Residents of Royal Residency, Jijamata Park, Chinchwad are protesting against Ram Associates and Patel builders for lack of basic amenities like water supply and electricity. The residents had complained to Vitthaldas Patel, Nilesh Parsiya, Manojkumar ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 17 May 2014
Pune: Barne magic in Maval; Jagtap eats humble pie
THE way he campaigned, the way he spoke while addressing the crowd and the way he gave effect to his political machinations, it was nothing but what political pundits called sheer arrogance on display, day in and day out.
नगरसेवक ते थेट खासदार !
थेरगावमधील एका शेतक-याचा मुलगा, सलग तीन वर्षे नगरसेवक, महापालिकेतील विरोधी पक्षनेता आणि त्यानंतर थेट मावळ लोकसभा मतदार संघातील खासदार असा श्रीरंग बारणे यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
चंदू बारणे हे एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी. श्रीरंग बारणे हे त्यांचे धाकटे चिरंजीव. श्रीरंग बारणे यांनी एफवायबीकॉम पर्यंतचे शिक्षण घेतले. दरम्यानच्या काळात ते कोल्हापूर येथे पहिलवानकीसाठी गेले. मात्र, व्यवसाय करण्याच्या आवडीमुळे तेथे ते फार काळ रमू शकले नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचे बंधु हिरामण बारणे यांच्या वीट व्यवसायाला हातभार लावण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हिरामण बारणे हे थेरगावचे उपसरपंच होते.
बारणे, आढळराव यांच्या विजयाने अजितदादांची बालेकिल्ल्यात कोंडी
उद्योगनगरीतील चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि मावळ अशा चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला लांब मागे टाकत शिवसेनेच्या उमेदवारांनी दमदार आघाडी घेतल्यामुळे अजितदादांची कोंडी झाली.
'गांधीबाबा' आणि 'मोदीबाबा'मुळे पराभव - मारुती भापकर
मावळच्या लोकसभा निवडणुकीत पैसा आणि गुंडप्रवृत्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. 'गांधीबाबा' आणि 'मोदीबाबा'मुळेच आपला पराभव झाला, अशी सल आम आदमी पक्षाचे उमेदवार मारुती भापकर यांनी बोलून दाखविली.
मारुती भापकर यांनी 2009 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना 8500 मते मिळाली होती. यावेळी त्यांना 'आप'ने उमेदवारी दिली. आपचे नेते योगेंद्र यादव यांची सभा आणि मेधा पाटकर यांचा 'रोड शो' वगळता भापकर यांच्या प्रचारार्थ 'आप'कडून कोणीही आले नाही.
फक्त श्रीरंग बारणेच्या घरी गर्दी, इतरत्र अक्षरशः स्मशानशांतता
असं म्हणतात की जहाज बुडू लागले की त्यावरील उंदीर पळ काढू लागतात. तीच गत आज पिंपरी-चिंचवड मध्ये दिसून आली. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे घर वगळता इतरत्र अक्षरशः स्मशानशांतता जाणवत आहे. जसजसे निकालाचे आकडे जाहीर होऊ लागले तसे पराभवाच्या वाटेवर निघालेल्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.
राष्ट्रवादीचा माज मोडला - आढळराव
शिरुर मतदार संघात 'हॅटट्रीक' साधणारे आपण पहिले खासदार ठरलो आहोत. आपल्या विरोधात राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी सभा घेतल्या. खालच्या पातळीवर जावून प्रचार केला. मात्र, आपल्या पारड्यात भरभरुन मतांचे दान टाकून मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा माज मोजला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नोंदविली.
Subscribe to:
Posts (Atom)