Tuesday, 19 March 2019

दुरवस्था झालेल्या उद्यानांमध्ये अभ्यास सहली

पिंपरी - महापालिकेच्या वतीने विकसित केलेल्या पर्यावरण संस्कार आणि आयुर्वेदिक वनऔषधी उद्यानांमध्ये तब्बल एक कोटी रुपये खर्च करून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहली काढण्यात येणार आहेत. प्रत्यक्षात या उद्यानांची दुरवस्था झाली असून, या सहलीद्वारे विद्यार्थी नेमका कशाचा अभ्यास करणार आहेत, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

PCMC penalised over pollution in Pavana

To a commoner, the condition of Pavana, which passes through

Read more at:
https://punemirror.indiatimes.com/pune/civic/pcmc-penalised-over-pollution-in-pavana/articleshow/68445629.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

Pimpri : औद्योगिक नगरीला घरफोडीचे ग्रहण!

एमपीसी न्यूज – उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवसात आठ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 45 लाख 58 हजार 60 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. हा आकडा केवळ दाखल केलेल्या गुन्ह्यांचा आहे. प्रत्यक्षात परिस्थिती यापेक्षा भयानक असण्याची शक्यता आहे. सर्व गुन्ह्यातील आरोपी अज्ञात आहेत. 

Pune rail division claims all foot overbridges safe

PUNE: The Pune rail division has claimed that all the foot overbridges (FOBs) in its jurisdiction were safe but these structures would be checked agai.

PCMC to spend Rs 66 crore to get water from Andra dam

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will spend around Rs66 crore to get water from the Andra dam to its municipal ...

Sambhajinagar zoo set for makeover

Pimpri Chinchwad: The Nisargakavi Bahinabai Chaudhary zoo in Sambhajinagar is set for a facelift at Rs 5.

शहरातील 607 राजकीय फ्लेक्सवर पालिकेची कारवाई

पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड महापालिकेने राजकीय फ्लेक्स काढण्याचा चांगलाच धडाका लावला आहे. लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू झाल्यानंतर 607 राजकीय फ्लेक्स काढून टाकण्यात आले आहेत. या दैनंदिन कारवाईचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक जाहिर झाल्यानंतर आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र अतिक्रमणाच्या विळख्यात

पिंपरी चिंचवड ः गेली 45 वर्ष शहरात औद्योगिक क्षेत्र आहे. परंतु या परिसराला मूलभूत सुविधांची वानवा आहे, परिसरात लहान-मोठे पत्र्याचे शेड व बाहेरील लोक येऊन अतिक्रमणे करीत असून यामुळे औद्योगिक क्षेत्राला अतिक्रमणाचा विळखा तयार झाला आहे, याबाबत अभय भोर यांनी खंत व्यक्त केली आहे. अतिक्रमण वाढल्याने शहराचा दर्जा व औद्योगिक परिसरात गुन्हेगारी वाढून येथील उद्योजक स्थलांतर करत आहेत. लहान दुकाने, खोल्या, टपर्‍या, हातगाड्या यामुळे गुदमरलेले रस्ते टायरची दुकाने त्यामुळे उद्योजक वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

चिंचवड येथे संघ शाखेच्या वार्षिक कार्यक्रम उत्साहात

पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संत गाडगे बाबा शाखेच्या वतीने कै शिवाजी भोईर सभागृह केशवनगर चिंचवड येथे संघ शाखेचा वार्षिक कार्यक्रम आयोजित केला होता. संघ म्हणजे काय? शाखेत होणार्‍या दैनंदिन कार्यक्रमाची माहिती, संघ कार्यक्रमातून समाजभान असणारा कार्यकर्ता कसा घडतो, समाजहिताचे कार्यक्रम कसे राबविले जातात, संघ कार्यकर्ता संस्कारातून घडून समाजात कसा समाज कार्य व देश कार्य करतो आदी कार्य समाजाला कळावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बाळासाहेब लांडगे यांचा सत्कार

पिंपरी : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड़ कुस्तीगीर संघाच्या वतीने विशेष सत्कार हनुमंत गावडे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी संतोष माचुत्रे, काळुराम कवितके, राजेंद्र बालवडकर आदी उपस्थित होते.

शिरुर, मावळातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार 12 एप्रिलला

पिंपरी – शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करुन प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. वंचित बहुजन आघाडी वगळता इतर पक्षांकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु सर्वच पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तसेच प्रशासनाने देखील आपली तयारी सुरू केली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी 2 एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून याच दिवसापासून अर्ज भरण्यास प्रारंभ होईल. तसेच 9 एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे, 10 एप्रिलला अर्ज छाननी होईल आणि 12 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. त्यामुळे 12 एप्रिल रोजी निवडणुकीच्या रणांगणात किती उमेदवार असतील हे स्पष्ट होणार आहे.

मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटी

पुणे - कामगार, अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी पगारी सुटी द्यावी. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्‍य नसेल, तर किमान दोन ते तीन तासांची सवलत द्यावी, असा आदेश सरकारने काढला आहे.

नदी किनारी मिस वर्ल्डच्या उपस्थितीत महिला दिन साजरा

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णी मुक्त स्वच्छ आणि सुंदर सांडपाणी विरहित पवनामाई उगम ते संगम अभियाना अंतर्गत शहरातील दिशा फौंडेशन, पवना जलमैत्री अभियान आणि निसर्गराजा मैत्र जीवांचे आणि ग्रीनशोरा या संस्थांनी एकत्रित येऊन शहरातील निसर्ग संवर्धनासाठी काम करणा-या 42 नारीशक्तीचा सन्मान 500 निसर्ग प्रेमींच्या उपस्थितीत केजुबाई बंधारा येथे नदी किनारी नुकताच […]

पवना नदीच्या प्रदूषणाबाबत महापालिकेला पाच लाखांची बँक गॅरंटी देण्याबाबत नोटीस

एमपीसी न्यूज – पवना नदीत घरगुती सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे उघडकीस आल्यानंतर याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाच लाखांची बँक गॅरंटी देण्याबाबत नोटीस दिली आहे. पवना नदीवर असलेल्या केजुबाई बंधा-यात 6 फेब्रुवारी रोजी काही मासे मृतावस्थेत आढळले होते. नाल्यातून रसायन मिश्रित पाण्यामुळे मासे मेल्याचा संशय व्यक्त केला

पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात लिमिटलेस व पदुर या लघुपटांना प्रथम पुरस्कार

चिंचवड (दि. १८ मार्च) :-   पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने १६ व १७ मार्चला प्रथमच पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे (शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल) आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात जगातील वेगवेगळ्या ५० देशांतून आलेल्या २४६ लघुचित्रपटांपैकी परीक्षकांनी निवडलेले ४१ लघुचित्रपट पाहण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळाली. त्याचे पारितोषिक वितरण रविवारी (१७ मार्च) झाले. यात प्रथम क्रमांक लिमिटलेस या राधेय तावरे दिग्दर्शित व पदुर या नवनाथ कांबळे दिग्दर्शित लघुपटाला विभागून देण्यात आला. तसेच द्वितीय क्रमांक देखील प्रदीप पवार दिग्दर्शित अंतेष्टी व जस्टीन ऑल्स्टीन दिग्दर्शित द व्हिजीटरला विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक असीफ मोयाल दिग्दर्शित जरीवाला आसमान या लघुपटाला देण्यात आला.

बोपखेल पुलाच्या निविदेच्या मुदतवाढीस न्यायालयाची मंजुरी

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार काढलेल्या बोपखेल ते खडकी या मुळा नदीवर पुलाच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने काढलेल्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने निविदेस मुदतवाढ देऊन ती दुसर्‍यांदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयानेही मुदतवाढ दिली आहे. परिणामी, पुलाचे निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन स्थायी समितीची मान्यता घेऊन काम आचारसंहितेनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

भाटनगर विद्युत दाहिनी वीस दिवस बंद

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भाटनगर, लिंक रस्ता येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी दुरूस्ती काम केले जाणार आहे. त्यासाठी विद्युत दाहिनी 18 मार्च ते 6 एप्रिल असे 20 दिवस बंद ठेवली जाणार आहे. साठी 20 दिवस बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे अंतविधीसाठी नागरिकांनी इतर ठिकाणाच्या स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाने केले आहे.