Monday, 16 October 2017

Lessons from Tata Tele shutdown: What to do when you are one of thousands suddenly without a job

When new jobs are hard to come by and a lot of companies are retrenching employees, everyone must plan for the eventuality well in advance.

When new jobs are hard to come by and a lot of companies are retrenching employees, everyone must plan for the eventuality well in advance.

बीआरटीसाठी पुन्हा 38 लाखांची “टूर टूर’

पिंपरी – महापालिकेचे महापौर, उपमहापौर, सर्व समित्यांचे सभापती, नगरसेवक बीआरटी विषयक अधिक माहिती व मार्गदर्शन घेण्यासाठी तीन टप्प्यात अहमदाबाद दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात 133 नगरसेवक आणि 21 अधिकाऱ्यांचा समावेश असून विमानाने ये-जा करण्याचा प्रवास, राहण्यासह खाण्याची तारांकीत हॉटेलवर व्यवस्था करण्यात येणार आहे. “जनतेचे सेवक’ अभ्यास दौऱ्याच्या नावावर सुमारे 38 लाखांची उधळपट्टी करणार आहेत.

मेट्रो - महापालिकेत समन्वय नाही

महामेट्रो आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या समन्वय नसल्याचा वाहनचालकांना फटका बसत आहे. पिंपरी चौक ते दापोडी सीएमई गेट ते पिंपरी चौक या दरम्यान सध्या मेट्रोचे काम सुरू असून, कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात येणाऱ्या डायव्हर्जनमुळे दररोज मोठी वाहतूक कोंडी होत आहे. मेट्रो आणि रखडलेल्या बीआरटीचे काम एकाच वेळेस सुरू झाल्याने चौका-चौकातील कोंडीत दररोज भर पडत आहे.

Relief for motorists of Bhosari MIDC

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) finally took action and tackled the trenches on the route, which had been posing a high risk of accidents — this came close on the heels of Pune Mirror's report highlighting this predicament on ...

आळंदीच्या मैला शुद्धीकरण प्रकल्पास तीव्र विरोध

आळंदीतील आरक्षित जागेऐवजी चऱ्होली धानोरे येथील गायरानात आळंदीचा मैला शुद्धीकरण प्रकल्प हलविला जात आहे. या पार्श्वभूमीवर चऱ्होली धानोरे ग्रामस्थांची बैठक महसूल विभागाने दोन दिवसांपूर्वी घेवूनही ग्रामस्थांनी नकार दिला. आता आळंदीच्या मैला शुद्धीकरण प्रकल्पास तीव्र विरोध दर्शविण्यासाठी धानोरे ग्रामस्थांनी तातडीची विशेष ग्रामसभा मंगळवारी (ता. १७) आयोजित केली आहे.

कागदपत्रात फेरफार करुन बेकायदा बांधकाम?

पिंपरी – पिंपळे गुरव येथे एका राजकीय नेत्यांच्या वरदहस्तातूने सर्व्हे क्रमांक 87/3 मधील कागद पत्रांमध्ये फेरफार करुन मृत व्यक्‍तींच्या नावावर कागदपत्र बनवून बेकायदा बांधकाम करण्यात येत आहे, याविषयी संबंधित बांधकाम व्यावसायिका विरोधात अतुल काशिद यांनी “आपले सरकार’ या “पोर्टल’वर तक्रार केली आहे. तसेच, तलाठी, मंडल अधिकारी, अप्पर तहसिलदार आणि महापालिका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिला, याकडे अधिकारी दुर्लक्ष करु लागल्याने राज्य लोकायुक्‍त आणि आपले सरकार वेबपोर्टलवर तक्रार न्याय मागितला आहे. याप्रकरणी हवेलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तक्रारीत तथ्य असल्याचे सांगत याप्रकरणी पुनरावलोकन करण्याचे आदेश दिले आहेत.

कोणत्याही सरकारला पारदर्शक कारभार नकोसा असतो!

विवेक वेलणकर यांचे मत : सुनील पाटील यांचा माहिती कायदा पुरस्कार
भोसरी – बारा वर्षापूर्वी अंमलात आलेला माहिती कायदा 2005 अद्यापपर्यंत बारा टक्‍के लोकांपर्यंत देखील पोहचला नाही. वस्तूतः कलम 26 नुसार हा कायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. ते मागच्या सरकारने केले नाहीत आणि नवीन पारदर्शक सरकार देखील करत नाही. कोणत्याही सरकारला पारदर्शक कारभार नको असतो, अशी टिका माहिती कायदा अभ्यासक व ज्येष्ठ व्याख्याते विवेक वेलणकर यांनी केली.

दिवाळी गावाकडेच होणार साजरी

शहर होऊ लागले मोकळे : एसटी व खासगी बसना प्रचंड गर्दी
पिंपरी, (प्रतिनिधी) – उद्योगनगरीतील नागरिकांनी दिवाळीसाठी सध्या गावाकडची वाट धरली आहे. शहरातून जाणारी प्रत्येक बस आणि रेल्वे हाऊसफुल्ल होऊन धावत आहे. वल्लभनगर एसटी स्थानक तसेच खासगी बस जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर सध्या प्रचंड गर्दी आहे. नोकरी-व्यवसाय आणि शिक्षणासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या बहुतेकांना ही दिवाळी गावाकडेच साजरी करण्याचा निश्‍चय केला आहे.

‘चायना मार्केट’ यंदाही तेजीतच

सोशल मीडियातील मेसेजकडे दुर्लक्ष : दररोज लाखोंची उलाढाल
पुणे – चीनचे डोकलाममध्ये घुसणे, त्यावरून सुरू असलेली भारत-चीन दरम्यानची सुंदोपसुंदी या सगळ्या पार्श्‍वभूमीवर चिनी वस्तू वापरू नयेत, असे आवाहन करणारे रोज शेकड्याने मॅसेज सोशल मीडियामध्ये सुरू होते, अजूनही आहेत. मात्र, त्याचा परिणाम झाल्याचे बाजारपेठेत फेरफटका मारताना मात्र जाणवत नाही. दिवाळीत कपडेलत्ते सोडले, तर जवळपास बहुतांश दुकाने चिनी बनावटीच्या वस्तूंनी काबीज केले आहे.

शिवसेनेतील गटबाजी संपणार का?

पिंपरी – राज्यात सत्तेत भागीदार असणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये सातत्याने खटके उडत आहेत, तसेच कोणत्या न कोणत्या कारणावरून फटकेबाजी सुरू आहे. त्यातच शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि मध्यावधी निवडणुकांची ही शक्‍यता निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची मोट व्यवस्थित बांधण्याचा शिवधनुष्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खांद्यावर घेतला आहे. राऊत सध्या स्वत: पिंपरी-चिंचवड व परिसरात पक्षाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. पक्षाच्या बळकटीसाठी विधायक पाऊल मानले जात आहे, परंतु शहरातील पक्षाचे दोन खासदार आणि एक आमदार यांच्यातील मतभेदाचे राजकारण, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली गटबाजी अशी अवघड आव्हाने पक्षासमोर आहेत. गटतट संपुष्टात आणण्यासाठी नेत्यांची इच्छाशक्ती महत्वाची ठरणार आहे. राऊत यांच्या मध्यस्थीने एकसंधपणा साधला जाणार का? असा ही प्रश्‍न शिवसैनिकांना पडला आहे.