Thursday, 23 November 2017

पिंपळे सौदागर येथे रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची निवड चाचणी

पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६१ वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दि.२० ते २४ डिसेंबर रोजी भुगाव, ता. मुळशी, पुणे येथे होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील कुस्तीपटूंसाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व नाना काटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कै. पंढरीनाथ फेंगसे यांच्या स्मरणार्थ पिंपळे सौदागर पोलीस चौकी शेजारी कै.देवराम काटे पाटील क्रीडानगरीत ही निवड चाचणी रविवार दि.२६ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक नगरसेवक नाना काटे यांना पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, शिव छत्रपती पुरस्कार विजेते माजी नगरसेवक शंकर काटे आदी 

70 लाखाच्या खरेदीतील लाभार्थी कोण?

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास (वायसीएमएच) आवश्‍यक असणाऱ्या औषध खरेदीच्या निविदा मागविण्यात आल्या. सन 2010-11 आणि 2011-12 या दोन वर्षे कालावधीसाठी औषध खरेदी करण्यात आली. या निविदेमध्ये 1 कोटी रक्कमेची औषधे खरेदीचे अंदाजपत्रक देण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात भांडार विभागाने 1 कोटी 70 लाख इतक्‍या रक्कमेची औषधे खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 70 लाख रुपये जादा औषध खरेदीचे लाभार्थी कोण? असा सवाल करदाते विचारत आहे. दरम्यान हे प्रकरण दडपण्यात आले होते. मात्र, स्थानिक निधी लेखापरिक्षण विभागाने केलेल्या लेखापरीक्षणात ही बाब उघड झाल्याने संबंधित तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत.

“स्मार्ट सिटी’ सनियंत्रण समितीत विरोधकांना कोलदांडा?

पिंपरी – स्मार्ट सिटी संचालकपदी नियुक्त झालेल्या राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेनेच्या संचालकांना आता सत्ताधारी भाजपकडून स्थापन करण्यात येणाऱ्या सनियंत्रण समितीतून डच्चू मिळणार असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे “स्मार्ट सिटी’च्या निर्णय प्रक्रियेतून काही विरोधक गायब होणार आहेत.

उरो रुग्णालयाची आयुक्‍तांकडून झाडाझडती

पिंपरी – महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागाचे आयुक्‍त डॉ. संजीव कुमार यांनी औंध जिल्हा रुग्णालय, उरो रुग्णालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राला भेट देवून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.


महापालिकेची यंदा दैनंदिनी छपाई

पिंपरी – महापालिका निवडणुकीमुळे पदाधिकारी, समित्यांची निवड करण्यास विलंब झाल्यामुळे चालू वर्षाची दैनंदिनी छापण्याचे नियोजन कोलमडले होते. मात्र, 2018 मध्ये आठ हजार डायऱ्या छापण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे पुढील वर्षात नागरिकांना पालिकेची माहिती संग्रहित ठेवण्यासाठी छापील दैनंदिनी उपलब्ध होणार आहे.

सर्वच चेंडू खेळायचे नसतात!

सत्तारुढ पक्षनेते पवार : विरोधकांना उपरोधिक टोला
पिंपरी – यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या वैद्यकीय सुविधेतील अनियमितता आणि प्रत्येक कामासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सल्लागार नेमणुकीच्या प्रस्तावावरून विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आणि महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्यूत्तर देताना सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी डॉक्‍टरांना बढत्या दिल्यानंतर “वायसीएम’ रुग्णालयाची परिस्थिती सुधारणार आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला. तर, विरोधक काही चेंडू सोडून द्यायचे म्हणून टीका करतात, त्यात काहीही तथ्य नसते. त्यामुळे सर्वच चेंडू खेळायचे नसतात, असा टोलाही सत्तारुढ पक्षनेते पवार यांनी लगावला.