मागे कशाला तर CCTV साठी, मग अमृत योजनेमध्ये पाण्यासाठी पाईपसाठी व आता रिलायन्सच्या फायबर ऑप्टिक्ससाठी खोदकाम सुरु आहे. नवीन बांधकामासाठी, समस्या उद्भवल्यास होणारी खोदाई तर वेगळीच! सदर खोदकाम हि निरंतर सुरु आहे कारण पालिकेच्या खात्यांमध्ये कोणताही ताळमेळ नाही. मुळात रस्ता करताना इंडियन रोड काँग्रेसच्या निकषांनुसार प्रत्येक रस्त्याला सेवा वाहिनी (Service Duct) बांधणे अनिवार्य आहे ते जर काटेकोरपणे पाळले गेले असते तर सततचे खोदकाम टाळता आले असते. दर वर्षी रस्ता दुरुस्ती, खोदकाम, डांबराचे अगणित थर यासाठी कोट्यवधीचे बजेट मंजूर होते पण ज्यामुळे दरवर्षीचा अनावश्यक खर्च वाचणार आहे त्या सेवा वाहिन्यांचा आमच्या स्मार्ट राजकारणी व प्रशासनाला 'सोयीस्कर' विसर का पडतो?

