पिंपरी : उमेदवारी अर्ज सादर करतेवळी सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. सुरक्षा व्यवस्था कोलमडली. वाहतूक कोंडी झाली. महापालिका तळमजला ते चौथ्या मजल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे यांच्या कक्षापर्यंत कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. पोलिसांना उमेदवाराविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करणे भाग पडले, अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी पोलिसांनी दुसर्या दिवशी मंगळवारी कडक धोरण अवलंबले. ओळखपत्र लावलेल्या कर्मचार्यांनासुद्धा महापालिका इमारतीत प्रवेशास मज्जाव केला. ‘‘आम्ही महापालिका आयुक्तांचे नाही, तर फक्त निवडणूक आयोगाचे आदेश पाळतो,’’ अशी कठोर भूमिका घेऊन अनेक कर्मचार्यांना दुपारी ३ वाजेपर्यंत बाहेर तिष्ठत ठेवले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 26 March 2014
फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या, तिच्यासाठी पोटापाण्याचे साधन
पिंपरी : काम-धंदा न करणार्या उडाणटप्पूंनासुद्धा निवडणूक काळात प्रचाराचा झेंडा घेऊन उभा राहिला तरी भरपेट जेवण आणि किमान ३00 रुपये मिळतातच. अशा वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. मात्र, स्वकष्टाने पैसे मिळविण्याची धडपड करणारी महिला निवडणूक काळात गर्दीच्या ठिकाणी दिसून येऊ लागली आहे. शक्तिप्रदर्शन, मेळावे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी फेकलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या तिच्यासाठी पोटापाण्याचे साधन बनल्या आहेत.
कचर्यातील भंगार वेचून त्याच्या विक्रीतून पोटापाण्याची भ्रांत मिटविणे हा नित्यक्रम असलेल्या झोपडीतील वृद्धेला रस्त्यांवर, मेळाव्याच्या ठिकाणी, सभागृहांमध्ये एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आढळून येऊ लागल्या आहेत. सर्मथक म्हणून आलेल्या कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्याची यंत्रणा उमेदवाराने कार्यान्वीत केल्याचे मंगळवारी शक्तिप्रदर्शनाच्या वेळी दिसून आले.

नावाचे फलक अजूनही झळकताहेत
पिंपरी : जिल्ह्यात ५ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आणि पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या हद्दीत असणारे राजकीय पक्षांचे, सदस्यांच्या नावाचे फलक, विकासकामाच्या उद्घाटनाचे फलक झळकत आहेत. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे पालन होत नसल्याची तक्रार जागरूक नागरिकांनी ‘लोकमत’कडे केली आहे.
बोर्डाच्या हद्दीत बोर्डाचे उपाध्यक्ष व काही सदस्यांच्या नावाचे फलक त्यांच्या निवासस्थानानजीक अद्यापही झळकत आहेत. तसेच एका सदस्याने वार्डात केलेल्या विकासकामाच्या नावाचा उद्घाटनाचा फलक त्याच्या नावासह झळकत आहे. तसेच काही संघटनांच्या नामफलकावर मंत्र्यांची नावे आहेत. महापालिका हद्दीत मामुर्डी, साईनगर येथे एका राजकीय पक्षाच्या नावाचा फलक आहे. चिंचवड येथे एका नगरसेवकाच्या उपक्रमाचा फलक त्याच्या नावासह झळकत आहे.

Mild quake jolts Pimpri-Chinchwad
Pune: Parts of Pimpri-Chinchwad experienced tremors as a slight earthquake measuring 3.
श्रीरंग बारणे यांची संपत्ती 52 कोटी 43 लाख
आमदार जगतापांच्या तुलनेत बारणे ठरले श्रीमंत
मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आप्पा उर्फ श्रीरंग बारणे यांच्याकडे तब्बल 52 कोटी 43 लाख रुपयांची संपत्ती आहे. तीन अलिशान मोटारींसह, एक विदेशी बनावटीचे रिव्हॉल्वरही त्यांच्या नावावर आहे. शेकाप व मनसे पुरस्कृत उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तुलनेत बारणे श्रीमंत ठरले आहेत.

मावळचे उमेदवारी अर्ज पोहचले अकरावर
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र वितरणाच्या सहाव्या दिवशी चार नामनिर्देशन पत्राचे (फॉर्म) वितरण व 3 उमेदवारांची नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले. आजअखेरीस एकूण 11 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्या अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे.
'उथळ' भूकंपाने दिघी ते शिवाजीनगर भाग हादरला
शिवाजीनगर ते दिघी परिसर आज (मंगळवारी) सकाळी सहा वाजून 24 मिनिटांनी सौम्य उथळ स्वरुपाच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरला. या भूकंपाची खोली पाच किलोमीटर आणि तीव्रता रिश्टर स्केलवर 3 इतकी नोंद करण्यात आली आहे.
दिघी, भोसरीचा काही भाग, विश्रांतवाडी, शिवाजीनगर आदी भागातील रहिवाश्यांना भूकंपाचा धक्का चांगलाच जाणवला. भोसरी रेडझोन परिसरात लष्कराच्या वतीने दारुगोळ्याचा सराव करण्यात येतो. या सरावामुळे भोसरी, दिघी परिसरात वारंवार हादरे जाणवत असतात. मात्र, नेहमी जाणविणा-या हाद-यांपेक्षा आजचा हादरा वेगळ्या स्वरुपाचा जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. पुणे हवामान खाते आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्याची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर हा भूकंपाचाच धक्का होता, असे स्पष्ट झाले.
पतंजली समितीतर्फे योगमहोत्सव साजरा
पिंपरी : पतंजली योग समितीतर्फे शहीद दिन योग महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमध्ये ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या मैदानावर ३५00 साधकांच्या उपस्थितीत योग महोत्सव साजरा झाला.
Subscribe to:
Posts (Atom)