Thursday, 14 February 2019

PCMC to appoint pvt consultant for survey

Pimpri Chinchwad: The civic body is looking to hire a consultant to conduct town-planning surveys for a period of three years.

पहिला सौरऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन; दरमहा ६०० पेक्षा जास्त युनिटची होणार बचत

एमपीसी न्यूज – केशवनगर चिंचवडमध्ये काकडे टाऊनशीप आय आणि जे सोसायटीमध्ये पहिला सौरऊर्जा प्रकलपाचे उदघाटन महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांच्या हस्ते करण्यात आले. 

ज्ञानप्रबोधिनीत शुक्रवारी राज्यस्तरीय पारितोषिकांचे वितरण

एमपीसी न्यूज – प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विद्यार्थी समूहगायन, अध्यापक समूहगायन, सूर्यनमस्कार आणि श्रमदान या राज्यस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. ज्ञानप्रबोधिनी निगडी येथील मनोहर वाढोकार सभागृह येथे दि. १५ फेब्रुवारीला दुपारी साडे चार वाजता या सर्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण होणार आहे.

महापालिकेचा 37 वा अर्थसंकल्प सोमवारी होणार सादर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2019-2020 या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या सोमवारी(दि.18) सकाळी साडेअकरा वाजता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समितीला सादर करणार आहेत. पिंपरी पालिकेचा हा 37 वा तर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. शहरवासियांसाठी कोणते नवीन प्रकल्प, योजना या अर्थसंकल्पात असणार आहेत. 

अभुतपूर्व आणि अतुलनीय ठरलेली ‘इंद्रायणी थडी’..!

पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडणारा आणि आपल्याला बालपणातील गावाशी पुन्हा जोडून अंतर्मुख करायला लावणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव भरविण्यात आला होता. शिवांजली सखी महिला मंचाच्या अध्यक्षा पूजा महेश लांडगे यांचा व त्यांच्या महिला सहकाऱ्यांचा देखील सक्रिय सहभाग असलेला हा महोत्सव भोसरीमधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान नागरिकांच्या अलोट गर्दीत, त्यांनी तेथे असलेल्या विविध उपक्रमांचा मनसोक्त आनंद लुटल्यामुळे न भूतो न भविष्यती अशाप्रकारे यशस्वी झाला. यंदा हे या उपक्रमाचे पहिलेच वर्ष होते. पण यापूर्वी झालेल्या कोणत्याही जत्रेत अशा प्रकारचा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवायला मिळाला नव्हता हे या जत्रेचे विशेष म्हणायला हवे. या चार दिवसांच्या कालावधीत एकूण पाच लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी या इंद्रायणी थडीला भेट दिली. 

निगडी परिसरात अवैध धंदे राजरोसपणे सुरु

एमपीसी न्यूज – निगडी आणि देहूरोड परिसरात अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. यामुळे परिसरात गुन्हेगारी आणि सामाजिक अशांतता पसरत आहे. याबाबत जन क्रांती सोशल फाउंडेशनच्या वतीने आज (गुरुवारी) पिंपरी येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

भजन, किर्तन, प्रवचनांतून घडते संस्कृतीसह तत्वज्ञानाचे दर्शन – डॉ. रामंचंद्र देखणे

एमपीसी न्यूज – अध्यात्म, संस्कृती आणि लोकजीवन यांचे जवळचे नाते आहे. लोकजीवनात मंदिराचे स्थान महत्वाचे आहे. मंदिर हे ज्ञानाचे केंद्र आहे. मंदिरातील भजन, किर्तन प्रवचनांतून संस्कृतीचे आणि तत्वज्ञानाचे दर्शन सर्वसामान्यांना घडते, असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी सांगवीत केले. 

इंद्रायणी थंडीने खवय्यांसह भूकेलेल्यांची भागवली भूक

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या इंद्रायणी थडीने खवय्यांची हौस भागवली. त्याचबरोबर भूकेलेल्यांची देखील भूक भागवली. स्टॉलमधील उरलेले अन्नपदार्थ जमा करून चार दिवसातील वाया जाणारे अन्न चार हजार पाचशे भूकेलेल्या नागरिकांना देत त्यांची भूक भागवली. रॉबिन हुड आर्मी या संस्थनेने हा स्तुत्य उपक्रम राबविला.

धनगर आरक्षणावर सरकारचे डोळे उघडण्यासाठी रविवारी पिंपरीत जाहीर सभा

एमपीसी न्यूज – धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणासंदर्भात सरकारचे डोळे उघडण्यासाठी सकल धनगर समाज पिंपरी-चिंचवडच्या वतीने येत्या रविवारी (दि. 17) पिंपरीत जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती सकल धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (गुरुवारी) काळेवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रविवारी सायंकाळी साडेचार वाजता ही सभा होणार आहे.

Pimpri : पीएमपीलाचा संचलन तुटीचा मंजूर केलेला विषय स्थगित ठेवा – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएलचे) अधिकारी पिंपरी महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिका-यांना सन्मानपुर्वक वागणूक देत नाहीत. पत्राला उत्तरे दिली जात नाहीत. त्यामुळे स्थायी समितीने संचलन तूटीपोटी पीएमपीएमएलला 15 कोटी, 84 लाख 85 हजार 851 रुपये देण्याच्या मंजूर केलेला विषय स्थगित ठेवण्यात यावा, अशी मागणी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे.

Pimpri: स्मार्ट सिटीच्या रँकमध्ये पिंपरी सव्वीसव्या स्थानी

एमपीसी न्यूज – देशभरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या 100 शहरांमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा सव्वीसवा रँक आला आहे. तर, पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर असून सिल्वासा शहर शेवटच्या क्रमांकावर आहे. पुणे शहर आठव्या क्रमांकावर आहे.  नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्प हाती घेतला आहे. देशातील 100 शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. 

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने केला विनयभंग

पिंपरी (दि. १४ फेब्रु.) :- पिंपळे सौदागर येथे थांबलेल्या महिलेचा महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने विनयभंग केला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली.

भाजपचे जेष्ठ नेते व आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन, नगरसेवक शैलेश मोरे यांची माहिती

पिंपरी (दि. १४ फेब्रु.) :- नगरसेवक शैलेश मोरे यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आझम पानसरे व शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कासारवाडीतील पालिकेच्या बहुचर्चित दवाखान्याचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने प्रभाग क्र.२०, मधील कासारवाडी कर संकलन विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यावरील नविन दवाखान्याचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांत सुरू असलेल्या श्रेयवादामुळे हा दवाखाना बहुचर्चित ठरला होता

लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पिंपळे सौदागर ते पुणे मनपा ‘तेजस्विनी’ बससेवा सुरू होणार

पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पिंपळे सौदागर ते पुणे मनपा तेजस्विनी बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.

राष्ट्रवादीने ‘स्थायी’साठी इच्छुकांचे अर्ज मागविले

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांची मुदत 28 फेब्रुवारीला संपत आहे. नवीन सदस्यांची निवड 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले आहेत.

PMC: 2-way flyover for hassle-free ride to airport

PUNE: The civic body has planned a two-way flyover at Golf Course chowk (Netaji Chowk) on Airport Road in its bid to make the junction halt-free, ensuring free flow of traffic to airport and AhmednagarRoad.

पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडी ते कात्रजपर्यंत व्हावी; चिंचवड प्रवासी संघाची मागणी

चिंचवड- पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडी ते कात्रजपर्यंत व्हावी यासाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना चिंचवड प्रवासी संघाच्यावतीने मागणीचे निवेदन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात देण्यात आले. चिंचवड प्रवासी संघाच्यावतीने पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी ही मागणी मान्य करावी, असे प्रवासी संघाच्यावतीने सांगितले. यावेळी निवेदन देताना चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, संघाचे मुकेश चुडासमा, निर्मला माने, शरद चव्हाण, नंदु भोगले आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी, जिल्ह्यातील सर्व खासदार, राज्यसभा सदस्य, आमदार, पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिकेचे आयुक्त यांना या निवेदनाची प्रत देण्यात येणार आहे.