पुणे - ‘आयुष्यमान भारत’ योजनेअंतर्गत गेल्या चार महिन्यांत देशभरात साडेचौदा लाखा रुग्णांनी याचा लाभ घेतला असून, त्यासाठी १८ हजार कोटींचा खर्च केला आहे. ही योजना गरिबांना समर्पित करण्यात आली आहे. रुग्णांच्या खर्चाचा ८० टक्के भार सरकार उचलत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी केले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 9 March 2019
New parking rules trigger chaos at Pune airport
The new parking regulation requiring commercial vehicles to pay Rs50 for entering the airport has put inbound flyers in a spot as cab drivers are refusing to enter the facility to avoid paying the fee.
Pune airport out of Asia-Pacific 2018 ranking
The Lohegaon airport did not make the rankings cut in the annual Airport Service Quality (ASQ) survey for 2018, conducted by Airports Council International (ACI).
जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळे सौदागरमध्ये ‘ई स्कूटर’ सेवेचा प्रारंभ
पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर हे स्मार्ट आहेच, त्यात पर्यावरणाच्या रक्षणासाठी व प्रदुषणमुक्त पिंपळे सौदागरसाठी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका शितल काटे, उषा वाघेरे यांच्या हस्ते ‘ई स्कूटर’ सेवेचा प्रारंभ करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरातील मतदार यादीत ५२ हजारांहून अधिक दुबार नावे – सचिन साठे
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार यादीत ५२ हजारांहून जास्त नावे दुबार आहेत. अशी सर्व दुबार नावे ताबडतोब वगळावीत व सुधारीत मतदार यादीनुसारच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूका घ्याव्यात अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे. तसे पत्र साठे यांनी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांना गुरुवारी दिले.
स्पकॉ टेक्नॉलॉजी कंपनीच्या वतीने घोराडेश्वर डोंगरावर स्वच्छता अभियान
एमपीसी न्यूज – स्पकॉ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चिंचवड आयोजित स्वच्छता अभियान हा उपक्रम श्री क्षेत्र घोरडेश्वर डोंगर शेलरवाडी येथे घेण्यात आला. महाशिवरात्रीनिम्मित डोंगरावर प्लॅस्टिक बॉटल, पिशव्या अनेकांन तिथेच टाकून दिल्या जातात. ह्या सर्व गोष्टींचा निसर्गाला त्रास होऊ नाही म्हणून तसेच सामाजिक भान ठेवून हा उपक्रम घेण्यात आला.
महापालिकेच्या कायदा सल्लागारपदी पुन्हा अॅड. अजय सूर्यवंशी
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कायदा सल्लागारपदी पुन्हा अॅड. अजय सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, अतिरिक्त कायदा सल्लागारपदी अॅड. अतिश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. सूर्यवंशी यांना दरमहा 50 हजार रुपये तर लांडगे यांना 35 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्तावाला स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.
महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात ४०० महिलांनी घेतला मोफत चहाचा आस्वाद
दोन उच्च शिक्षित तरुणांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत येथे लहान मुलीपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत चहा मोफत ठेवला आहे. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल ४०० पेक्षा जास्त महिलांनी याचा आस्वाद घेतला आहे.हा उपक्रम रत्ना अमृतुल्य ने ठेवला असून त्याचे मालक संकेत चौगुले आणि अक्षय राऊत आहेत. दोघे ही उच्च शिक्षित असून समाजच देणं लागतो या भावनेतून महिलांसाठी उपक्रम राबवण्याचे ते सांगतात.
नावीन्यपूर्ण कंपन्यांसाठी ‘सहयोग’मध्ये मार्गदर्शन
पुणे - नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित ‘स्टार्ट-अप’ कंपन्यांना मार्गदर्शनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून दोन दिवसांची ‘सहयोग’ परिषद सुरू झाली. महाराष्ट्रातील स्टार्ट अप कंपन्या आणि महाविद्यालयांमधील इनोव्हेशन कक्षांचे प्रमुख परिषदेत सहभागी आहेत.
पीएमआरडीएच्या १७२२ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजुरी
मुंबई : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सन २०१९-२० साठीच्या १७२२ कोटी १२ लाख इतक्या अंदाजपत्रकास आज मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अंदाजपत्रकामध्ये रिंगरोड, नदी सुधार, पाणीपुरवठा, नगर रचना योजना व हायपरलूपच्या विकासकामासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
पुणे – भामा-आसखेडचा मार्ग मोकळा
पुणे – भामा-आसखेड या महत्त्वकांक्षी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनी भूसंपादनाच्या मोबदल्यात हेक्टरी 15 लाख रुपये घेण्यास मान्यता दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाच्या उर्वरित कामाचा मार्ग मोकळा झाला आहे, हे काम येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प महापालिका प्रशासनाने सोडला आहे.
पुणे – रिंगरोड, नदी सुधारसह हायपरलूपला प्राधान्य
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) 2019-20 या आर्थिक वर्षातील 1 हजार 722 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात प्रामुख्याने रिंगरोड, नदी सुधार व पाणीपुरवठा योजना, टीपी स्कीमधील विकास कामे, पूल रस्ते यांसोबत हायपरलूपसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. “पीएमआरडीए’च्या विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने पायाभूत सुविधा व आर्थिक विकासाचा वेग वाढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुणे – तातडीच्या भूसंपादनासाठी हवेत 1,300 कोटी रु.
पुणे – महापालिकेच्या रस्ते तसेच प्रमुख प्रकल्पांच्या तातडीच्या भूसंपदानासाठी तब्बल 1,300 कोटी रुपयांच्या निधीची गरज असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने मुख्यसभेत दिली. अवघ्या 12 प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी हा निधी लागणर असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत 24 जणांना पेन्शन मंजुरी पत्र वाटप
पिंपरी – जागतिक महिला दिनानिमित्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत २४ विधवा, अपंग व वयोवृद्ध नागरिकांना पेन्शन मंजूरीची पत्रे पिंपरी येथे वाटप करण्यात आली. आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते ही पत्रे वाटप करण्यात आली. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विधवा १४, अपंग ५, वयोवृद्ध ५ अशा एकूण २४ जणांचा पेन्शन मंजूर झालेल्यांमध्ये समावेश आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात पालिका पिछाडीवर; जबाबदार अधिकारी, पदाधिका-यांचा निषेध
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वच्छतेबाबत केवळ तीन वर्षांत शहराची अवस्था इतकी वाईट झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ४ ते ३१ जानेवारी दरम्यान सर्वेक्षण झाले. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण यादी (दि. ६) जाहिर झाली. त्यामध्ये यंदा शहराची घसरण झाली आहे. याला जबाबदार अधिकारी आणि सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांचा माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी तिव्र निषेध केला आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळे सौदागरमध्ये तेजस्विनी बससेवा सुरू, आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी :– जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नगरसेविका निर्मलाताई संजय कुटे आणि नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांच्या प्रयत्नातून पिंपळे सौदागर येथील महिलांसाठी ‘स्वतंत्र तेजस्विनी बस’ सेवा सुरू करण्यात आली आहे. या तेजस्विनी बसचे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
Subscribe to:
Posts (Atom)