Monday, 10 December 2018

महापालिकेच्या प्रशासन गतिमान कारभारासाठी अधिकाऱ्यांना पदोन्नती

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य अग्नीशामक अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, यासह स्थापत्य विभागातील काही कार्यकारी अभियंता पदाच्या जागा रिक्त असताना त्या जागेवर आयुक्तांना पदोन्नती समितीची बैठक घेवून सेवाज्येष्ठतेनूसार त्या-त्या पात्र अधिका-यांची वर्णी लावणे आवश्यक आहे. परंतू, त्या जागावर अधिका-यांची निवड करण्यास आयुक्तांसह प्रशासन विभागास वेळ मिळेना झाला आहे. दोन वर्षे होवूनही आकृती बंध( सेवा प्रवेश नियमावली) शासनाने अद्याप मंजूरी दिली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा कारभार गतीमान होवून नागरिकांची कामे तात्काळ व्हावीत, याकरिता अतिरिक्त पदभार असलेल्या पात्र अधिका-यांना पदोन्नती देण्यास प्राधान्य दिले असून त्याला विधी समितीने आज शुक्रवारी (दि ७) झालेल्या सभेत मान्यता दिली.

प्राधिकरणातील मोकळ्या भूखंडास सीमाभिंत घालण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड नवननगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत. त्याची निगा न राखल्याने तेथे खड्डे पडून दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी दुर्घटना घडण्याचा शक्यता आहे. तसेच, शहर विद्रुप होत आहे. हे रोखण्यासाठी सदर मोकळ्या भूखंडांना सीमाभिंत घालावी, अशी मागणी ‘क’ क्षेत्रीय समिती अध्यक्षा नम्रता लोंढे यांनी केली आहे.

महापौर, पक्षनेत्यांचे हस्ते नाट्य व गायन स्पर्धेतील कलाकारांचा सन्मान

सुप्रियाज डान्स अकॅडमी, पिंपरी चिंचवड मधील स्पर्धकांनी दुबई येथील मदिनाथ थिएटर झुमिराह येथे झालेल्या अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, ऑफिशियल पार्टनर युनिस्को आयोजित ग्लोबल कल्चरल ऑलिम्पियाड २०१८ नृत्य नाट्य व गायन स्पर्धेत नृत्य विभागात सुवर्ण, रौप्य , कांस्य अशी एकूण १४ पदके जिंकल्याबद्दल त्यांचा महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘रोजगार व व्यवसाय समूह ग्रुप योजनेद्वारे’ मिळणार हजारो बेरोजगारांना रोजगार!

पिंपरी (दि. ७ डिसें.) :-  शासनाने आधुनिक कारणासाठी मोठ्या उद्योगांना स्वयंचलित मशिनरी आयात करण्याची परवानगी दिली आणि उद्योगात वाढणाऱ्या रोजगार निर्मितीला अडथळे निर्माण केले. मोठ्या उद्योगात कामगार कपात, ठेकेदारी तत्वावर कामगार स्वीकारण्यास परवानगी दिल्याने कामगारांच्या बेरोजगारीत वाढ झालेली आहे. उद्योगातील रोजगार कमी झाला आहे. शासन हात झटकण्याचे काम करीत आहे. पुणे परिसरात सर्वात  जास्त महाविद्यालये आहेत. त्यातून लाखो मुले पदव्या घेऊन बाहेर पडतात. परंतु, या तरुण-तरुणींना रोजगारासाठी पुणे शहराच्या बाहेर जावे लागते. या परिस्थितीत लघु उद्योजकांसाठी काम करणारी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन ही संघटना पुढे आली आहे.

अमित गोरखे यांच्या प्रयत्नातून ३८ मागासवर्गीय विध्यार्थ्यांना मिळाले प्रतिष्ठित इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश

पिंपरी (दि. ७ डिसें.) :-  उद्योजक व युवा नेतृत्व अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील मागासवर्गीय तसेच आर्थिकरित्या दुर्बल घटकातील २८ विद्यार्थ्यांना आरटीईच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या उचभ्रू शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. समाजातील या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अमित गोरखे यांचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.

खासदार बारणे लिखित ‘आपला वैभवशाली मावळ लोकसभा मतदार संघ’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

एमपीसी न्यूज – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघाची संपूर्ण माहिती असलेले ‘आपला वैभवशाली मावळ लोकसभा मतदार संघ’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन उद्या (शनिवारी) शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे. आकुर्डी येथील हॉटेल ग्रॅन्ड अॅक्झाटिका येथे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. संत […]

गृहनिर्माण संस्थांचे लेखापरीक्षणाकडे दुर्लक्ष

जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालय क्रमांक तीन अंतर्गत भोसरी, चिखली, निगडी, संत तुकारामनगर यासह पिंपरी-चिंचवड शहरातील काही भाग येतो.

प्रशासकाच्या अंकुशाविना शाळा

पिंपरी - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना प्रवेश नाकारल्यास कारवाई करण्यासाठी शाळांवर प्रशासक नेमण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, अद्याप मनुष्यबळाअभावी बहुतांशी शाळांवर प्रशासकच नेमले नाहीत.

‘अभय योजने’त सहभागी न होणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा आॅनलाइन – महापालिकेच्या वतीने ‘अभय योजना’ राबविण्यात आली होती. ही योजना अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी असून त्यात सव्वा पाच हजार नळजोडीसाठी अर्ज देखील करण्यात आले. या वरून या आधी सव्वा पाच हजार अनधिकृत नळ जोडले गेले होते. ही अभय योजना राबवूनही अर्ज न करणाऱ्या २१५ जणाचे नळजोड तोडले आहेत.