Tuesday, 15 October 2013

जनसंपर्क प्रशासन अधिकारीपदी अण्णा बोदडे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या प्रशासन अधिकारीपदी अण्णा बोदडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या इतिहासात या विभागाला प्रथमच प्रशासन अधिकारी लाभले आहेत.  

पिंपरी महापालिकेचा शहर स्वच्छता आराखडा तयार

शहरात पुरेशी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी महापालिकेने शहर स्वच्छता आराखडा (सिटी सॅनिटेशन प्लॅन) तयार केला आहे. त्याअंतर्गत विविध भागांत पुरुष व महिलांसाठी रहिवासी क्षेत्र, झोपडपट्टी आणि वर्दळीच्या ठिकाणी (तरंगती लोकसंख्या) स्वतंत्ररित्या सुमारे 2200 स्वच्छतागृहे दीड वर्षात उभारण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी मार्च 2015 उजाडणार आहे.

जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत म्हाळसाकांत विद्यालयाचे यश

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रिडा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेत17 व 19 वर्षाखालील गटात म्हाळसाकांत विद्यालयाने विजय प्राप्त केला आहे.

घंटागाडी कर्मचा-यांची दिवाळी 'गोड' होणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेत असलेल्या घंटागाडी कर्मचा-यांच्या दिवाळी बक्षीस रकमेत तीन हजारांची वाढ करुन 15 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या आज (मंगळवारी) झालेल्या सभेमध्ये हा प्रस्ताव आयत्यावेळी दाखल करुन घेण्यात आला.  

PCMC facing financial crisis, reveals data

PIMPRI: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), which was once the richest municipal corporation in Asia, is now facing a financial crisis, as all the estimates of its revenue have gone awry.

PCMC files petition in HC to save properties in red zone

Defence admn's decision to increase area from 600 yards to 2,000 yards has affected many residential, commercial establishments

बेकायदा बांधकामासंदर्भात न्यायालयात अपील करणार -उपमुख्यमंत्री

पिंपरी-चिंचवड, पुणे, ठाणे, मुंब्रा परिसरातील अनधिकृत बांधकामासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अंतिम राहील, मात्र अॅडव्होकेट जनरलमार्फत या संदर्भात अपील करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर अजित पवार बोलत होते.

चिंचवडमध्ये सुरू होणार आत्महत्या ...



पिंपरी -चिंचवड शहरामध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. आपल्या प्रयत्नाने एका व्यक्तीची आत्महत्या वाचली तरी एखाद्या कुटंबाचा दुवा मिळेल या सामाजिक बांधिलकीने पुण्यातील कनेक्टिंग इंडिया या स्वयंसेवी संस्थेची हेल्पलाईन पिंपरी -चिंचवड येथे सुरू होत आहे.

महापालिका व एमआयडीसीचा 'अजब' समन्वय

अग्निशमन सेवा महापालिकेची ना हरकत दाखला एमआयडीसीचा !
भूखंड आरक्षित असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वादामध्ये औद्योगिक परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र रखडले आहे. कारखान्यांना महापालिका अग्निशमन सेवा पुरवित असताना अग्निशमनचे ना हरकत दाखले

पुणे, पिंपरीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा मार्ग मोकळा

पुणे व पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास खरेदीच्या विषयाला गृहविभागाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरीतील ३५० व्यापाऱ्यांना नोटिसा - उत्पन्नवाढीचे लक्ष्य



मूल्यवर्धित कर भरणाऱ्या, मात्र एलबीटी न भरणाऱ्या शहरातील जवळपास ३५० व्यापाऱ्यांना पिंपरी पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.

सभापतिपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीचे आठ सदस्य

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळ सभापतिपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आठ सदस्यांनी पक्षाकडे सोमवारी (ता.

नगरसेवकांच्या मानधनवाढीचा ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव येत्या शनिवारी (दि. 19) होणा-या महापालिका सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

अवैध बांधकामांसंदर्भात पानसरेंनी ...

शहरात ऐरणीवर आलेला अवैध बांधकामांचा प्रश्न सुटावा यासाठी विचारविनिमय करून मार्ग काढण्यासाठी मंगळवारी (दि. 15) पिंपरीमध्ये सर्वपक्षीयांसह सामाजिक संघटना, कायदेतज्ज्ञ यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे.