MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 2 September 2012
This machine’s bringing down the house
This machine’s bringing down the house: The machine was brought in from Mumbai on Friday morning, but developed a technical snag which took hours to fix - Once the snag was dealt with, PCMC’s anti-encroachment department got to work. The buildings were contructed by Bhima Aswani and Jitu Wadhwani...
Online booking for civic grounds, badminton courts
Online booking for civic grounds, badminton courts: The citizens and organizations from Pimpri Chinchwad will be able to book the playgrounds and badminton halls of Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) online.
Advanced poclain to PCMC’s rescue
Advanced poclain to PCMC’s rescue: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) demolished a six-storeyed building in the flood line at Pimprigaon with the help of a 27-metre high poclain machine on Friday. The PCMC used the advanced equipment for the first time to raze illegal high-rise buildings
बहुमताच्या जोरावर जलाशय बुजविण्याचा प्रस्ताव मंजूर
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32902&To=8
बहुमताच्या जोरावर जलाशय बुजविण्याचा प्रस्ताव मंजूर
पिंपरी, 1 सप्टेंबर
वाकड येथील नैसर्गिक जलाशय बुजवून त्याठिकाणी निवासी बांधकामास परवानगी देण्याच्या प्रस्तावावर आज (शनिवारी) महापालिका सभेत जोरदार चर्चा झाली. आर्थिक हितसंबंधातून नैसर्गिक जलाशय बुजविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी मतदानाची मागणी केली. या प्रस्तावाच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 59 तर प्रस्तावाच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि मनसेच्या 20 सदस्यांनी मतदान केले. बहुमताच्या जोरावर अखेर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

थकित पाणीपट्टीवर 12 % व्याज, 20 % दंड पाणीबिलांच्या अभय योजनेला महासभेची मंजुरी
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32895&To=7
थकित पाणीपट्टीवर 12 % व्याज, 20 % दंड पाणीबिलांच्या अभय योजनेला महासभेची मंजुरी
पिंपरी, 1 सप्टेंबर
पाणीबिलाच्या प्रचलित पध्दतीमुळे गेल्या तीन वर्षात पाणीबील वसुलीचे प्रमाण 30 % आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी 'अभय योजना' लागू करण्याच्या प्रस्तावाला व्याज आणि दंड रक्कम कमी करण्याच्या उपसूचनेसह आज (शुक्रवारी) महापालिका सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, मूळ पाणीपट्टी रकमेवर वार्षिक 12 % सरळ व्याज आणि 20 % दंड आकारणी केली जाणार आहे.

नगररचना विभागाच्या कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांची आगपाखड
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32894&To=10
नगररचना विभागाच्या कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांची आगपाखड
पिंपरी,12 ऑगस्ट
महापालिकेचा नगररचना आणि विकास विभागातील अधिकारी केवळ पैशाच्या तालावर नाचतात, ठराविक बिल्डरांसाठी काम करतात सर्वसामान्यांना टीडीआर वाटप करताना त्रास देतात, टीडीआर विकणा-यांची साखळी तयार झाली असून भूसंपादन प्रक्रियेत अडथळे आणतात, अशा शब्दात सर्वपक्षीय नगरसेवकांनी नगररचना विभागाच्या कारभारावर आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ताशेरे ओढले. त्यावर भूसंपादनाची प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रक्रियेचा वेळ कमी करण्यासाठी प्रयत्न करु असे सांगत नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करुन भूसंपादनाची प्राधान्य यादी ठरविणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.

पबंदी कायद्याला राज्यातील पालिका कर्मचा-यांचा विरोध
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32889&To=9
पबंदी कायद्याला राज्यातील पालिका कर्मचा-यांचा विरोध
पिंपरी, 1 सप्टेंबर
प्रत्येक मनुष्याला स्वातंत्र्याचा हक्क असल्याचे आपण मान्य केले आहे, त्यामुळे प्रत्येक कामगाराला संप करण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच घेतली होती. त्यामुळे राज्य शासनाचा संपबंदीचा कायदा करणे म्हणजे डॉ. आंबेडकरांचा अपमान करण्यासारखे आहे. तरी शासनाने याबाबतचा कायदा संपूर्णपणे रद्द करावा, अशी मागणी राज्यातील महापालिका-नगरपालिका कामगार संघटनांच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आली.

पवना नदीकाठी आढळले स्त्री जातीचे अर्भक
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32888&To=1
पवना नदीकाठी आढळले स्त्री जातीचे अर्भक
पिंपरी, 1 सप्टेंबर
थेरगावजवळील पवना नदीच्या काठी दहा दिवसापूर्वी जन्मलेले एक नवजात स्त्री अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास रिव्हर व्ह्यु हॉटेलजवळ हे अर्भक आढळले.

भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी ; तिघे जखमी
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32882&To=6
भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी ; तिघे जखमी
पिंपरी, 1 सप्टेंबर
भाजप नगरसेवक शीतल शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मनीषा पवार व त्यांचे पती माजी नगरसेवक काळूराम पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्ववैमनस्यातून आज सकाळी नऊच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. तीन वाहनांची तोडफोड करत पवार यांच्या सुमारे 25 कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांवर तलवार, काठ्या, दगडांनी हल्ला चढविला. त्यात भाजपचे सात कार्यकर्ते जखमी झाले असून त्यापैकी तीनजण गंभीर जखमी आहेत.

चिंचवड येथे सोमवारी मेघमल्हार महोत्सव
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32880&To=8
चिंचवड येथे सोमवारी मेघमल्हार महोत्सव
पिंपरी, 1 सप्टेंबर
पिंपरी-चिंचवड शहरात शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने नृत्यकला मंदिर आणि अनिंदो चटर्जी म्युजिक फाऊंडेशन यांच्या वतीने सोमवारी, 3 सप्टेंबर रोजी मेघ मल्हार संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या महोत्सवाचे संयोजिका तेजश्री अडिगे यांनी दिली. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे.

औषधांच्या टाकाऊ पाकिटांपासून 'ज्वेलरी' !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32879&To=5
औषधांच्या टाकाऊ पाकिटांपासून 'ज्वेलरी' !
पिंपरी, 1 सप्टेंबर, <b>निशा पाटील</b>
दागिने म्हटले महिलांचा 'विक पॉईंट' !. मॅचिंग आणि जरा हटके स्टाईल असलेली आर्टीफिशिअल ज्वेलरी घालायला सर्वांनाच आवडते. हाताच्या बांगड्यांपासून ते डोक्यावरील बिंदीपर्यंत ही सगळी ज्वेलरी औषधांच्या टाकाऊ पाकिटांपासून बनविली असेल तर ? त्याची कल्पनाही करणे शक्य नसले तरी निगडी येथील बहुआयामी कलाकार सरोज राव औषधांची पाकिटेच काय, अगदी खोकल्याच्या औषधांच्या बाटल्या, सलाईनची बाटली, खोकी यांपासून विविध दागिने तसेच शोभेच्या वस्तू तयार केल्या आहेत. त्याच्या त्यांनी महाराष्ट्रभर कार्यशाळा देखील घेतल्या आहेत.

Subscribe to:
Posts (Atom)