पालकमंत्री गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दापोडी येथे हॅरिस ब्रिजजवळ होणाऱ्या वाहतूककोंडीची मंगळवारी (दि. २९) पाहणी केली.
त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांचे आयुक्त व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.
त्यात दापोडी ते खडकीपर्यंत होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी या भागात उड्डाणपूल की भुयारी मार्ग उभारता येईल, यावर चर्चा करण्यात आली. त्याबाबत संयुक्तिक अभ्यास करून आठवडाभरात अहवाल देण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.