Wednesday, 14 November 2018

MLA tells civic officials to stop water for scrap dealers

Pimpri Chinchwad: Bhosari MLA Mahesh Landge has directed PCM ..

चापेकर चौकात चौदा कोटींचा पादचारी भुयारी मार्ग

पिंपरी – शाळा, बॅंक, शासकीय व निमशासकीय कार्यालये, तीर्थस्थळ यामुळे पादचाऱ्यांची कायम वर्दळ असणाऱ्या चापेकर चौकात वैशिष्ट्यपूर्ण पादचारी भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. या चौकाला जोडणाऱ्या पाचही रस्त्यांना ये-जा करण्यासाठी प्रवेशद्वार करण्यात येणार असल्याने शहरातील हा पहिलाच अशा प्रकारचा पादचारी मार्ग ठरणार आहे. मार्गात 25 गाळे दुकानांसाठी महापालिका उपलब्ध करुन देणार असल्याने याठिकाणी छोटेखानी बाजारपेठ वसणार आहे. यासाठी सुमारे चौदा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

[Video] इंद्रायणी प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांना आवाहन!


डुडुळगावात जलपर्णी काढण्यास गती

इंद्रायणी नदीला वेध जलपर्णी मुक्तीचे
आळंदी : पिंपरीचिंचवड महापालिकेच्या हद्दीतून इंद्रायणी नदीचे होत असलेले प्रदूषण थांबविण्यासह नद्याचे प्रवाह वाहते ठेवण्यासाठी मोशी नंतर आता डुडुळगावमध्ये नदीतील जलपर्णी काढण्यास स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काम सुरु केले आहे. यावेळी डुडुलगाव येथील नदीतुन जलपर्णी नदी बाहेर काढली. अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्टस आणि डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, रानजाई प्रकल्प देहू, डुडुळगाव ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला. यावेळी प्रमुख सोमनाथ आबा मुसुडगे, सचिन भैय्या लांडगे यांचे मार्गदर्शन झाले. सचिन भैय्या लांडगे, नगरसेवक विजय मामा लांडे, योगेश तळेकर, सोमनाथ आबा मुसुडगे आदीं उपस्थित होते. मोशीनंतर आता डुडुळगाव घाटावर काम करण्यात आले. असेच काम इतरत्र देखिल करण्यात येणार आहे. नदीचे दुतर्फा राहणार्‍या नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

महेश लांडगे अधिवेशनात लक्षवेधीद्वारे वेधणार शहरातील प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष

पिंपरी :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रामधील वारस नोंदी करण्यासाठी भाडेपट्टाधारकांना होणा-या त्रासाकडे आमदार महेश लांडगे आगामी हिवाळी अधिवेशवात लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधणार आहेत. याबाबतची लक्षवेधी त्यांनी सादर केली आहे. तसेच शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा, आरोग्य, शालेय क्रीडांगणे, सावित्रीबाई फुले विद्यापीठातील कारभाराकडे तारांकित प्रश्नाद्वारे आमदार लांडगे सरकारचे लक्ष वेधणार आहेत.

बोपखेल-दिघी रस्ता रुंदीकरणाच्या खर्चास मान्यता

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील बोपखल ते दिघी या दोन किलो मीटरच्या रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या रुंदीकरणासाठी खासगी वाटाघाटी करुन भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. याशिवाय बोपखेल ते आळंदी दरम्यान बीआरटी मार्गावर बसथांबे उभारण्यासाठी 8 कोटी 13 लाख रुपयांच्या खर्चास देखील मान्यता दिली आहे. त्यामुळे या मार्गावरील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

साडे बारा कोटींच्या विकास कामांना स्थायीची मंजुरी

पिंपरी – बोपखेल फाटा ते आळंदी रस्त्यावर नागरिकांच्या सोयीसाठी बस स्टेशन बांधण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 8 कोटी रुपयांच्या खर्चास व विविध विकास कामांच्या सुमारे 12 कोटी 33 लाख 25 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

ट्रामा सेंटरला अखेर मुहूर्त

पिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून येथे प्रस्तावित असणारे ट्रामा केअर सेंटर सुरू होण्यासाठी आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. रस्ते विकास महामंडळाने या सेंटरची जबाबदारी सोमाटण्याच्या पवना रुग्णालयाकडे सोपवली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळींचा सुळसुळाट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना खानावळी आणि भोजनालयांचा सुळसुळाट झाला आहे. काही भोजनालये रस्त्याच्या कडेला रात्रीही सुरू असतात. तेथील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, अशा अनधिकृत खानावळी आणि भोजनालयांवर कारवाई करणे मनुष्यबळाअभावी शक्‍य होत नसल्याचे अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

पिंपरी शहरातील ६१५ सोसायट्यांना नोटीस

पिंपरी - दररोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर स्वतःच प्रक्रिया करावी, अन्यथा कचरा उचलला जाणार नाही, अशा स्वरुपाच्या नोटीस महापालिकेने शहरातील ६१५ सोसायट्यांना दिल्या आहेत. तरीही ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या सोसायट्यांकडून प्रशासकीय शुल्क वसूल केले जाणार असून, त्याची रक्कम निश्‍चित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

देहूरोड उड्डाण पुलाचे काम संथगतीने

पिंपरी - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या उड्‌डाण पुलाचे काम धीम्या गतीने सुरू असल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी वाहनचालकांची गैरसोय होत आहे. 

भोसरीत रिक्षांमुळे कोंडीत भर

भोसरी - येथील बीआरटीएस टर्मिनलजवळील रस्त्याच्या दोन पदरी भाग खासगी प्रवासी रिक्षांनी व्यापला आहे. त्यामुळे कोंडी होत असून, संबंधित चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

पिंपरी, आकुर्डी आणि निगडीतील अनधिकृत फलकांवर धडक कारवाई

चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पिंपरी, आकुर्डी आणि निगडीतील अतिक्रमणावर तसेच अनधिकृत फलकांवर धडक कारवाई केली. अतिक्रमणाचे साहित्य, 54 फलकांवर कारवाई करण्यात आली. ’अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या परिसरात शगुन चौक, पिंपरी कॅम्प येथे विनापरवाना असलेल्या  अतिक्रमणावर धकड कारवाई केली. त्यामध्ये साहीत्य जप्त करुन कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करण्यात आले आहे. लोखंडी स्टॅन्ड 1, लोखंडी जाळी 4, लाकडी खोके 1, मोढी छत्री 1, लोखंडी स्टुल 1, प्लस्टीक खुर्ची 1, प्लास्टीक स्टुल 3, आईस बॉक्स 1, प्लास्टीक कॅरट 1 जप्त करण्यात आले आहे.

सायन्स पार्कमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रियाशील वैज्ञानिक कार्यशाळा

चौफेर न्यूज – दिवाळी सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता क्रियाशील वैज्ञानिक प्रयोगांची कार्यशाळा घेण्यात येत आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन सुट्टीचा काळ सुध्दा ज्ञान संपादनासाठी उपयोगात आणावा, यासाठी सायन्स पार्क व्यवस्थापनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

[Video] पिंपरी पालिकेचे निष्क्रिय शहर अभियंता यांना निलंबित करा - महापौर

महापौर राहुल जाधव यांची मागणी ! पिंपरी पालिकेच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा! पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर जाधव!

पिंपरी-चिंचवड शहरात १० लाख रुपयांचा गुटखा केला जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा आणि चिखली पोलिसांची कामगिरी

सांगवी दापोडी परिसरात छटपुजा उत्साहात

जुनी सांगवी : दापोडी सांगवी व परिसरातील उत्तर भारतीयांचा छटपुजा हा सण येथील पवना नदीतिरावर उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील सर्व उत्तर भारतीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दस्तनोंदणी यापुढे तपासणीनंतरच

पुणे - जॉइंट व्हेंचर अथवा विकसन करारनाम्याची नोंदणी करताना यापुढे त्यांची मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेण्याचे बंधन दुय्यम निबंधकांना (सब रजिस्टार ) घालण्यात आले आहे. राज्य सरकारचा बुडणारा महसूल आणि भविष्यात नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी नोंदणी महानिरीक्षकांनी हा निर्णय घेतला आहे.

गंगा महाआरतीने उजळला इंद्रायणीचा घाट

निगडी – आळंदी आणि देहु तीर्थक्षेत्रातून विठुरायास समर्पित अभंग ऐकत वाहणाऱ्या इंद्रायणी नदीने छठी मईया आणि सुर्याचे स्तवन करणारी हिंदी व भोजपुरीतील लोकभक्‍ती गीते देखील ऐकली. गंगा नदीप्रमाणेच जीवनदायिनी इंद्रायणी नदीने देखील महाआरती छठ्‌ पूजेत अनुभवली. हजारोंच्या संख्येने पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यात असलेल्या उत्तर भारतीय बांधवांनी मोठ्या श्रद्धेने इंद्रायणी पात्रात उभे राहून प्रत्यक्ष दिसणाऱ्या सुर्यदेवास अर्घ्य अर्पण केले. छठ्‌ व्रतींसाठी विश्‍व श्रीराम सेनेने आयोजन केले होते.

“दीक्षा’ अॅप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग

पुणे – शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत राज्यातील 683 शिक्षकांनी “ई-साहित्य’ तयार करुन “दीक्षा’ अॅप समृध्द करण्यास मदत केली आहे.

पक्षी निरीक्षणद्वारे “डॉ. सालिम अली” यांना आदरांजली

चौफेर न्यूज –  पक्षीतज्ञ डॉ. सालिम अली यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त अलाईव्ह संस्थेकडून पवना नदीकाठावर गावडे घाट, चिचंवडगाव परिसरात ‘डॉ. सालिम अली पक्षी निरिक्षण दिन’ साजरा करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आबाल-वुद्ध ३० हौशी पक्षी निरीक्षक सहभागी झाले होते.

संविधान दिनानिमित्त शाहिरी जलसा कार्यक्रम

चौफेर न्यूज    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी येणा-या खर्चास स्थायी समितीने आज ( मंगळवारी ) एेनवेळी मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.