Tuesday, 29 April 2014

टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टचे ऑनलाईन बुकिंग

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागातर्फे चालविण्यात येणा-या टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टचे ऑनलाईन बुकिंग बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन बुकिंग महानगरपालिकाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती क्रिडा विभागाचे प्रशासन अधिकारी सुनील थोरवे यांनी दिली.

'वायसीएम'मध्ये 1 मे पासून राजीव गांधी जीवनदायी योजनेची अंमलबजावणी

370 आजारांवर मोफत उपचार मिळणार 
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) येत्या 1 मे पासून राजीव गांधी जीवनदायी योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये 370 आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत. महापालिकेच्या उर्वरित 7 रुग्णालये व 22 दवाखान्यांमध्ये शहरातील दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे.

पिंपरी पालिकेच्या क्षेत्रीय समित्यांत ‘महिला राज’

पिंपरी पालिकेतील सहा क्षेत्रीय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत सहापैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडले गेले. सहावी जागा काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीने ‘मोठे मन’ दाखवले.

जगताप गटाची बाजी

पिंपरी : महापालिकेच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या (प्रभाग समिती) सभापतिपदाच्या निवडणुकीत सुभद्रा ठोंबरे (अ प्रभाग), शेखर ओव्हाळ (ब), सोनाली जम (क), आरती चोंधे (ड), सुरेखा गव्हाणे (ई) आणि वनिता थोरात (फ) यांची निवड झाली. लोकसभा निवडणुकीत घडलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद या निवडणुकीत उमटले. आमदार लक्ष्मण जगताप सर्मथंकांनी तीन जागांवर बाजी मारली. ब प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीवर मतदानाला सामोरे जाण्याची वेळ आली. 

आंब्याच्या किमती आल्या आवाक्यात

पिंपरी : अक्षय तृतीया सणामुळे शहरात मोठय़ा प्रमाणात आंब्याची आवक झाली आहे. त्यामुळे आंब्याचे भाव घटले असून, तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. अक्षय तृतीयेला सर्वांनाच आंब्याची चव चाखता येणार आहे. 

पुुन्हा आपल्याच शाळेत अर्ज भरावा

पिंपरी : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत असून, आतापर्यंत एकूण ३५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये पुणे शहराचीही संख्या आहे. शहरातील सुमारे १0 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. अर्ज स्वीकारले गेले नाहीत, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आपल्याच शाळेत अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.