MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 30 April 2020
आयटी, बीपीओ कंपनीच्या कर्मचार्यांना ‘वर्क फ्रॉम होम’साठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ- रविशंकर प्रसाद
एमपीसी न्यूज – माहिती तंत्रज्ञान (आयटी), बीपीओ कंपनी कर्मचार्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. विविध राज्यांच्या आयटी क्षेत्रातील मंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. सुरवातीला देण्यात आलेली ही मुदत या महिन्याच्या 30 तारखेला समाप्त होत होती. केंद्रीय कायदे व न्याय, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि […]
रेशनिंगविषयी मार्गदर्शन आणि तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर
एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रसार व त्यावरील नियंत्रण या कालावधीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत हेल्पलाईन कक्षाकडे शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याच्याअनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन व त्याअनुषंगीक तक्रारी यांचे करीता नागरीकांना जास्तीत जास्त सेवा देण्याच्या अनुषंगाने संपुर्ण राज्याकरीता खालील क्रमांकावर (सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 पर्यंत) संपर्क करण्याचे आवाहन या प्रसिद्ध पत्रकाव्दारे करण्यात येत आहे. नागरीकांनी […]
गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, ओटास्कीममध्ये तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन
एमपीसी न्यूज – रूपीनगर परिसरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने प्रभाग क्रमांक 13 मधील निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, ओटास्कीममध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 1 ते रविवार दि. 3 मे दरम्यान येथे कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक नागरिक आणि नगरसेवकांनी घेतला आहे. या बंद मध्ये फक्त रूग्णालये, औषध विक्रीची दुकाने खुली राहणार […]
पुढील 3 ते 6 महिने ‘करोना’चा मुक्काम
मनपा आयुक्तांनी व्यक्त केली भीती : जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन
‘करोनाबाबत 80 टक्के लोक जागरूक’
सात राज्यांतील नागरिकांचा प्रतिसाद
डॉ.डी.वाय.पाटील फार्मसी इन्स्टिट्यूटच्या ऑनलाइन सर्वेक्षणाचा निष्कर्ष
डॉ.डी.वाय.पाटील फार्मसी इन्स्टिट्यूटच्या ऑनलाइन सर्वेक्षणाचा निष्कर्ष
“करोना’ रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही – डॉ. वाबळे
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – “करोना’च्या चाचणीसाठी चार हजारांहून अधिक खर्च येत असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व उपचार मोफत करण्यात येत असून रुग्णांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नसल्याचे “वायसीएम’चे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी स्पष्ट केले आहे
कासारवाडीतील मातृभूमी प्रतिष्ठान व ढोल ताशा पथकाचे प्रेरणादायी कार्य; गेल्या एक महिन्यापासून गरजूंना अविरत अन्नदान..!
पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या या महासंकटात अनेक दानशूर व्यक्तींनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. कासारवाडी मधील मातृभूमी प्रतिष्ठान व मातृभूमी ढोल ताशा पथकाने देखील प्रेरणादायी कार्य करत समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. गेल्या एक महिन्यापासून अविरतपणे गरजूंना अन्नदान सेवा त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टकडून पीएम केअर, मुख्यमंत्री रिलीफ फंडास प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत
एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर संस्थांनी पुढे येऊन सरकारला आर्थिक मदत करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने पंतप्रधानांच्या ‘पीएम केअर’ आणि मुख्यमंत्री यांच्या ‘मुख्यमंत्री रिलीफ फंडास’ प्रत्येकी दहा लाख रुपयांचा मदत निधी […]
पुण्यातील “करोना’चे ओझे “वायसीएम’च्या खांद्यावर
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वायसीएम रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टर तणावात असतानाच आता पुण्यातील संशयित रुग्णांचे ओझेही वाढू लागले आहे. पुण्यातील महापालिका व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी असल्याने पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रुग्णांना वायसीएममध्ये पाठविले जात आहे. या प्रकारामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत वरिष्ठही काहीच बोलत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
पुण्यातील पेशंटना पिंपरी-चिंचवडमध्ये आणण्यास ‘या’ कारणास्तव विरोध : आमदार महेश लांडगे
– प्रशासनाने पिंपरी-चिंचवड मनपा प्रशासनाचा विचार करावा!
– आगामी काळात रुग्णसंख्या वाढल्यास आम्ही काय करावे?
– आगामी काळात रुग्णसंख्या वाढल्यास आम्ही काय करावे?
दिलासादायक बातमी; लॉकडॉऊनमध्ये पीएफ फडांतून काढू शकता ७५ टक्के रक्कम!
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीएफ कार्यालयाने विशेष बाब म्हणून पीएफ फंडामधील 75 टक्क्यांपर्यत रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार देशभरातून 12 लाख 91 हजार सदस्यांनी पीएफ मधील 4 हजार 684 कोटी रुपयांची रक्कम आतापर्यंत काढली आहे. त्यापैकी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून 7 लाख 40 हजार सदस्यांनी 2 हजार 367 कोटी रक्कम काढली आहे.
केंद्राचा मोठा निर्णय : महाराष्ट्रात अडकलेल्या मजूर, पर्यटकांचा प्रश्न सुटला
पुणे : देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले स्थलांतरीत मजूरांची रस्त्यांमार्गे वाहतूक करण्यास केंद्र सरकारने बुधवारी परवानगी दिली. त्यामुळे राज्यात अडकलेल्या परराज्यातील आणि इतर जिल्ह्यांतील किमान 40 लाख मजुरांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
Big Breaking : विद्यापीठाच्या परीक्षांची तारीख ठरली; 'यूजीसीने नवी नियमावली केली जाहीर!
पुणे : कोरोना व्हायरसचे संकट आणि लाॅकडाऊनमुळे देशभरातील विद्यापीठाच्या परीक्षा खोळंबल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परीक्षा घेण्यासाठी व पुढील वर्षाच्या प्रवेशासह वर्ग सुरू करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. विद्यापीठांना १ जुलैपासून परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे.
पंखा, फ्रीज, गॅस बर्नर खराब झालाय? लॉकडाऊनमध्ये घरबसल्या 'अशी' करा होम अप्लायन्सची दुरुस्ती!
पुणे : लॉकडाऊन दरम्यान घरातील उपकरणे बंद पडल्यास ग्राहकांकडे त्यांच्या दुरुस्तीची सोय उपलब्ध नाही आणि यामुळेच त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पीएमपीच्या बस आता मिळणार भाडेतत्त्वावर
पुणे - लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पीएमपीने बस भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी कंपन्यांना या बस उपलब्ध होणार आहेत.
लॉकडाऊनमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची छुप्या मार्गाने विक्री
पिंपरी – करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यासह तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर निर्बंध घातले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. असे असताना तंबाखूजन्य पदार्थांची छुप्या मार्गाने विक्री सुरू असून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र शहरात विविध ठिकाणी पहावयास मिळत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)