Saturday, 18 August 2018

जेव्हा कचऱ्याचे “सोने’ होते…!

पिंपरी – कचरा शहरांसाठी डोकेदुखी ठरत असताना घरच्या घरी अथवा सोसायट्यांमध्ये कचरा जिरवून इंधन, खत, वीज तयार करुन “कचऱ्याचे सोने’ कसे करायचे याचे दर्शन चिंचवड येथे आयोजित घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाच्या माध्यमातून पहायला मिळत आहे. तीन दिवसीय प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि. 17) सुरुवात झाली.

आयुक्‍तालयासाठी “तालेरा’चा निधी वर्ग

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजाला स्वातंत्र्य दिनापासूनच सुवात झाली आहे. मात्र अद्याप आयुक्तालयाला हक्काची इमारत मिळालेली नाही. प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेच्या इमारतीत आयुक्तालय होत असून येथील विद्युत यंत्रणेसाठी 43 लाखांचा खर्च होणार आहे. निधीची चणचण असल्याने महापालिकेकडून तालेरा रुग्णालयाचा निधी त्यासाठी वर्ग करण्यात येणार आहे.

सांगा आम्ही जगायचे कसे?

पिंपरी - घाणीत काम करतो. हॅण्डग्लोव्हज नाहीत. बूटही नाहीत. वेतनही कापले जाते. त्यावर कडी म्हणजे गेले तीन महिने ठेकेदाराने पगारच दिला नाही. घर कसे चालवायचे? चूल कशी पेटवायची, हा प्रश्‍न सफाई कामगार महिला पोटतिडकीने मांडत होत्या. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे कोणाचेच लक्ष नव्हते. त्यांचा ठेकेदार नक्की कोण, त्याचे नावही त्यांना सांगता येत नव्हते. त्यांच्या वेतनाची अडकलेली एकूण रकमेची बेरीज सुमारे एक कोटी रुपये होते.

नाशिक फाटा चौकात वाहतूक कोंडी

कासारवाडीतील नाशिक फाटा चौक आणि परिसराला दुकानदारांनी गराडा घातला आहे. बेशिस्तपणे वाहने रस्त्यावर थांबत असल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. पुणे मेट्रोचे काम सुरू झाल्याने या कोंडीत भर पडली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. असे असूनही वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. परिणामी वाहनचालक वैतागले आहेत.

नुकताच तयार केलेला हिंजवडी-माण रस्ता खड्ड्यात !

दुरावस्था झालेल्या रस्त्यांची तत्काळ डागडुजी करा; तालुका शिवसेनेचे प्रशासनास अल्टीमेटम 

प्रेयसीच्या माफीसाठी पिंपरीत 300 बॅनर

पिंपरी - प्रेयसीची माफी मागण्यासाठी तरुणाने शहरात चक्‍क 300 फलक लावले. शहरभर याबाबत चर्चा सुरू झाल्यावर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

जोड वृक्ष वेगळे करून पुन:रोपण सफल

पिंपरी – सध्या शहरातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. मेट्रोच्या मार्गिकेत अडथळा ठरणाऱ्या वृक्षांना छाटण्याऐवजी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडने वृक्षांचे पुन: रोपण केले आहे. हे काम किती जरी क्‍लिष्ट असले तरी झाडे कापण्याऐवजी त्यांना मूळासकट काढून मेट्रो दुसऱ्या ठिकाणी लावत आहे. प्रत्यारोपणाच्या या कार्यात दोन झाडांसाठी मेट्रोच्या हॉर्टीकल्चर विभागास प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. एकमेकांमध्ये गुंफलेल्या दोन झाडांना वेगळे करून मेट्रोने त्यांना पुन: रोपण केले.

Parking problem eats up Aundh-Wakad Rd


Parking problem eats up Aundh-Wakad Rd ... Such is the case in the Aundh-Wakad Road area as well, where residents are exasperated with badly ...

'तथ्य आढळले नाही...'

शहरातील अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात येत असले तरीही, राजरोसपणे शहरात अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ६२ नागरिकांनी पोलिस कंट्रोल रूमला ४५ ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी केवळ दोन ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली असून, उर्वरित ठिकाणी तक्रारीप्रमाणे परिस्थिती आढळून आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक पोलिसांची दिशाभूल करीत आहेत की, अवैध धंद्यांना अभय दिले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तपास पथकाकडून पिंपरीत २५ गुन्हे उघड

पिंपरी पोलिसांनी सराईतांना पकडून १५ दुचाकी, आठ मोबाइल आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. तर एका गुन्हेगारासह अल्पवयीन मुलास ताब्यात घेवून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहेत. मागील आठ दिवसांमध्ये झालेल्या या कारवाईत एकूण सात लाख ५३ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

व्हाइटनरऐवजी आता ‘सोल्यूशन’

भोसरी - काही वर्षांपूर्वी व्हाइटनरची नशा करण्याकडे लहान मुले, तसेच तरुणांचा कल होतो. त्याचे वाढते प्रमाण आणि धोके लक्षात घेऊन त्यावर बंदी आणली गेली. मात्र, व्हाइटरनची नशा करणारा वर्ग अलीकडे एका विशिष्ट प्रकारच्या सोल्यूशनकडे वळू लागला आहे; नव्हे तर त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. शहरातील काही झोपडपट्ट्यांचा वेध घेतला असता, त्या संदर्भातील अत्यंत हादरवून टाकणारी वस्तुस्थिती समोर आली.

ज्येष्ठांचे जीवन आनंदी व्हावे, यासाठी मी सर्वोतोपरी सहकार्य करीन! – खासदार श्रीरंग बारणे

निगडी – आकुर्डी, दत्तवाडी येथे शिवशक्‍ती ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करण्यात आली. संघाच्या उद्‌घाटन खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. यावेळी पिंपरी विधानसभा आमदार ऍड.गौतम चाबुकस्वार उपस्थित होते. यावेळी खासदार ऍड. चाबुकस्वार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग होत आहे. ज्येष्ठांचे जीवन आनंदी व्हावे, यासाठी मी सर्वोतोपरी सहकार्य करीन! 

जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत १५० खेळाडूंचा सहभाग

चौफेर न्यूज – स्टार आर्चर्स अकॅडमीतर्फे जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण ५० हुन अधिक शाळेतील १५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. इ १ली ते १२ वी च्या खेळाडूंसाठी विविध गटात स्पर्धा घेण्यात आल्या.

पिंपरी – चिंचवड भाजपा कामगार आघाडीतर्फे वृक्षारोपण

 चौफेर न्यूज –  भा.ज.पा. कामगार आघाडीतर्फे आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी, कडुलिंबाच्या रोपांची लागवड करण्यात आली. कडूलिंबाला पाणी कमी प्रमाणात लागते. तसेच, कडूलिंब आरोग्यासाठी लाभदायक असते, अशी माहिती कामगार आघाडीचे उपाध्यक्ष शंकर पाटील यांनी दिली.

क्षमतेपेक्षा जास्त दिलेले प्रवेश होणार रद्द

अकरावी प्रवेश : भरारी पथके करणार महाविद्यालयांची तपासणी
पुणे – राज्यात प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांमधील प्रवेश रद्द करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी कोचिंग क्‍लासेसशी साटेलोटे करत अनेक ग्रामीण भागांतील महाविद्यालये ऑनलाईन प्रवेशाच्या बाहेर राहत क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश करत असल्याची चर्चा आहे. याबाबत शासनाकडे तक्रारीही प्राप्त झाल्या असून त्यानंतर हे प्रवेश रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

[Video] पिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान, VIDEO व्हायरल

पुणे, 15 ऑगस्ट : स्वतंत्र्य दिनी ठिक-ठिकाणी केलं जाणार झेंडा वंदन हा अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम असतो, मात्र पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरांकडून ही शिस्त मोडल्या गेल्याचा एक व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील काळभोर चौकात, महापौर राहुल जाधवांनी अत्यंत घाईने ध्वजारोहन केलं आणि चक्क ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत राष्ट्रगान केलं. हा प्रकार ध्वज आचार संहितेचा भंग तर आहेच, शिवाय राष्ट्रीय कार्यक्रमादरम्यान घडलेला अवमान ही आहे. त्यामुळे महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडवे आणि अशी सलामी देणारे सत्ताधारी भाजपचे पक्ष नेते एकनाथ पवार यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जातेय.