Tuesday, 30 October 2012

बस मार्गांची माहिती "हेल्पलाइन'वर

बस मार्गांची माहिती "हेल्पलाइन'वरकोणत्या मार्गावरील बस कोठे आणि कोणत्या भागातून जाईल, बसच्या फेऱ्या किती वेळाने आहेत... अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे प्रवाशांना 31 ऑक्‍टोबर आणि एक नोव्हेंबरला 9225320099 या हेल्पलाइनवर मिळू शकणार आहेत. 

कॉल सेंटर क्षेत्रातील नॅव्हिजन बिझनेस सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीने "पुणे बस डे'च्या उपक्रमात ही हेल्पलाइन उपलब्ध करून आपला सक्रिय सहभाग नोंदविला आहे. "बस डे'मध्ये सर्वच क्षेत्रातील घटक सहभागी होत असताना कॉल सेंटर क्षेत्रातील या कंपनीलाही योगदान द्यावेसे वाटले. या कंपनीने पीएमपी प्रशासनाशी संपर्क साधून हेल्पलाइन सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. प्रशासनाने होकार दिल्याने "बस डे'साठी ही हेल्पलाइन उपलब्ध असेल.
बस मार्गांची माहिती

पिंपरीत भाजप नगरसेवकांकडून दोन महिन्यांचे मानधन

पिंपरीत भाजप नगरसेवकांकडून दोन महिन्यांचे मानधन पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे नगरसेवक दोन महिन्यांचे मानधन "बस डे' उपक्रमासाठी देतील, अशी घोषणा शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी लक्ष्मीनगर येथील शीतल शिंदे मित्रमंडळातर्फे आयोजित रावणदहन कार्यक्रमात केली होती. त्यानुसार महापालिकेतील भाजपच्या गटनेत्या वर्षा मडिगेरी आणि नगरसेवक शीतल शिंदे यांनी दोन महिन्यांचे मानधन दिले. "सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले यांच्याकडे शनिवारी (ता.27) त्यांनी धनादेश सुपूर्त केला. विलास मडिगेरी, मिथुन मधुरे उपस्थित होते.

घरपोच वाहन परवाने टपालातच !

घरपोच वाहन परवाने टपालातच !
पिंपरी, 28 ऑक्टोबर
नागरिकांना घरबसल्या वाहन परवाना मिळावा यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने टपाल खात्याची मदत घेतली. मात्र टपाल खात्याच्या ढिसाळ कारभाराचा फटका परवान्यांनाही बसत असल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या दहा महिन्यापासून 6255 परवाने नागरिकांपर्यंत पोहचलेच नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना आरटीओ बरोबरच टपाल खात्यातही खेटा माराव्या लागत आहेत.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


नगरसेविकांनी घेतला महाभोंडल्याचा धमाल आनंद !

नगरसेविकांनी घेतला महाभोंडल्याचा धमाल आनंद !
भोसरी, 28 ऑक्टोबर
महापौर मोहिनी लांडे, भोसरी परिसरातील सर्व नगरसेविका आणि महिलांनी आज भोसरी येथे आयोजित केलेल्या महाभोंडल्याचा धमाल आनंद घेतला. विविध खेळ, स्पर्धा, पथनाट्य अशा विविध कार्यक्रमांनी हा महाभोंडला रंगत गेला.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


कंपनीचे भवितव्य उत्पादनाच्या दर्जावर अवलंबून - अमृत रथ

कंपनीचे भवितव्य उत्पादनाच्या दर्जावर अवलंबून - अमृत रथ
पिंपरी, 28 ऑक्टोबर
कंपनीच्या सामर्थ्यापेक्षा तुम्ही कोणत्या दर्जाचे उत्पादन ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देता, यावर कंपनीचे भवितव्य अवलंबून आहे, असे मत बजाज ऑटो कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे उपाध्यक्ष अमृत रथ यांनी व्यक्त केले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


जर्मनीमध्ये काळानुरुप बदलती शिक्षणपध्दती - आदिती बिचे

जर्मनीमध्ये काळानुरुप बदलती शिक्षणपध्दती - आदिती बिचे
तळेगाव दाभाडे, 28 ऑक्टोबर
अभ्यासक्रमातील लवचिकता, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यावर भर, शिक्षकांची जागरुकता, उत्कृष्ट अध्यापन कौशल्य आणि 24 तास शैक्षणिक सुविधा यामुळे जर्मनीतील शिक्षणपध्दती काळानुरुप गरजेप्रमाणे बदलती आहे, असे मत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या आदिती बिचे हिने आपल्या जर्मन देशाच्या प्रवासातील आठवणी सांगताना म्हटले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


देहुरोड कँटोन्मेंट हद्दीत एक नोव्हेंबरपासून हेल्मेटसक्ती

देहुरोड कँटोन्मेंट हद्दीत एक नोव्हेंबरपासून हेल्मेटसक्ती
देहूरोड, 28 ऑक्टोबर
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये हेल्मेट सक्ती केल्यानंतर आता देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डानेही आपल्या हद्दीमध्ये येत्या एक नोव्हेंबरपासून दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


नऊ महिन्यांत ४0 गुन्हे; दीड कोटीची लूट

नऊ महिन्यांत ४0 गुन्हे; दीड कोटीची लूट: प्रवीण बिडवे । दि. २८ (पिंपरी)

महागाईने होरपळणारे नागरिक आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी दिवसरात्र राबत असताना चोरटे त्यांच्या कष्टाच्या ऐवजावर डल्ला मारून मालामाल होऊ लागले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतील चोर्‍या, जबरी चोर्‍या आणि घरफोड्यांसारखे ८१२ गुन्ह्यांपैकी केवळ ४0 गुन्ह्यांमध्येच चोरट्यांनी १ कोटी ४३ लाख ७१ हजार ५११ रुपयांची माया जमविली आहे. विशेष म्हणजे चोर्‍या आणि घरफोड्यांच्या १९ टक्केच गुन्ह्यांची उकल झाली असून, ८१ टक्के गुन्ह्यांतील आरोपी मोकाटच आहेत.

निव्वळ रोकड आणि दागिने चोरून नेण्याचे किमान तीन गुन्हे शहरात दररोज घडतात. तर लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा आठवड्यात एक गुन्हा शहरातील पोलीस ठाण्यात नोंद होतो. असा मोठा ऐवज चोरीस जाण्याचे ४0 गुन्हे चालू वर्षात शहरात घडले आहेत. कंपन्यांमधून माल चोरीस गेल्याच्या घटना निराळ्याच. सोने सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिले नसताना सोनसाखळ्या, मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या प्रकारांनी नागरिक धास्तावले आहेत. असे ९३ गुन्हे घडले असून, त्यामध्ये वृद्ध महिला सावज ठरण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा जबरी चोरीच्या घटनांमध्ये ४0 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज मोटरसायकलवरून येणार्‍या भामट्यांनी हिसकावून नेला आहे. आठवड्यात सोनसाखळी चोरीच्या किमान दोन घटना घडतात. असे सर्वाधिक १८ गुन्हे निगडी परिसरात घडले आहेत. त्याखालोखाल पिंपरी आणि चिंचवड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा १६ गुन्ह्यांची नोंद आहे.

चोरीचे सर्वाधिक १३३ गुन्हे हिंजवडीत, तर १३0 गुन्हे पिंपरीत दाखल आहेत. त्यांपैकी अनुक्रमे २१ आणि २४ गुन्हेच पोलीस उघड करू शकले आहेत. सांगवीत ११७, निगडीत ११0, भोसरीत १0५, चिंचवडमध्ये ८४, तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा २३ गुन्ह्यांची नोंद आहे. घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लांबविण्याचे गुन्हे रात्री अधिक घडतात. शहरात १५६ ठिकाणी रात्री, तर ५३ ठिकाणी दिवसा घरफोड्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. याखेरीज वाटसरूला रस्त्यात अडवून किंवा एखाद्या घरात घुसून त्याच्यावर पिस्तूल रोखत मोबाईल, रोकडसह ऐवज लुबाडून नेण्याचे ६७ गुन्हे घडले आहेत.

प्रवासादरम्यान गेला सात लाखांचा ऐवज
शहरात पीएमपी अथवा खासगी प्रवासी वाहनांनी प्रवास करताना जवळील रोख रक्कम, तसेच ऐवज चोरीस गेल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. २५ मे रोजी खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणार्‍या संदीप गोरक्षनाथ रावळ यांच्या बॅगेतून १ लाख ६0 हजारांचा ऐवज चोरीस गेला; तर ७ जुलैला किरण शरद बोरकर या रिक्षाचालकास प्रवाशानेच भोसरीत लुटले. त्याच्या जवळील ८१ हजारांचा ऐवज चोरून नेला. बहिणीने विश्‍वासाने ठेवण्यासाठी दिलेले सव्वादोन लाखांचे दागिने परत करण्यासाठी चाललेल्या सुनंदा राजू पाटील यांच्याजवळील दागिने चोरट्याने लांबविले. १८ जुलैला चिखली ते दिघी दरम्यान हा प्रकार घडला. बसमध्ये चढताना संचिता भरत गोळे यांनी ९0 हजारांचा, पल्लवी पांडुरंग पाटील यांनी ९६ हजारांचा, तर पवनकुमार सिंग यांनी ५७ हजारांचा ऐवज गमावला.

सर्वांत मोठी चोरी २९ लाखांची
हिंजवडीतील फ्लॅगशिप इन्फ्रास्ट्रर या कंपनीच्या छताला भगदाड पाडून २३ जुलैला २९ लाखांची रोकड चोरण्यात आली. प्राधिकरणातील अनुप कपिल यांच्या बंगल्यातून चोरट्यांनी १0 लाखांची रोकड व साडेतीन लाखांचे दागिने असा साडेतेरा लाखांचा ऐवज चोरून नेला होता. १२ जूनला पिंपरीतील उज्जीवन फायनान्समधील कर्मचार्‍यांना बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी ८ लाख ७३ हजार ५११ रुपये चोरून नेले. तर एम्पायर इस्टेट या वसाहतीमध्ये तीनवेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. मिलिंद सारंगधर पोळ यांच्या घरातून ६ लाख ९५ हजार तर अनिष डांगे यांच्या घरातून ५ लाखांचा तर मणजितसिंग लाड यांच्या घरातून १ लाख ३0 हजारांचा ऐवज चोरीस गेला.

तीन हजार 750 कोटींचे नुकसान टळले

तीन हजार 750 कोटींचे नुकसान टळले: पिंपरी - "बीआरटीएस कॉरिडॉर' आणि फीडर रूटलगत दुतर्फा मालमत्ता विकासासाठीच्या अटी व शर्तीमध्ये फेरबदल करणारी उपसूचना उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवून ती रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

वीज दरवाढी विरोधात "कोसिआ'चा आज "बंद'

वीज दरवाढी विरोधात "कोसिआ'चा आज "बंद': पिंपरी - महाराष्ट्रातील वीज दरवाढीच्या विरोधात चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशनने (कोसिआ) गुरुवारी (ता.25) राज्यव्यापी "बंद' पुकारला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड उद्योनगरीतील सर्व सभासद सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे शहराध्यक्ष प्रवीण मिस्त्री यांनी "सकाळ'ला दिली. 

धम्मचक्र प्रवर्तनदिन पिंपरी-चिंचवडमध्ये साजरा

धम्मचक्र प्रवर्तनदिन पिंपरी-चिंचवडमध्ये साजरा: पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विविध संस्था-संघटनांकडून धम्मचक्र प्रवर्तनदिन साजरा करण्यात आला.
धम्मचक्र प्रवर्तनदिन पिंपरी-चिंचवडमध्ये साजरा

Four BRTS routes to get 91 bus shelters

Four BRTS routes to get 91 bus shelters: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has finalized the design for bus shelter to be built along the four Bus Rapid Transit System (BRTS) routes in municipal limits.

46 dengue cases, one death in Pimpri-Chinchwad township areas this year

46 dengue cases, one death in Pimpri-Chinchwad township areas this year: As many as 46 people have tested positive for dengue, while one person has died of the disease, in the Pimpri-Chinchwad township this year.

10 CNG outlets to start in next four months

10 CNG outlets to start in next four months: All autorickshaw drivers are facing severe inconvenience and hardships due to inadequate number of CNG outlets in Pune and Pimpri-Chinchwad.

PCMC to recover pending property tax

PCMC to recover pending property tax: The property tax department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will intensify its drive to recover pending tax from defaulters who owe the corporation anything between Rs 1 lakh and Rs 5 lakh.

CCTVs must for commercial buildings: Pimpri Chinchwad Municipal Corporation

CCTVs must for commercial buildings: Pimpri Chinchwad Municipal Corporation: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has made it mandatory for commercial establishments in its municipal limits to install Closed Circuit Television (CCTV) cameras within a month as a security and safety measure.

पिंपरी-चिंचवडमध्ये अव्वाच्या सव्वा
जकात दरवाढीचा प्रस्ताव

पिंपरी-चिंचवडमध्ये अव्वाच्या सव्वा जकात दरवाढीचा प्रस्ताव
पिंपरी, 27 ऑक्टोबर
नवनवीन उद्योग यावेत यासाठी गुजरात, उत्तराखंड या सारखी राज्ये सवलतींच्या पायघड्या घालत असताना, उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरातून जणू उद्योगांनाच बाहेर काढण्याचा विडा उचलण्यात आला आहे की काय, अशी परिस्थिती महापालिकेने निर्माण केली आहे. जकात समानीकरणाच्या नावाखाली जकातीचे दर अव्वाच्या सव्वा वाढविण्याचा प्रस्ताव 20 नोव्हेंबरला होणा-या महापालिका सभेपुढे ठेवण्यात आला. त्यामुळे उद्योगनगरीतून उद्योगच नामशेष होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


पदाधिकारी, अधिका-यांसाठी 16 नवीन वाहनांची खरेदी

पदाधिकारी, अधिका-यांसाठी 16 नवीन वाहनांची खरेदी
पिंपरी, 27 ऑक्टोबर
अनधिकृत बांधकामांवर सुरु असलेल्या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवाश्यांमध्ये चिंतेचे वातावरण असताना महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी सेवा सुविधा मिळविण्यात रममाण झाले आहेत. महापालिकेकडून पदाधिकारी आणि अधिका-यांसाठी 16 नवीन टाटा मांझा या आलिशान आणि वातानुकूलित मोटारी खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा बोजा महापालिकेवर पडणार आहे. स्थायी समितीच्या सभेमध्ये आयत्यावेळी दाखल झालेल्या या प्रस्तावाला गुपचूप मान्यता देण्यात आली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


पिंपरी-चिंचवड शहरात बकरी ईद साजरी

पिंपरी-चिंचवड शहरात बकरी ईद साजरी
पिंपरी, 27 ऑक्टोबर
मुस्लिम बांधवांकडून आज (शनिवारी) शहरात बकरी ईद साजरी करण्यात आली. ईदनिमित्त शहरातील मशिदींमध्ये तसेच निगडी, दापोडी व चिंचवडगावातील ईदगाह मैदानावर सकाळी मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाज पठण केले. त्याचप्रमाणे त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून बोकडांची कुर्बानी देण्यात आली.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


हलगर्जीपणाने घेतले नऊ महिन्यांत 132 जणांचे बळी

हलगर्जीपणाने घेतले नऊ महिन्यांत 132 जणांचे बळी
पिंपरी, 26 ऑक्टोबर
वाहन चालविताना होणारा हलगर्जीपणा, बांधकामावरील निष्काळजीपणा यामुळे अवघ्या नऊ महिन्यांत परिमंडल तीनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तब्बल 132 जणांचे बळी गेले आहेत. या आकडेवारीनुसार बांधकाम मजुरांच्या तसेच रस्त्यावरील पादचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


आजी-माजी नगरसेवकांच्या संस्थांना साफसफाईच्या ठेक्याची खिरापत

आजी-माजी नगरसेवकांच्या संस्थांना साफसफाईच्या ठेक्याची खिरापत
पिंपरी, 26 ऑक्टोबर
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील साफसफाईच्या कामाचा ठेका तब्बल 66 संस्थांमध्ये विभागून देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य संस्था आजी-माजी नगरसेवकांशी संबंधित असून वर्षभराच्या कामासाठी या संस्थांवर पाच कोटी 52 लाख रुपये खर्च केला जाणार आहे. येत्या मंगळवारी (ता. 30) होणा-या स्थायी समितीच्या सभेपुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


टाटा मोटर्सतर्फे इ वर्कशॉप मॅन्युअलचे उद्‌घाटन

टाटा मोटर्सतर्फे इ वर्कशॉप मॅन्युअलचे उद्‌घाटन
पिंपरी, 26 ऑक्टोबर
टाटा मोटर्सतर्फे ग्राहक सेवा दिनानिमित्त ग्राहकांच्या सोयी सुविधांसाठी आज टाटा मोटर्सच्या संकेतस्थळावर 'ई वर्कशॉप मॅन्युअल'चा प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रीय ग्राहक सेवा दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात टाटा मोटर्सचे अधिकारी आणि त्यांचे ग्राहक यांच्या उपस्थितीत या वर्कशॉप मॅन्युअलचे उद्‌घाटन करण्यात आले.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


गाडीच्या 'पसंती' क्रमांकाच्या नोंदणीत पाचपट वाढ

गाडीच्या 'पसंती' क्रमांकाच्या नोंदणीत पाचपट वाढ
पिंपरी, 26 ऑक्टोबर
आजकाल आकडेशास्त्राचा प्रभाव जनमानसावर आहे. आपल्या पसंतीचा, आपल्याया लकी ठरेल असा आकडा जाणून घेण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता असते. एकदा हा आकडा समजला की त्याचा जास्तीतजास्त वापर कसा करता येईल याकेड सगळ्याचे लक्ष असते. म्हणूनच सध्या आपल्या वाहनांसाठी आपल्याला लकी ठरणारा, आपल्या पसंतीचा क्रमांक घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड उपप्रादे‍शिक परिवहन कार्यालयात गेल्या चार वर्षात सुमारे पाच पटीने वाढ झाली आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


विराज गपचुप याला राष्ट्रीय 'इन्स्पायर पुरस्कार'

विराज गपचुप याला राष्ट्रीय 'इन्स्पायर पुरस्कार'
पिंपरी, 26 ऑक्टोबर
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या इन्स्पायर पुरस्कार विज्ञान प्रकल्प स्पर्धेत निगडीतील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या विराज गपचुप याच्या 'अ‍ॅटोमॅटिक वॉटर पंम्प कंट्रोलर' या विज्ञान प्रकल्पाला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. नुकतेच केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री रवी वायलर यांच्या हस्ते त्याला 'इन्स्पायर पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणारा विराज हा महाराष्ट्रातील पहिला शालेय विद्यार्थी आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in