Monday, 23 June 2014

Ragpickers to protest against school fees

The association plans to hold a sit-in agitation outside the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on June 25.

Online CAP form submission now on till tomorrow

The deadline to submit the forms for the online centralised admission process (CAP) for standard XI in junior colleges in the city and Pimpri Chinchwad has been extended up to 5pm on June 24

एलबीटीच्या उत्पन्नात कमालीची घसरण

पिंपरी, दि. 21 (प्रतिनिधी) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) उत्पन्नात जून महिन्यात कमालीची घसरण झाली आहे. 65 कोटी 28 लाख रुपयांचे उत्पन्न एलबीटी विभागाला मिळाले असून गतवर्षीच्या तुलनेत यावेळी तब्बल 17 कोटी 51 लाख रुपयांची घट झाली. अंमलबजावणी सुरु झाल्यापासून तेरा महिन्यानंतर प्रथमच उत्पन्नाने निचांक गाठल्याने प्रशासनाच्या पोटात गोळा आला आहे. 

सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार करसंकलन कार्यालये

पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) ­ - नागरिकांना कर भरणे सोयीचे व्हावे, यासाठी महापालिका करसंकलन विभागामार्फत सार्वजनिक व साप्ताहीक सुटीदिवशीही सकाळी नऊ ते  दुपारी साडेतीनपर्यंत सर्व करसंकलन विभागीय कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. 

पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे गुन्हेगारी वाढली - बारणे

पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आकुर्डीत बोलताना केली.

‘बँड बाजा’ पथक बंद करा - लक्ष्मण जगताप

मोठय़ा थकबाकीदारांकडे दुर्लक्ष करून गोरगरीब नागरिकांच्या घरासमोर बँड बाजा वाजविला जातो, हे ‘बँड बाजा’ पथक तातडीने बंद करावे, अशी मागणी माजी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली.

दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा पिंपरीत रेल्वे रोको

    पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) - भाजप सरकारने रेल्वेच्या प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाड्यात वाढकेल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पिंपरी रेल्वे स्थानक याठिकाणी रेल्वेरोको आंदोलन केले. त्यामुळे सुमारे पंधरा मिनिटे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला.रेल्वेच्या प्रवासी भाड्यात 14.2, तर मालवाहतुकीच्या दरात 6.5 टक्के वाढ करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंदगौडा यांनी जाहीर केला. येत्या 25 जूनपासून हा निर्णय अंमलात […]

‘CCTV’बाबत प्रशासनाला जाग

‘पुणे-पिंपरी चिंचवड शहरातील मोक्याच्या ठिकाणी येत्या १५ ऑगस्टपर्यंत सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत,’ अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.