Tuesday, 19 June 2018

State okays land transfer for new CoEP campus

PIMPRI CHINCHWAD: The state government has approved the transfer of around 30 acres of land in Chikhli to the College of Engineering Pune (CoEP) for campus expansion.

रावेतमध्ये पुराचा धोका

पिंपरी - रावेतमध्ये पवना नदीपात्रात सर्रास भराव टाकण्यात येतो. त्यामुळे नदीचा श्‍वास कोंडत आहे. नाल्यातही भराव टाकण्यात आला आहे. येथे टाकलेल्या भरावावर दुकानेही थाटली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पूर आल्यास अपघाताचा धोका संभवतो. 

रासायनिक पदार्थांसाठी क्‍लस्टर उभारा

पुणे - ऑटो क्‍लस्टरच्या धर्तीवर रासायनिक पदार्थांसाठीही स्वतंत्र क्‍लस्टर उभारण्यास सरकारने पुण्यात जागा द्यावी, अशी मागणी पुणे केमिकल डीलर्स असोसिएशनने केली आहे. तसेच शहरात रासायनिक झोन निर्माण करून कायद्यातही सुसूत्रता आणावी, अशी मागणीही या संघटनेने केली.

‘बीआरटी’चा मार्ग खुला, पीएमपीएमएल बसचा अडथळा झाला दूर

पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या रावेत ते औंध बीआरटी या मार्गावर डांगे चौकात वाकड फाटा येथे उड्डाणपुलाखाली बीआरटीएस मार्गावर रिक्षाचालकांनी रिक्षा थांबा तयार केल्याने येथे दिवसभर रिक्षा उभ्या केल्या जात होत्या.

Open the path of 'BRT' | ‘बीआरटी’चा मार्ग खुला, पीएमपीएमएल बसचा अडथळा झाला दूर

ग्रेडसेपरेटरमधील काँक्रिटच्या रस्त्याला तडे

पिंपरी - काँक्रिट रस्ता जास्त काळ टिकतो, असे म्हणतात. मात्र, कासारवाडी ते एम्पायर इस्टेटकडे जाणाऱ्या ग्रेडसेपरेटरमधील काँक्रिटच्या रस्त्याला तडे जाण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्‍यता आहे. 

कासारवाडी ते पिंपरी दरम्यानच्या कॉंक्रीट रस्त्याला तडे

ग्रेड सेपरेटर मधील कासारवाडी ते पिंपरी दरम्यानच्या रस्त्यावर मेट्रोचे खांब उभारणीचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्याला तडे गेलेले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. काही ठिकाणी कॉंक्रीटचा रस्ताच उखडला असून रस्त्याचा समतोल बिघडला आहे. त्याची ही चित्रमय झलक टिपली आहे सकाळचे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.

पिंपळे गुरव येथे योग सप्ताह संपन्न

नवी सांगवी (पुणे) - येथील ओम नमो: चिकित्सालय व ओम नमो: परिवर्तन परिवार यांचे वतीने योग सप्ताह निमित्त नुकतेच मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे गुरव येथील चिकित्सालयात पार पडलेल्या कार्यक्रम प्रसंगी योगासनांच्या प्रात्यक्षिकासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पितृ दिन साजरा करण्यात आला. 

वल्लभनगर आगारात मुक्‍कामी चालक, वाहकांचे हाल

पिंपरी – शेकडो मैल प्रवास करुन मुक्कामी आलेल्या एसटी वाहक-चालकांना वल्लभनगर एसटी आगारातील विश्रांतीगृहात कसल्याही प्रकारच्या सोयी-सुविधा नसल्या कारणाने कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. येथील अस्वच्छता तसेच स्नानगृह, स्वच्छतागृहाची झालेली दुरावस्था यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे.

पीएमपीएमएलचे कामगारच करणार बससेवेचा ” जागर’

पुणे; दि. 18- पीएमपीएमएल प्रशासनाला मिळणारा महसूल आणि दिवसेंदिवस वाढत चाललेला महसूल यामध्ये कमालीची तफावत निर्माण झाली आहे, त्यामुळे आर्थिक डोलारा सावरताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचा आगामी काळात विपरीत परिणाम होउ नये यासाठी आता खुद्द कामगारांनीच पुढाकार घेतला आहे, त्याचाच एक भाग म्हणून प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी इंटक या कामगार संघटनेकडून प्रवाशांमध्ये या बससेवेच्या बद्दल ” जागर’ करण्यात येणार असून पीएमपीएमएलने प्रवास करण्याच्या संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. संबधित कामगारांचा गट तयार करुन त्यांच्यावर डेपोनिहाय जबाबदारी देण्यात येणार आहे.

ऍड. ससाणे यांची पाण्याखाली योगासने

पिंपरी : आरोग्य वृद्धीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासने करत असतील. परंतु, कोणताही ऑक्‍सिजन मास्क अथवा उपकरण न वापरता मागील दोन वर्षांपासून साताऱ्याचे ऍड. सुधीर ससाणे पाण्याखाली योगासने करण्याचा करिष्मा करत आहेत. नेहरूनगर येथील जलतरण तलावावर शनिवारी त्यांनी हीच योगासने सर्वांसमोर करून दाखविली. 

स्नेहवनच्या मुलांबरोबर रोझलँण्ड सोसायटीने साजरा केला पितृदिन

नवी सांगवी (पुणे) : पितृदिनाचे औचित्य साधून पिंपळे सौदागर येथील रोझलँण्ड सोसायटीच्या वतीने सायकल दान हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भोसरी येथील ' स्नेहवन ' या संस्थेतील मुलांना जुन्या परंतु वापरात असलेल्या पंधरा सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी दुसरी ते दहावी या इयत्तेत शिकणारी पंचवीस मुलांना खाऊ वाटपही करण्यात आले. तसेच या मुलांनी सोसायटीच्या बागेत खेळण्याचा आनंदही लुटला.

भोसरीत पुन्हा वाहनांची तोडफोड

पिंपरी (पुणे) : भोसरीतील आदिनाथ नगर भागात आठ दिवसांपूर्वी वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली होती. त्याच ठिकाणी पुन्हा आठ गाड्यांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गैरप्रकारांमुळे “बर्ड व्हॅली’ बदनाम

पिंपरी – महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून बर्ड व्हॅलीसारखे शहरातील उत्कृष्ट असे पर्यटन केंद्र विकसित केलेले आहे. परंतु, हे पर्यटन केंद्र गुन्हेगारीशी संबधित घटना व दैनंदिन होणाऱ्या गैरप्रकारांमुळे बदनाम होत आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ प्रभागाच्या अध्यक्षा व नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी म्हटले आहे. तसेच, हे गैरप्रकार रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रिंगरोडच्या जमीन मोजणीला विरोध

हिंजवडी - पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आखलेल्या प्रस्तावित ११० मीटरच्या रिंगरोडला जमीन देण्यास माणच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या रिंगरोडची आखणी करण्यासाठी होणाऱ्या मोजणीला कायदेशीर विरोधाबरोबर प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १८) झालेल्या गावबैठकीत घेतला. 

आंदोलनकर्त्यांकडून विद्यार्थ्यांची अडवणूक

पिंपरी - प्रेमलोक पार्क येथील शाळेचे स्थलांतर दळवीनगर परिसरातील नवीन इमारतीमध्ये करण्यात आले. मात्र नवीन शाळेत येताना पालक व विद्यार्थ्यांची रस्त्यातच अडवणूक केली जाते. त्यांना दमदाटीही केली जाते. यामुळे सोमवारी शाळेत अवघी १४ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

मंचरकरांना राजकीय वादातून गोवले

पिंपरी : महिलेवरील गोळीबार प्रकरणात अॅड. सुशील मंचरकर यांना राजकीय वादातून गोवले आहेर. असा दावा राष्ट्रवादीच्या नगरसेविका गीता मंचरकर यांनी सोमवारी (ता.18) पत्रकार परिषदेत केला. विरोधी पक्षनेतेच्या दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने उपस्थित होते. पिंपरी, एच.ए.वसाहतीमध्ये एका महिलेवर 9 जून रोजी अज्ञातांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी ऍड. सुशील मंचरकर यांना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली आहे. 

महासभेत भाजपची सत्वपरीक्षा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापलिकेची तहकूब आणि मासिक सर्वसाधारण सभा येत्या बुधवारी (दि. 20) होत आहे. यामध्ये शहरातील सार्वजनिक वाहनतळ धोरण आणि शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांबाबतची प्रश्‍नोत्तरे असे अडचणीत आणणारे दोन विषय आहेत. सत्ताधारी भाजपच्याच काही नगरसेवकांचा अशा यापुर्वीच्या वादग्रस्त विषयांना विरोध असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपचीच सत्वपरीक्षा ठरणार आहे.

भोसरीच्या मैदानात इरफान सय्यद यांची उडी?

पिंपरी – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांचे एकेक चेहरे समोर येत आहेत. महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करत भोसरी विधानसभेच्या मैदानात उडी घेतल्याची चर्चा आहे. मतदार संघात सर्वत्र फ्लेक्‍स लावत तब्बल सात दिवस कार्यक्रम राबवल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.

दरवर्षी पदवीदान करणे विद्यापिठांसाठी अनिवार्य

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून विद्यापिठांना लेखी सूचना 
नवी दिल्ली – देशातील विद्यापिठांनी दरवर्षी पदवीदान करणे अनिवार्य करण्याबाबतची सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. काही विद्यापिठांकडून दरवर्षी पदवीदान कार्यक्रम केला जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही लेखी सूचना करण्यात आली आहे. विद्यापिठांनी दरवर्षी नियमितपने पदवीदान कार्यक्रम केलाच पाहिजे. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी हा मोठा महत्वाचा आणि त्यांच्या कुटुंबियांना आनंद वाटावा असा हा सोहळा असतो, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विद्यापिठांनी यापूर्वी पदवीदान समारंभ कधी केला आहे, त्याचा तपशीलही सादर करण्याच्या सूचना मंत्रालयाने केल्या आहेत.