MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 25 April 2020
पिंपरी-चिंचवडमध्ये ८१ पॉझीटीव्ह तर २० बाधीत रुग्णांवर यशस्वी उपचार
कोरोना कोविड-19 या विषाणुंचा संसर्ग टाळण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रयत्न करीत आहे. महानगरपालिका क्षेत्रात ८१ पॉझीटी व रूग्ण आजपर्यंत आढळून आले असून त्यापैकी २० रूग्ण पूर्णपणे बरे करण्यात यश आले असून त्याना घरी सोडण्यात आले आहे. सध्या लॉकडाउन चालू असलेने बेघर, बेरोजगार व परप्रांतीय इतर नागरीकांची उपासमार होऊनये, त्यांना भोजन व इतर सुविधा देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करीत आहे. यात आपला सर्वांचा सहभाग महत्वाचे असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोर व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
रुग्णांची संख्या वाढल्यास लॉकडाऊनमध्येही वाढ?
पुणे - मुंबई, पुण्यासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु सद्यस्थितीत तीन मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहील. मात्र, रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास यापुढील काळात लॉकडाऊनमध्ये वाढ होऊ शकते, असे संकेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे कामगारांना फूड किट्चे वाटप
एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या कालावधीत स्थलांतरित झालेल्या संभाजीनगर, कस्तुरी मार्केट येथील कामगारांना रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे गुरुवारी (दि.23) अन्नधान्यांच्या किटचे वाटप करण्यात आले. 100 किटचे वाटप केल्याची माहिती अध्यक्ष जिग्नेश आगरवाल यांनी दिली. यावेळी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, गुल सिवलानी, नवीन आगरवाल आदी उपस्थित होते. रोटरीचे अध्यक्ष जिग्नेश आगरवाल म्हणाले, कोरोनाचा […]
मनसेतर्फे शहरातील गरजुंना अन्नधान्याचे किट घरपोच
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमलात आणलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे अनेक मजूर, कष्टकरी कामगार, घरकाम करणाऱ्या व्यक्ती तसेच हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबावर अतिशय हालाकीची परीस्थिती उद्भवली आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून सर्वतोपरी मदत होत आहे. परंतु नागरिक म्हणून अश्या लोकांना मदत करणे हे आपलेसुद्धा दायित्व आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय,मॉल्स सोडून इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत
नवी दिल्ली : देशभरात लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये अजून शिथिलता देण्यात आली आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत दिली असली तरी ही सवलत देताना काही अटी देखील घातल्या आहेत. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. आजपासून हा आदेश लागू होणार आहे.
केशरी रेशनकार्ड धारकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलीय महत्त्वाची घोषणा!
पुणे : लॉकडाऊन कालावधीत मे आणि जून महिन्यांकरिता अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारकांना 25 एप्रिलपासून रास्तभाव धान्य दुकानातून सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पिंपरी चिंचवडमध्ये महावितरणकडून मान्सूनपूर्व तयारी
पिंपरी - दरवर्षी पावसाळ्यात पाऊस झाल्यास महावितरणची सेवा ठप्प होते. परंतु, वीज पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणने मान्सूनपूर्व कामे हाती घेतली आहेत. यंदा लॉकडाउनमूळे एमआयडीसी परिसर बंद असल्याने विना अडथळा काम सुरु आहे.
Subscribe to:
Posts (Atom)