पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका प्रशासनाकडून शहराच्या अंतर्गत भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पुणे-मुंबई महामार्ग तसेच प्राधिकरण भागातील रस्ते चकचकीत असले तरी अंतर्गत रस्त्यांची धुळधाण झाली आहे. समाविष्ट गावे, औद्योगिक परिसरातील अनेक रस्त्यांवर साधी खडी-मुरुम पडलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांवरुन प्रवास करताना वाहनांचे
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 31 May 2013
महापालिकेमार्फत 'बीव्हीजी'ला 7 ...
महापालिकेमार्फत 'बीव्हीजी'ला 7 ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेने गेल्या सात वर्षात बीव्हीजी या एकमेव ठेकेदाराला साफसफाईपासून ते विविध प्रकल्प चालविण्याची तब्बल 53 कोटी 51 लाख रुपये खर्चाची कामे दिल्याचे मनसेने माहिती अधिकारांतर्गत मिळविलेल्या माहितीमध्ये उघड झाले आहे. या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे.
चिंचवडमध्ये शुक्रवारी जनजागृती रॅली
चिंचवडमध्ये शुक्रवारी जनजागृती रॅली:
शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस नागरिक मित्र मंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मे महिन्यात जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाचा समारोप शुक्रवारी (दि.31) जनजागृती रॅलीने होणार आहे.
दोन इराणी सोनसाखळी चोर जेरबंद
दोन इराणी सोनसाखळी चोर जेरबंद:
शहरात महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावणा-या दोन इराणी चोरांना जेरबंद करून त्यांच्याकडून सुमारे 25 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 14 गुन्ह्यासह चिंचवड, सांगवी, एमआयडीसी, निगडी या भागातील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांच्या चेन स्नॅचिग विरोधी पथकाला यश आले आहे.
फुलेनगर झोपडपट्टी हटविण्यामागे ...
फुलेनगर झोपडपट्टी हटविण्यामागे ...:
वायसीएम रुग्णालयामागे एमआयडीसीच्या जागेतील महात्मा फुलेनगर झोपडपट्टी हटविण्यामागे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. एका बांधकाम व्यावसायिकासाठी स्थानिक नगरसेवक आणि राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या एका महिला अधिका-याने संगनमताने या कारवाईसाठी दबाव आणल्याची कबुली एमआयडीसीच्या अधिका-याने फुलेनगरवासियांच्या मोर्चा समोर जाहीरपणे दिल्याने या प्रकरणाला
वाहतुकीचा खोळंबा करणा-या मंगल ...
वाहतुकीचा खोळंबा करणा-या मंगल ...:
पार्किग व्यवस्था नसल्याने वाहतुकीचा खोळंबा करणा-या शहरातील पाच मंगल कार्यालयांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सात मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुष्काळगस्तांसाठी टाटा मोटर्सकडून ...
दुष्काळगस्तांसाठी टाटा मोटर्सकडून ...:
महाराष्ट्रातील यंदाच्या कोरड्या दुष्काळाने मानवी जीवनावर भीषण आघात केला आहे. अक्षरश: येथील शेतक-यांचे तोंडचे पाणी पळवले, प्राण्यांना पाणी नाही, चाराही नाही असा प्रश्न सर्वांपुढेच उभा राहिला आहे. ह्या दुष्काळावर मात करण्यासाठी टाटा मोटर्सने व त्यांच्या इतर संलग्न संस्थांमार्फत 56 लाख 42 हजार रुपयांचा निधी
Read more...पिंपरी-चिंचवडचा निकाल ७६.२७ टक्के
पिंपरी-चिंचवडचा निकाल ७६.२७ टक्के: बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवडचा निकाल ७६.२७ टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींची सरशी आहे. यंदा शहरातील पाच कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.
पिंपरी पालिकेत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी पुन्हा शोध सुरू
पिंपरी पालिकेत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी पुन्हा शोध सुरू: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम गायकवाड गुरुवारी निवृत्त झाले असून त्यांच्या रिक्त जागेसाठी पुन्हा नव्या अधिकाऱ्याचा शोध सुरू झाला आहे
पिंपरीतील एमआयडीसी भूखंडासाठी संगनमताने ‘अर्थकारण’?
पिंपरीतील एमआयडीसी भूखंडासाठी संगनमताने ‘अर्थकारण’?: एमआयडीसीचा पिंपरीतील १०० गुंठय़ांचा भूखंड पोलीस बंदोबस्तात तातडीने खाली करून देण्याची तत्परता सर्व लाभार्थीनी संगनमताने केली .
सफाई कामगार ‘सर्व्हे’साठी समिती
सफाई कामगार ‘सर्व्हे’साठी समिती: - पिंपरीत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
पिंपरी: मैलासफाईचे काम करणार्या कामगारांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ८ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. महापालिका हद्दीत हे सर्वेक्षणाचे काम केले जाणार असल्याने पिंपरीत प्रशिक्षणवर्ग घेण्यात आला.

सिटी प्राईड शाळेला ई-महाराष्ट्र पुरस्कार
सिटी प्राईड शाळेला ई-महाराष्ट्र पुरस्कार: पिंपरी : महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा ई-महाराष्ट्र पुरस्कार निगडी येथील सिटी प्राईड शाळेला प्राप्त झाला आहे. शाळेमध्ये उत्कृष्ट माहिती आणि तंत्नज्ञानाचा वापर करणार्या शाळेला राज्य शासनाकडून हा पुरस्कार दिला जातो.
शासनाच्या माहिती व तंत्नज्ञान विभागाचे सचिव राजेश आगरवाल आणि हरीयाना सरकारच्या माहिती व तंत्नज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव विवेक अत्ने यांच्या हस्ते मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. त्यावेळी सिटी प्राईड शाळेच्या संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ई-शाळा उपक्रमामध्ये सिटी प्राईड शाळेने सहभाग घेतला होता. त्यासाठी शाळेमध्ये माहिती तंत्नज्ञानाचा वापर करून शाळेच्या कार्यप्रणालीत बदल घडवून आणल्याबद्दल शाळेला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सेट टॉप बॉक्स न बसविल्याने नोटीस
सेट टॉप बॉक्स न बसविल्याने नोटीस: पुणे : सेट टॉप-बॉक्सशिवाय केबल चालविणार्या पिंपरी-चिंचवड परिसरातील एका केबलचालकाला करमणूक कर विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापुढील काळात सेटटॉप-बॉक्स शिवाय केबल चालविणा-यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे करमणूक कर विभागाच्या तहसीलदार मोहिनी चव्हाण यांनी सांगितले.
चव्हाण म्हणाल्या, की सेटटॉप बॉक्सशिवाय केबल चालविता येणार नाही, असे आदेश सर्व केबलचालकांना देण्यात आले होते. त्यानुसार काही केबलचालकांनी आपल्या ग्राहकांना सेटटॉप बॉक्स बसवून दिले. परंतु काही केबलचालक आदेशाचे पालन न करताच व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे काही ठिकाणी धाडी टाकून तपासणी करण्यात आली. नवी सांगवी भागातील एका केबलचालकाला पकडण्यात आले. आदेशाचे पालन न करणार्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. केबलचालकाकडे प्रत्येक ग्राहकाने कस्टमर रेफर्स फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. जे ग्राहक हा फॉर्म भरून देणार नाहीत, त्यांना केबलवरील कोणतेही चॅनल दिसणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

सरसकट कारवाई असेल तर सहकार्य!
सरसकट कारवाई असेल तर सहकार्य!: - रहाटणीतील रस्ता बाधितांची भूमिका
पिंपरी : रहाटणी सर्व्हे क्रमांक ५९ मधील विकास आराखड्यातील रस्त्यात बाधित होणार्या मिळकतींवर कारवाई करण्यासंबंधीची नोटीस ड प्रभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी रहिवाशांना दिली आहे. ही कारवाई करीत असताना विशिष्ट लोकांना ‘टार्गेट’ न करता सरसकट कारवाई करावी. मिळकती स्वत:हून हटवून सहकार्य करू, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.

जूनअखेर घरकुल वाटपाचे आश्वासन
जूनअखेर घरकुल वाटपाचे आश्वासन: पिंपरी : जून महिनाअखेरपर्यंत घरकुलांचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिल्याचे डीवायएफआयने कळविले आहे.
घरकुलांच्या विविध प्रश्नांसाठी डीवायएफआयने आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन केले. विविध मागण्यांचे निवेदन घेऊन संघटना शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले.
घरकुलांच्या विविध प्रश्नांसाठी डीवायएफआयने आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन केले. विविध मागण्यांचे निवेदन घेऊन संघटना शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले.
राजेंद्र दीक्षित यांचे बहारदार गायन
राजेंद्र दीक्षित यांचे बहारदार गायन: पिंपरी : अंगारकी चतुर्थी संगीत सभा मंगळवारी मंगलमूर्तीवाडा, चिंचवडगाव येथे झाली. चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि अनाहत संगीत अकादमी प्रस्तुत संगीत सभेत पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य राजेंद्र दीक्षित यांचे बहारदार शास्त्रीय गायन झाले. त्यास उपस्थितांनी उत्कट दाद दिली.
कार्यक्रमाची सुरुवात यमन रागातील कहे सखी कैसे के या विलंबित ख्यालाने झाली. भारदस्त आवाज, स्वरांचा पक्केपणा यामुळे पहिल्या स्वरापासून मैफल रंगत गेली. श्याम बजापे या द्रुत चितालातील चीजेने यमनची रंगत खुलविली. शास्त्रीय गायनानंतर राजेंद्र यांनी पंढरी निवासा सख्या पांडुरंगा, गणपती गणराया, ध्यान करू जाता मन हरपले हा अभंग सादर केला. अगा वैकुंठीच्या रामा या अभंगाने मैफलीची सांगता केली. कलाकारांचे स्वागत डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी केले. साथसंगत लीलाधर चक्रदेव (संवादिनी), विष्णू कुलकर्णी (तबला), अपूर्वा कायाळ, सारथी मेहता (तानपुरा), मकरंद बादरायणी (टाळ) यांनी केली. (प्रतिनिधी)

छायाचित्रण स्पर्धेत युवराज पाटील प्रथम
छायाचित्रण स्पर्धेत युवराज पाटील प्रथम: पिंपरी : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळातर्फे जागतिक जैवविविधता दिनानिमित्त आयोजित वन्य महाराष्ट्र छायाचित्रण स्पर्धेत येथील थिसेनक्रुप इंडस्ट्रिजचे कामगार युवराज पाटील यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
स्पर्धेमध्ये ५00 पेक्षा अधिक छायाचित्रे आली होती. वन्य महाराष्ट्र निसर्ग परिसंस्था व अन्य महाराष्ट्र- वनस्पती व प्राणी या विषयांवरील छायाचित्र स्पर्धेसाठी मागविण्यात आली होती. १३0 स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. छायाचित्रांचे प्रदर्शन कै. वसंतराव बागुल उद्यान, सहकारनगर, पुणे येथील पंडित भीमसेन जोशी कला दालनात सुरू आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे मनपा आयुक्त महेश पाठक व पाणलोट विषयातील तज्ज्ञ डॉ. विजय परांजपे यांच्या हस्ते झाले. मंडळाचे अध्यक्ष डॉ. एरच भरुचा, सदस्य सचिव अनमोल कुमार उपस्थित होते.

चिंचवडच्या सत्त्वाचा शोध घेतला : प्रभुणे
चिंचवडच्या सत्त्वाचा शोध घेतला : प्रभुणे: पिंपरी : सामाजिक कार्यात सुरुवातीच्या काळात चापेकर स्मारक समितीच्या माध्यमातून अशोक पारखी यांनी चिंचवडच्या सत्त्वाचा शोध घेतला, असे ज्येष्ठ कार्यकर्ते गिरीष प्रभुणे यांनी सांगितले.
शिक्षण मंडळाचे माजी सभापती अशोक पारखी यांचा एकसष्ठीनिमित्त सत्कार सोहळा नुकताच झाला. ‘ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल राजकीय पक्षांनी घ्यावी, असे मधू जोशी यांनी येथे सांगितले. या वेळी भारती चव्हाण, वा. ना. अभ्यंकर, नगरसेवक अप्पा बारणे, अरुण बोर्हाडे, मंदाकिनी ठाकरे, अश्विनी चिंचवडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

आयुक्तांकडून नालेसफाईची पाहणी
आयुक्तांकडून नालेसफाईची पाहणी: - लगतची अवैध बांधकामे दृष्टिपथात
पिंपरी : महापालिका हद्दीतील ड प्रभाग कार्यक्षेत्रातील नालेसफाईच्या कामांची आयुक्तांनी पाहणी केली. कामे अद्यापही अर्धवट असल्याचे पाहणीत त्यांना आढळून आले. नालसफाईच्या कामांची पाहणी करत असताना नाल्यालगत सुरू असलेली अवैध बांधकामे आयुक्तांच्या दृष्टिपथास आली. या प्रकरणी त्यांनी संबंधित अधिकार्यांकडून तातडीने अहवाल मागवला आहे.

एकाच वेळी ३३ जण मनपा सेवेतून नवृत्त
एकाच वेळी ३३ जण मनपा सेवेतून नवृत्त: पिंपरी : ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, लेखाधिकारी, प्रशासन अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षक अशा महत्त्वाच्या पदांवर काम करणार्या अधिकार्यांबरोबर लिपिक, परिचारिका, आरोग्य सहायक, सफाई कामगार, रखवालदार, मुकादम अशा पदांवरील एकूण ३३ जण ३१ मे रोजी महापालिका सेवेतून नवृत्त होत आहेत, तर सात जणांनी स्वेच्छानवृत्ती स्वीकारली आहे.
मेअखेर नवृत होणार्या अधिकार्यांमध्ये वायसीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्याम गायकवाड, डॉ. जयंत हांडे, डॉ. ध्रुव जेरे या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश आहे. तसेच लेखाधिकारी डी. वाय गायकवाड, सुनीता फाटक, नारायण कांबळे हे प्रशासन अधिकारी, रघुनाथ भंडलकर,सुरेश साळुंखे, महादेव गायकवाड, छबू लांडगे हे कार्यालयीन अधीक्षक नवृत्त होत आहेत.या महत्त्वाच्या पदावरील अधिकार्यांसह अन्य अधिकारी आणि कर्मचारी मिळून ३३ जण नवृत्त होत आहेत. महत्त्वाच्या पदावरील अधिकार्यांची कमतरता भासत आहे. नवृत होणार्या अधिकार्यांची संख्या मोठी असल्याने कामकाजाचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. (प्रतिनिधी)

शाळा सुरू होताच गणवेश
शाळा सुरू होताच गणवेश: - शिक्षणाधिकारी अशोक भोसले यांचा दावा
पिंपरी : महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच पहिल्याच दिवशी १७ जूनला गणवेश, रेनकोट, दप्तर, बूट, वह्या, पुस्तके वाटप केली जाणार आहेत. शिक्षण मंडळाने त्या दृष्टीने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे वाटपात अडचण येणार नसल्याचा दावा शिक्षणमंडळाचे प्रशासन अधिकारी अशोक भोसले यांनी केला आहे.
शालेय गणवेश, कवायत आणि खेळ गणवेशाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रिअल एंटरप्रायजेस आणि सनराईज प्रिंट पॅक या पुरवठादारांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. १६ मे रोजी कामाचे आदेश दिले आहेत. रेनकोट तांत्रिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कंपास, प्रयोगवही या शालेय साहित्याच्या खरेदीसाठी दोनदा निविदा मागवल्या. २७ पर्यंत निविदा प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे.

Hotel in Hinjewadi Recognized for Outstanding Service and Amenities
Hotel in Hinjewadi Recognized for Outstanding Service and Amenities - Marketwire (press release):
Hotel in Hinjewadi Recognized for Outstanding Service and Amenities Marketwire (press release) That's why TripAdvisor's highly sought Certificate of Excellence awarded this year to the Courtyard Pune Hinjewadi is such a meaningful accolade. Travellers personally rate their hospitality experiences on TripAdvisor's website, and only the top ... and more » |
55 illegal mobile towers to be pulled down
55 illegal mobile towers to be pulled down - Daily News & Analysis:
Daily News & Analysis | 55 illegal mobile towers to be pulled down Daily News & Analysis Electricity supply to an illegally operating mobile tower at sector 28, Nigdi-Pradhikaran has been disconnected by the Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) as demanded by local residents of Nigdi-Pradhikaran area, who has ... |
Subscribe to:
Posts (Atom)