नंबर वन सिटी म्हणून नावलौकीक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची एक खासियत म्हणजे येथील रस्ते. रुंद, प्रशस्त आणि गुळगुळीत रस्त्यावरून वाहन चालविण्याचा वेगळाच आनंद मिळतो . या रस्त्यावरील वाहतुकीचे रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशात टिपलेले छायाचित्र पाहिले की क्षणभर आपण परदेशातील एका शहरात तर नाही ना असा भास होतो. ही छायाचित्रे टिपली आहेत एमपीसी न्यूजचे छायाचित्रकार सिकंदर खान यांनी.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 13 May 2014
अजब ! साडेचार हजार नळांना मीटरच नाही...!!
लोकप्रतिनिधी, धनदांडग्यांकडेही मीटर नाही
आमदार, खासदार, बांधकाम व्यावसायिक यांच्यासह काही महापालिका कर्मचारी फुकटचे पाणी वापरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. माहिती अधिकारामार्फत मिळालेल्या माहितीत महापालिकेच्या हद्दीत सुमारे साडेचार हजार नळांना मीटरच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे महापालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विठ्ठल विनोद यांनी केला आहे.
'Register consumer no just once for power plaints'
Pune: Citizens who have grievances regarding their power supply have to register their consumer number only once while registering a complaint using the Maharashtra State Electricity Distribution Company Limited's (MSEDCL) toll free number.
शालेय साहित्य पहिल्याच दिवशी द्या - मनसेची मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी शालेय साहित्याची खरेदी झालेली आहे. त्यामुळे चालूवर्षी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पर्यावरण विभागाने केली आहे.
अनधिकृत शाळांवर कारवाईची मनसेची मागणी
महापालिकेच्या शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या 25 अनधिकृत प्राथमिक शाळांवर शिक्षण हक्क कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
मावळ लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची जय्यत तयारी सुरू असून सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
मावळ लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत झाले असून लोकसभा मतदारसंघातील इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशिन बालेवाडी क्रिडासंकुलातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी शुक्रवारी (दि. 16) मतमोजणी होणार आहे. या कालावधीत मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून दोनशे मीटर परिसरात जमावबंदी, मोबाईल फोन, कॉडलेस फोन, पेजर, व्हीडीओ कॅमेरा, संबंधित पक्षांच्या चिन्हाचे प्रदर्शन, स्फोटक अथवा घातक पदार्थ नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
वेळेवर जमा होणार प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांची अंशदान रक्कम
वेळेवर जमा होणार प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांची अंशदान रक्कम
प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांच्या रजा वेतन व निवृत्ती वेतनापोटी देण्यात येणारी अंशदान रक्कम दर वर्षी प्रत्येक वित्तीय वर्ष संपल्यापासून 15 दिवसाच्या आत अथवा प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांची बदली वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी समाप्त झाल्यास कार्यमुक्त होताना भरावी, असे आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिले आहेत. वेळेत रक्कम जमा न केल्यास थकीत अंशदानाच्या रकमेवरील व्याज संबंधित विभागाच्या लिपीकाच्या वेतनातून वसुल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
रिपाइंची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी पुनर्बांधणी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले गट) पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी पुनर्बांधणी करण्यासाठी व पक्षातील सक्रीय कार्यकर्त्यांना संधी मिळवून देण्यासाठी बरखास्त करण्यात आली आहे. लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.
काँग्रेस शहराध्यक्षांचे ‘सहस्रभोजन’ चिंचवड विधानसभेसाठी शड्डू ठोकले
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भोईरांनी रविवारी निकटवर्तीयांसाठी घातलेले ‘सहस्रभोजन’ हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
'टाटा मोटर्स' युनियनच्या निवडणूकीत नेवाळे पॅनल विजयी
पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील महत्त्वाच्या समजल्या जाणा-या टाटा मोटर्स एम्प्लॉइज युनियनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कामगारांनी विद्यमान अध्यक्ष विष्णू नेवाळे यांच्या पॅनला मते देऊन विजयी केले. शनिवारी (दि.10) ही निवडणूक शांततेत पार पडली. या निवडणुकीमध्ये माजी अध्यक्ष सुजित पाटील यांच्या पॅनलचा पराभव झाला, तसेच अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले.
Subscribe to:
Posts (Atom)