Monday, 25 November 2013

रिक्षाचालकांना शिस्त कधी?

पिंपरी : वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून वाहन चालविण्याचा ‘परवाना’च जणू रिक्षाचालकांना दिलाय की काय, असेच चित्र रविवारी केलेल्या पाहणीत दिसले. रस्त्यातच बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करणो, सर्रासपणे विरुद्ध दिशेने घुसविणे, प्रवाशांशी हुज्जत घालणो हे चित्र शहरातील रस्त्यांवर नित्याचे झाले आहे. झटकन व सोईचा प्रवास व्हावा यासाठी अनेक प्रवासी तीन आसनी रिक्षांचा वापर करतात. मात्र, अनेकदा याच रिक्षामुळे प्रवाशांना त्रासही सहन करावा लागत असल्याचे चित्रही पाहणीत दिसले. 

PCMC GB approves hike in corporators’ honorarium

Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) General Body (GB) has approved a three-fold hike in the honorarium of the corporators.

Ministry sets Feb 1 deadline for linking Aadhaar cards with banks

Vijay Bhave, Chairman, Maharashtra Gas Distributors Association, said they have not issued any notification to this effect.

पिंपरीत ‘घरकुल’ च्या प्रश्नावरून सत्ताधारी कोंडीत

घरकुलच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली आहे.

दुर्लक्षामुळे विकासाला खीळ

भोसरी : ‘लोकमत’ने गेल्या चार दिवसांत ‘समस्यांची आळंदी’ या वृत्तमालिकेद्वारे आळंदीकरांच्या व्यथा आणि वेदनांना परखडपणे वाचा फोडली आहे. कोणत्याही कामाचा ठेका दिला की त्यातून अवाच्या सव्वा टक्केवारीची केली जाणारी मागणी आणि सर्वांचेच आळंदीकडे असणारे दुर्लक्ष आळंदीच्या विकासाला खीळ घालत आहे. या पालिकेत मोठा आर्थिक घोटाळा आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर पुरेशा मनुष्यबळाअभावी पायभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आळंदीचा चेहरामोहरा बदण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

आयटीपार्कच्या ५व्या टप्प्यासाठी प्रयत्न

माहिती तंत्रज्ञानासाठी जगभरात ख्याती मिळविलेली हिंजवडी राजीव गांधी माहिती तंत्रज्ञाननगरी दिवसेंदिवस विस्तारत आहे. चौथ्या अन् पाचवा टप्पा प्रस्तावित आहे. त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हिंजवडी आयटी पार्कला प्रतिदिन २८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार आहे, असे सांगत होते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंते सुधीर नागे यांच्याशी साधलेला संवाद

समांतर पुलाने सुटू शकते समस्या

वाकड : ‘वाकड पूल अडचणच’ या शीर्षकाखाली लोकमतने दिनांक २२ नोव्हेंबरच्या अंकात सर्वेक्षणात्मक वृत्त प्रसिद्ध केले होते. या सर्वेक्षणामध्ये पूल चुकीचा कसा आहे. औद्योगिक विकास महामंडळाने दूरदृष्टिकोन न ठेवल्याने आता वाढलेल्या वाहनाच्या अन् वर्दर्ळीच्या तुलनेत पूल अपुरा पडल्याने कसा वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे, याची माहिती दिली होती. त्याच्या अनुषंगाने आयटीतील अभियंते, अधिकारी, कामगार येथील स्थानिक रहिवाशी अणि चालकांच्या काही प्रतिक्रिया. 

लैंगिक छळ थांबविण्यासाठी समित्यांची गरज

पिंपरी : महिलांचा लैंगिक छळ थांबविण्यासाठी सरकारी आणि निमसरकारी संस्थांप्रमाणे खासगी संस्थांनी विशाखा मार्गदर्शक सूचनांप्रमाणे समित्या स्थापन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी केले. 

विकासकामांवर सात महिन्यांत केवळ 23 कोटी खर्च

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्‍टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत विकासकामांवर केवळ 23 कोटी 16 लाख 57 हजार रुपयांचा खर्च केला आहे.