Monday, 22 January 2018

“स्मार्ट सिटी’साठी पंधरा कंपन्या इच्छुक

पिंपरी – केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात पायाभूत विकास कामे करण्यासाठी महापालिकेने दोन निविदा प्रसिध्द केल्या आहेत. त्यात 15 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांचे सादरीकरण पाहून कामातील गुणवत्ता व नाविन्यतेवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भर दिला आहे. सादरीकरणासाठी इच्छुक कंपन्यांना 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Wet waste collection to stop in April

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will soon stop accepting wet waste from bulk garbage generators such as housing societies, hotels, colleges and restaurants.

More FSI for Yashwantrao Chavan hospital in Pimpri

PIMPRI CHINCHWAD: Civic-run Yashwantrao Chavan Memorial Hospital at Sant Tukaramnagar in Pimpri will soon have a postgraduate institute, night shelters, multi-level parking space and a canteen, among others facilities as the state government has granted it an additional FSI of 0.5

पिंपळे सौदागरमधील बोरा पार्क सोसायटीत MNGL गॅस लाईनचा शुभारंभ

पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील बोरा पार्क सोसायटीत MNGL गॅस लाईनचा शुभारंभ आज करण्यात आला. पवना सहकारी बँक व्हाईस चेअरमन जयनाथ काटे यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे तसेच सोसायटीतील पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.

संमेलनाध्यक्ष साधणार पिंपरी चिंचवडकरांशी ‘मुक्त संवाद’

पिंपरी (Pclive7.com):- दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने मंगळवार दि.२३ जानेवारी  २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता चिंचवड मोरवाडी येथे अॅटो क्लस्टर सभागृहात बडोदे येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डाॅ. लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. 

चिंचवडला रंगली संतुर बासरी वादनाची जुगलबंदी

पिंपरी (Pclive7.com):- कान आणि मन समृद्ध व्हावे, डोळे दीपून जावेत, द्रूत होत जाणाऱ्या लयीने आपलीही धडधड वाढावी..अशा तालवाद्यांच्या जुगलबंदीने शनिवारी रसिकांच्या काळजाचा ‘ठेका’ चुकवला. संतुर व बासरी अशा तालवाद्यांची स्वरांची साथ मिळाल्याने अभूतपूर्व तालाविष्कार चिंचवड येथे घडला.

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष बेततेय जिवावर

पिंपरी - दुचाकी वाहने आणि मोठमोठे रस्ते ही पिंपरी-चिंचवड शहराची ओळख झाली आहे. त्यातच वाढत्या तंत्रज्ञानामुळे, तसेच बाजारात येणाऱ्या नव्या आलिशान वाहनांमुळे प्रवास सुखाचा होत असला, तरी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. विशेष म्हणजे अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

प्रश्‍न पाठवा अाणि संसद पाहा - खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी - देशाची ध्येयधोरणे ठरविताना विद्यार्थ्यांची भूमिका सरकारपर्यंत पोचावी, या उद्देशाने मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी देशाचे धोरण निश्‍चित करणारा प्रश्‍न विचारायचा आहे. उत्कृष्ट प्रश्‍न विचारणाऱ्यास संसदेचे कामकाज पाहण्याची संधी मिळणार आहे. येत्या वीस फेब्रुवारीपर्यंत मावळ मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी प्रश्‍न पाठविण्याचे आवाहन खासदार बारणे यांनी केले आहे. 

कौमार्य चाचणी प्रथे विरोधात जनजागृती करणाऱ्यांना मारहाण

पिंपरी: लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची प्रथा कंजारभाट समाजात आहे. या प्रथेच्या विरोधात जनजागृती करणाऱ्या तरूणांना मारहाण करण्यात आली. ही घटना पिंपरी येथे रविवारी (ता.२१) रात्री घडली.

योजनांच्या लाभासाठी पालिकेकडे विक्रमी अर्ज

पिंपरी - केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडे यंदा इच्छुकांचे विक्रमी ३९ हजार ८२५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची छाननी व तपासणी नागरवस्ती विभागाने हाती घेतली असून, ते काम पूर्ण होताच पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे.

“स्मार्ट सिटी’ संकल्पनेची जनजागृती आवश्‍यक – आर. श्रीनिवास

ताथवडे – भारतात अजूनही “स्मार्ट सिटी’ संकल्पनेची सर्वसामान्य अशी व्याख्या नाही. त्यामुळे “स्मार्ट सिटी’बाबतीत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय शहरी विकास व नियोजन महामंडळाचे प्रमुख आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केले.

‘टीडीआर’ वाटपाला स्थगिती द्या

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने आठ महिन्यात वाटप केलेल्या 41 लाख 27 हजार चौरस फुटांच्या टीडीआर प्रकरणाला स्थगिती देऊन चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे.

सोसायट्यांचा ओला कचरा उचलण्यास “नकार घंटा’!

पिंपरी – शहरात 75 पेक्षा जास्त सदनिका असणाऱ्या सोसायटींचा ओला कचरा 1 एप्रिलपासून महापालिका स्विकारणार नाही, त्या सोसायट्यांना ओला कचऱ्यावर निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्यासाठी 31 मार्चची “डेडलाईन’ आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे कचरा विलगीकरण करणे व ओल्या कचऱ्यावर निर्मितीच्या ठिकाणी प्रक्रिया न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश दिले आहेत.

महाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत मॉर्डन फार्मसी प्रथम

– महापालिकेतर्फे स्वच्छ भारत सुदृढ भारत स्पर्धा
पिंपरी – स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत स्वच्छ भारत-सुदृढ भारत या विषयावर आंतर महाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत निगडीच्या मॉडर्न फार्मसी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला.

स्वच्छ मोहीम नावापुरती!

पिंपरी – देशात स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांक आणण्याचे उद्दीष्ट आयुक्‍तांनी डोळ्यासमोर ठेवून पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छ सर्वेक्षणावर जनजागृती करुन त्यांचा डांगोरा सर्वत्र पिटला; परंतु शहरात स्वच्छतेचा बोऱ्या वाजला असून जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचलेले दिसत आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण मोहीम केवळ कागदोपत्री राबवली जात असल्याचे दिसून येत आहे.

वित्तीय संस्थांनी केली मेट्रो कामाची पाहणी

पुणे – मेट्रोचे काम जलदगतीने होण्याची सुचिन्हे दिसत असून युरोपियन इन्व्हेस्टमेन्ट बॅंक (ईआयबी) आणि फ्रेंच डेव्हलपमेन्ट एजन्सी (एएफडी) या दोन्ही वित्तीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मेट्रो प्रकल्पाची शनिवारी एकत्रित पाहणी केली.

कामातील गुणवत्तेसाठी सल्लागारांची गरज – आयुक्‍त

पिंपरी – विकास कामांमधील नाविन्यता जपण्यासाठी सल्लागारांची पालिकेला आवश्‍यकता आहे. अभियंत्यांची कमतरता असल्यामुळे प्रत्येक प्रभागासाठी एकच अभियंता नियुक्त केला आहे. त्यामुळे कामातील नाविन्यता आणि गुणवत्ता जपण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करावीच लागते, असे स्पष्टीकरण आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

आयुक्‍त भाजपची वकिली करताहेत?

विरोधी पक्षनेते बहल यांचा आरोप: भ्रष्ट कारभाराला मुख्यमंत्री, पालक मंत्र्याची मूक संमती
पिंपरी  – ना भय ना भ्रष्टाचार, स्वच्छ व पारदर्शक कारभाराच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने महापालिकेत सत्ता मिळविली, मात्र, अवघ्या दहा महिन्यात सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराचे मुखवटे उघड होवू लागले, 425 कोटींच्या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला हे उघड सत्य असताना, त्या प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी आयुक्त श्रावण हर्डीकर हे “एसएसआर’मध्ये 15 टक्के दर कमी करुन पालिकेची 30 कोटींची बचत केल्याचा बनाव करीत आहेत.

फरार भाजप नगरसेवक महासभेला हजर

पिंपरी – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील भाजप नगरसेवक तुषार हिंगे हे गेल्या दोन महिने महापालिकेच्या सभागृहात महासभेला गैरहजर होते. त्यांच्या पत्रानुसार विधी समितीने त्यांना दोन महिन्यांची रजा मंजुरी दिली होती. परंतु, हिंगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल असताना ते पोलीस रेकॉर्डवर फरार घोषित झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना न सापडणारे नगरसेवक हिंगे हे नगरसेवक पद वाचविण्याकरिता शनिवारी (दि.20) सभागृहात महासभेच्या “मस्टर’वर हजर झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना न सापडणारे हिंगे महापालिकेत प्रकट झाल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.