MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 15 May 2020
पिंपरी चिंचवडसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, उद्योग सुरू करण्यास परवानगी
पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक मोठे उद्योग आहेत. राज्याचं अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
‘उद्योग’नगरी येणार लवकरच रुळावर
स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न
उद्योग सुरु करण्यास राज्य शासनाकडून परवानगी
लहान व्यवसायासाठी उत्तम ‘छोटं कर्ज’, सरकार व्याजावर देतय 2% सवलत !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लघु उद्योगांची पुनर्बांधणी करण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने शिशु लोनच्या व्याज दरावर सूट जाहीर केली आहे. शिशु लोन योजना मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी मुद्रा योजनेचा एक भाग आहे. जर तुम्ही बँकेकडून शिशु कर्ज घेतले असेल किंवा ते घेण्याचा विचार करत असाल तर मोदी सरकारच्या नव्या घोषणेचा तुम्हाला फायदा होईल. शिशु कर्ज अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे. याचा उद्देश छोट्या स्तरावर व्यवसाय करणार्यांना मदत करणे हा आहे.
शहरातील 49 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; आकुर्डी, जुनी सांगवीतील ‘हा’ परिसर सील
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 49 कोरोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर सकाळी पॉझिटिव्ह रुग्ण आलेल्या आकुर्डी, जुनी सांगवीतील काही परिसर सील करण्यात आला आहे. महापालिका रुग्णालयात सक्रिय 57 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील 183 आणि शहराबाहेरील 20 अशा 203 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. […]
प्रत्येक राज्यात लागू होणार ‘वन-नेशन वन-रेशन कार्ड’ योजना- निर्मला सीतारामन
देशातल्या प्रत्येक राज्यात वन-नेशन वन रेशन कार्ड योजना लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातली घोषणा केली. या योजनेचा फायदा ६७ कोटी लोकांना फायदा होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ही योजना लागू झाल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही कार्ड धारकाला देशातल्या कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेण्याची मुभा असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
पिंपरी-चिचवड शहरातील घरभाडय़ाचा व्यवसाय आर्थिक अडचणीत
कामगार मूळ गावी; खोल्या रिकाम्या झाल्यामुळे मालकांवर भाडेकरु शोधण्याची वेळ
महावितरणच्या मिस्ड कॉल सुविधेला ग्राहकांकडून प्रतिसाद; 23 दिवसात 53 हजार नागरिकांची तक्रार
वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी वीजग्राहकांना मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ची सोय महावितरणने नुकतीच उपलब्ध करून दिली. यामध्ये गेल्या 23 दिवसांत राज्यातील 53 हजार 160 वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’, तर 1 हजार 583 वीजग्राहकांनी ‘एसएमएस’ सुविधेचा वापर करीत वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार दाखल केली आहे. आधुनिक जीवनाशी सुसंगत व अत्यंत सुलभ सेवा देण्यासाठी महावितरणने आधुनिक […]
Subscribe to:
Posts (Atom)