पिंपरी : मोशी येथील कचरा डेपोला गुरुवारी (ता.२९) रात्री लागलेली आग बारा तासानंतरही आटोक्यात आलेली नाही.
मोशी येथील कचरा डेपोला आग लागल्याची वर्दी गुरुवारी (ता.२९) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार सुरुवातीला भोसरी येथील अग्निशामक उपकेंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे स्वरूप पाहता आणखी चार बंब घटनास्थळी दाखल झाले.