोहण…, देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम…, साहित्य वाटप, वृक्षारोपणासारखे सामाजिक उपक्रम… अशा माध्यमातून पिंपरी-चिंचवड कामगारनगरीने 72 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. शहरभर देशभक्तीचे वारे वाहत होते. शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळाल्याने पिंपरी-चिंचवडकरांसाठी स्वातंत्र्य दिन खास ठरला. दिमाखदार सोहळ्यात निगडीतील भक्ती-शक्ती चौकात असलेला देशातील सर्वात मोठा तिरंगा फडकवण्यात आला. हजारो शहरवासियांनी आवर्जून याठिकाणी हजेरी लावली.
बजरंग दलाकडून पर्यावरण जागृती पुरस्कार
वाकड – वाकड व आसपासच्या परिसरात सामाजिक संघटना व वाकड पोलीस ठाण्यात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बजरंग दल दत्तनगर शाखेच्या वतीने एकता मित्र मंडळ चौकामध्ये झेंडावंदन करण्यात आले. दत्तनगर परिसरातील माजी सैनिकांना यावेळी खास निमंत्रित करण्यात आले होते. ध्वजवंदन वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पाटील व पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या हस्ते करण्यात आले. बजरंग दल शाखा दत्तनगर यांच्याकडून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत यावर्षी पर्यावरण जागृती पुरस्कार-2018 थेरगाव सोशल फाऊंडेशनला देण्यात आला. पर्यावरण संवर्धन तसेच शहर विद्रुपीकरण रोखण्यासाठी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बजरंग दल शाखेकडून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे स्वतंत्रता दिवस उत्साहात
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या वतीने जयनारायण मंगल स्मृतिवन मोशी येथे ७२ वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्रदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे विशेष मुलांना वह्यांचे वाटप
स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे निगडी प्राधिकरण येथील सुहृद मंडळ संचलित मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
घोरावडेश्वरावर भाविकांची गर्दी
देहूरोड : शेलारवाडी येथील घोरावडेश्वर डोंगरावरील लेणीतील श्री घोरावडेश्वराच्या दर्शनासाठी आज भाविकांनी रांग लावली होती. दिवसभरात सुमारे तीन हजार भाविकांनी दर्शन घेतले. पावसामुळे डोंगेावर जाणार्या पायवाटा अतिशय निसरड्या झाल्या होत्या. पण भाविकांचा ओघ कायम होता. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यामुळे आज पहाटे घोरावडेश्वर मंदिरात पारंपारिक पध्दतीने महापूजा, अभिषेक घालण्यात आला.
Subscribe to:
Posts (Atom)