मुख्यमंत्री पिंपरी चिंचवड दौऱ्यावर येत आहे! हिच संधी आहे, आत्ता नाही तर कधीच नाही!
"पुणे मेट्रो फेज 1 ची सुरवात निगडीपा सून करावी" तसेच भक्ती-शक्ती चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशनप्रमाणे "मल्टिमोडलं ट्रान्सपोर्ट हब" ला त्वरित मंजुरी मिळावी या मागण्या आता नागरिकांमध्ये जोर पकडत आहे , त्याचाच एक भाग म्हणून 'कनेक्टिंग एनजीओ पिंपरी-चिंचवड ' मार्फत शहरातील विविध संस्था/संघटना मानवी साखळी करणार आहेत नागरिकांना आव्हाहन: दिनांक 11 ऑगस्ट, शुक्रवारी सायंकाळी 6.00 वाजता भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे मानवी साखळी उपक्रमात सहभागी व्हावे. हिच वेळ आहे आपल्या शहरावर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघटित होण्याची, व्यक्त होण्याची. आपल्या व आपल्या पुढच्या पिढ्यांना याचा फायदा होणार आहे तेव्हा नक्की थोडा वेळ काढूयात... अरे बघताय काय सामील व्हा!
"पुणे मेट्रो फेज 1 ची सुरवात निगडीपा