Tuesday, 4 December 2012

Gas agencies to accept KYC forms till December 31

Gas agencies to accept KYC forms till December 31: The oil marketing companies on Monday said that acceptance of know your customer (KYC) forms at the offices of respective gas agencies will continue as the government has extended the deadline till December 31.

‘वडिलांना डोळ्यासमोर ठार केल्याचा सूड घेतला!’

‘वडिलांना डोळ्यासमोर ठार केल्याचा सूड घेतला!’:
pune--crime
गोटय़ा धावडे खूनप्रकरणात राहुल लांडगे याची कबुली
गोटय़ा धावडे खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल अंकुश लांडगे याने सोमवारी पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांच्या साक्षीने पत्रकारांसमोरच गुन्ह्य़ाची कबुली दिली. 'सहा वर्षांपूर्वी माझ्या डोळ्यासमोर गोटय़ाने वडील अंकुश लांडगे यांचा खून केला. त्याचा सूड घेण्यासाठीच गोटय़ाचा खून केला,' असे तो म्हणाला.
'वडिलांवर हल्ला झाला तेव्हा मी लहान होतो. त्यांना वाचवायला गेलो, माझ्यावरही वार केले. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांना सतत दमदाटी, शिवीगाळ करून त्रास दिला गेला. मित्रांना मारहाण केली. घरावर व गणपती मंडळांच्या मिरवणुकीवर दगडफेक केली. इतकेच नव्हे तर माझ्या चुलत भावाला मारण्याचाही त्याचा कट होता. तडिपारी संपवून पालिका निवडणुकीच्या वेळी गोटय़ा भोसरीत आला होता. अलीकडे तो एकटा बाहेर पडत होता. तो घरातून बाहेर कधी पडतो, कुठे जातो व बरोबर कोण असते, याची माहिती घेण्यासाठी आठवडाभर पाळत ठेवली. २९ नोव्हेंबरला तो एकटा घरातून निघाल्याचे दुर्बिणीतून पाहिल्यानंतर खात्री पटली. तेव्हा त्याच्यावर कोयते, तलवारीने व पिस्तुलीने हल्ला चढवला. त्यात गोटय़ा संपला. मात्र, तेव्हा झालेल्या झटापटीत चुकून गोळी लागल्याने आमच्यापैकी एक अंकुश लकडे मारला गेला. नंतर आम्ही देहूत गेलो व इंद्रायणी नदीत हत्यारे टाकली. तेथून नगरकडे गेलो. मुंबईला जाण्यासाठी निगडीत आलो असताना आम्हाला पोलिसांनी पकडले,' असे त्याने सांगितले.
'खुनाच्या घटनेपूर्वी भोसरी तळ्याजवळ बसून प्लॅन केला. ४० हजार रुपये देऊन दोन पिस्तुली घेतल्या. एक नारायणगावातून, तर दुसरी बिहारमधून मिळवली. १५ काडतुसे आणली होती. पालिकेच्या बॉडी आर्ट जीममध्ये गोळ्या झाडण्याचा सराव केला. तेव्हा आवाज येऊ नये म्हणून म्युजिक सिस्टीम लावली होती. िपपरीतून माकड टोप्या आणल्या. टेम्पोची व्यवस्था केली. लहानपणाचे मित्र बरोबर घेतले. गोटय़ाने त्यांनाही त्रास दिला होता. त्याला मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही, उलट वडिलांच्या हत्येचा बदला घेतल्याचा गर्व वाटतो,' असे तो म्हणाला.
दरम्यान, याप्रकरणी सात जणांना अटक केली असून त्यांना सात डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्य़ामागे कोणत्याही टोळीचा हात असल्याचे वाटत नाही. गुन्ह्य़ात वापरलेली हत्यारे व मोटारी जप्त केल्या आहेत, असे उमप यांनी सांगितले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त सुधीर चौगुले, पोलीस निरीक्षक सुधीर अस्पात, मोहन विधाते आदी उपस्थित होते

भाजपच्या ‘चलो नागपूर’ अभियानावरही िपपरीत तीव्र गटबाजीचे सावट

भाजपच्या ‘चलो नागपूर’ अभियानावरही िपपरीत तीव्र गटबाजीचे सावट:
भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ पवार यांची मुदत संपत आली, तसतशी पक्षातील गटबाजी आणखी तीव्र होताना दिसत आहे. प्रदेश कार्यालयाने दिलेल्या 'चलो नागपूर' अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार गोपीनाथ मुंडे समर्थक गटाचा एकही पदाधिकारी व कार्यकर्ता फिरकला नाही. पवार यांच्या नेतृत्वाखाली न जाता आम्ही थेट नागपूरला जाणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. वाढती महागाई, घोटाळे, एफडीआय आदी विषयांवरून नागपूर अधिवेशनाच्या काळात विधानभवनाला घेराव घालण्याचा कार्यक्रम भाजप प्रदेश शाखेने दिला आहे. त्यासाठी िपपरी-चिंचवडमधून तीन हजार कार्यकर्ते नागपूरला जाणार असल्याचा दावा पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करावीत या स्थानिक मागणीसह रास्त दरामध्ये १२ सिलिंडर मिळावेत, हजारो कोटींच्या सिंचन घोटाळ्याची 'एसआयटी' मार्फत चौकशी व्हावी, धान्याला योग्य भाव मिळावा, दुष्काळग्रस्त भागात पाणी, चारा व रोजगाराची सरकारने हमी घ्यावी, भारनियमन रद्द करावे, वीज दरवाढ रद्द करावी, अशा प्रमुख मागण्या असल्याचे पवार यांनी सांगितले. या वेळी सरचिटणीस प्रमोद निसळ व नामदेव ढाके उपस्थित होते.

एकनाथ पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे समर्थक आहेत. मुंडे समर्थकांचा त्यांना तीव्र विरोध असून अध्यक्षपदाच्या पूर्ण काळात पवारांनी तो अनुभवला आहे. आता मुदत संपताना मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्याचा प्रत्यय सोमवारी आला. पत्रकार परिषदेकडे कोणी फिरकले नाही. पवार व त्यांचे मोजके समर्थक या वेळी उपस्थित होते.

याविषयी विचारणा केल्यानंतर पवारांनी कोणतेही भाष्य केले नाही. या वेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांवर टीका केली. ते केवळ घोषणा करतात. मात्र, कार्यवाही करत नाहीत. घरकुल योजनेत सत्ताधाऱ्यांनी सामान्यांची फसवणूक केली आहे, असे ते म्हणाले.  

सिग्नल बंद पडल्यामुळे फुगेवाडी ते दापोडी दरम्यान वाहतूक कोंडी

सिग्नल बंद पडल्यामुळे फुगेवाडी ते दापोडी दरम्यान वाहतूक कोंडी:
पुणे-मुंबई मार्गावर फुगेवाडी-दापोडी-खडकी दरम्यान सोमवारी सायंकाळी काही ठिकाणचे सिग्नल बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.
वाहतूक पोलिसांनी ही कोंडी दूर करण्यासाठी खूप वेळ लागला. रात्री साडेआठ पर्यंत या मार्गावरील वाहतूक संथ गतीने वाहत होती. दापोडी येथील काही सिग्नल बंद असल्यामुळे पुढे जाण्याच्या
नादात वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे फुगेवाडी व खडकीपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.
याबाबत वाहतूक नियंत्रण कक्षाला वाहतूक कोंडीची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.   

वीज ग्राहकांशी संबंधित विषयांसाठी ‘महावितरण’ची आता स्वतंत्र यंत्रणा

वीज ग्राहकांशी संबंधित विषयांसाठी ‘महावितरण’ची आता स्वतंत्र यंत्रणा:
राज्यातील १३० शहरांत विशेष सेवा केंद्र
ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रमांत समाविष्ट राज्यातील १३० शहरांमध्ये 'महावितरण' विशेष सेवा केंद्र स्थापन करणार आहे. ग्राहकांच्या तक्रारी, नवीन जोडणी, यंत्रणेची देखभाल, दुरुस्ती, वीजबिलांची वसुली या महत्त्वाच्या विषयांशी संबंधित या योजनेत विशेष यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
शहरी भागामध्ये शाखा कार्यालयांमध्ये ही यंत्रणा कार्यरत राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र वाहन व अन्य साधने, सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. भविष्यात सर्वत्रच ही यंत्रणा लागू करण्याचा 'महावितरण'चा प्रयत्न राहणार आहे. १३० शहरांमधील ही केंद्र मध्यवर्ती कॉल सेंटरला (क्र. १८००२३३३४३५) जोडली जाणार आहेत. या ठिकाणी तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित ठिकाणी ती कळविली जाणार आहे. तक्रार सोडविण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागल्यास ते वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले जाईल. ग्राहकांना नेहमीप्रमाणे उपविभागीय कार्यालयातही तक्रार नोंदविण्याचा पर्यात खुला राहणार आहे.
'महावितरण'ने मे महिन्यापासून राज्यातील अहमदनगर, कोल्हापूर, धुळे, नांदेड, चंद्रपूर व अमरावती या शहरांमध्ये अशी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. त्यातून ग्राहकांच्या सेवेमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. यंत्रणेत काम करण्याची कर्मचाऱ्यांची जबाबदारीही वाढली आहे. सध्या शाखा कार्यालयात नवीन जोडण्या देणे, तक्रारी सोडविणे, देखभाल-दुरुस्ती करणे, वीज बिलांची वसुली करणे ही कामे केली जातात. ही कामे सामूहिकपणे केली जात असल्याने त्यात प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करणे शक्य नव्हते. नवीन यंत्रणेत प्रत्येक कामासाठी स्वतंत्र गट कार्यरत राहणार आहे. त्यामुळे सेवेत बदल होण्याबरोबरच कर्मचाऱ्यांची जबाबदारीही वाढणार असल्याचे 'महावितरण'ने म्हटले आहे.    

उद्योगनगरी जपतेय आयुर्वेदाचा वारसा

उद्योगनगरी जपतेय आयुर्वेदाचा वारसा: अविनाश आदक। दि. ३ (इंद्रायणीनगर)

भोसरी एमआयडीसीमधील जे ब्लॉकमध्ये महानगरपालिका व जनसेवा सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जनसेवा आयुर्वेद वनौषधी उद्यान प्रकल्प अनेक वर्षांपासून संरक्षण व संवर्धन करण्याचे काम करीत आहे.
उद्योग व कंपन्यांच्या गराड्यात दुर्मिळ औषधी जंगलच जणू येथे पहावयास मिळते. लोप पावत चाललेल्या अनेक वनस्पतींचे येथे संवर्धन केले जाते. दमा, संधीवात, हृदयविकार, कर्करोग अशा अनेक दुर्धर आजारांवर दर बुधवारी तज्ज्ञांच्या उपस्थितीत रुग्णांना सल्ला व औषधे दिली जातात.

परिसराची प्रगती जंगल व झाडांच्या र्‍हासालाही कारणीभूत ठरत आहे. अप्रत्यक्षपणे आपण स्वत:च्या पायावर कुर्‍हाडच मारतो आहे. पण, अशातही वनौषधी उद्यान प्रकल्पामुळे दुर्मिळ होऊ पाहत असलेल्या औषधी वनस्पतींच्या संवर्धनाचे सत्कार्य केले जात आहे. बकुळ, चिंच, पारिजातक, अर्जुन, शिवण, अडुळसा, पळस, कोरफड, निवडुंग, हिरडा, बेहडा, वेगवेगळ्या वेली, कंद, मुळे अशा नामशेष होण्याच्या मार्गावर असणार्‍या तब्बल ४८0 औषधी बहुपयोगी वनस्पतींचे एक संग्रहालय येथे उभारण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव औषधी वनस्पती उद्यान अनेक वर्षांपासून भोसरी परिसरात मोठय़ा दिमाखात फुलत असून, नागरिकांना त्याबद्दल पुरेशी माहिती नाही. या उद्यानात आयुर्वेद क्षेत्रातील व डॉक्टरी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शिक्षक माहिती घेण्यासाठी येत असतात. काही रुग्णही येथे औषधोपचारासाठी येतात. समाजात वैद्य, हकीम व भोंदू बाबांच्या अंगारा, धुपार्‍यांना बळी पडून आजारपणात आयुष्य कंठणार्‍या लोकांची कमी नाही. अशा लोकांना आर्थिक व मानसिक नुकसानीपासून वाचवण्यासाठी व सर्व आजार दूर करण्याच्या उद्देशानेच हे उद्यान चालू करण्यात आल्याचे उद्यान व्यवस्थापक मनोहर बांगर यांनी सांगितले.

मद्यपी बस चालकाने प्रवाशांना धरले वेठीस !

मद्यपी बस चालकाने प्रवाशांना धरले वेठीस !
पिंपरी, 3 डिसेंबर
पीएमपीएमएल बस कोणत्याही बसस्टॉपला न थांबवता एका मद्यपी चालकाने वाहकासहित बसमधील प्रवाशांना वेठीस धरले. या बसला वाहने आडवी घालत बसचालकाला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार दुपारी साडेतीन वाजता बोपोडी चौकात घडला.

दत्तात्रेय मनोहर परब (वय 41, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परब हा दारु पिऊन येरवडा मार्गे जाणा-या पुणे स्टेशन ते निगडी ही बस घेऊन (एमएच12 ईक्यू 5570) निघाला होता.
दारुच्या नशेत तो कोणत्याच बस स्टॉपवर बस न थांबवता तशीच बेदरकारपणे चालवीत निघाला. हा प्रकार पाहून प्रवासी गोंधळले. त्यांनी आरडा ओरडा सुरू केला. वाहकाने त्याला बस थांबविण्यास सांगितले तरी त्याने जुमानले नाही.

त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. वाहकाने त्वरित पीएमपीएमएल च्या वरिष्ठ अधिका-यांना आणि पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावला. पोलिसांनी ही बस अडविण्याचा प्रयत्न केला. अखेरीस दुपारी साडेतीन वाजता पोलिसांनी या बसच्या पुढे गाडी आडवी घालून बसला थांबविले आणि
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

दत्तात्रय परब हा पूर्वी पीएमपीएमएलमध्ये चालक म्हणून कायमस्वरुपी नोकरीला होता. दारु पीत असल्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर पीएमपीएमएलच्या ठेकेदाराकडे त्याला चालकाची नोकरी देण्यात आली होती अशी माहिती पुढे आली आहे.
mypimprichinchwad.com

लोकशाहीदिनाचा खेळखंडोबा करणा-या अधिका-यांची आयुक्तांकडून खरडपट्टी

लोकशाहीदिनाचा खेळखंडोबा करणा-या अधिका-यांची आयुक्तांकडून खरडपट्टी
पिंपरी, 3 नोव्हेंबर
महापालिकेकडून दरमहा आयोजित केल्या जाणा-या लोकशाही दिनाचा खेळखंडोबा करणा-या अधिका-यांची महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज चांगलीच खरडपट्टी काढली. वर्ष होऊनही 20 तक्रारींचा निपटारा करण्यात अपयशी ठरलेल्या अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेशही त्यांनी दिले.

नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महापालिका आयुक्तांसह विविध विभागांचे अधिकारी लोकशाही दिनाला हजर असतात. नागरिकांना थेट अधिका-यांपुढे आपल्या तक्रारी मांडता येतात. तसेच बहुसंख्य तक्रारींची तत्काळ सोडवणूक करण्यासाठी लोकशाहीदिन राबविला जातो.

लोकशाहीदिनाला हेलपाटे मारुनही तक्रारींची सोडवणूक होत नसल्याचा अनुभव घ्यावा लागत असल्याहोते. नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी लोकशाहीदिन आयोजित केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाकडून नावापुरता ने नागरिकांचा लोकशाहीदिनातील सहभाग घटत चालला आहे.

आजच्या लोकशाही दिनालाही अवघे दोन तक्रार अर्ज प्राप्त झाले. आयुक्तांनी मागील दिनाच्या तक्रारींचा आढावा घेतला असता 20 तक्रारींची वर्ष होवूनही सोडवणूक झाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्त डॉ. परदेशी यांनी या तक्रारींचा निपटारा करण्यास शेवटची संधी देण्याची सूचना करत तक्रारी न सोडविल्यास संबंधित अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश दिले.

आयुक्तांनी अधिका-यांना लोकशाही दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले की, लोकशाही दिनाला नागरिक तक्रार दाखल करत असतात. त्यामुळे या दिनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींचे वेळेत निराकरण झाल्यास त्याच त्याच तक्रारी पुन्हा लोकशाही दिनात दाखल होणार नाहीत. त्यामुळे लोकशाही दिनाचे महत्त्व समजावून घेऊन तक्रारकर्त्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण झालेच पाहिजे, असे आयुक्तांनी बजाविले.

यावेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडील जिल्हा प्रकल्प अधिकारी वि. रा. वालगुडे, महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त प्रकाश कदम, शहर अभियंता महावीर कांबळे, सहशहर अभियंता अंबादास चव्हाण, राजन पाटील, विकास अभियंता अशोक सुरगुडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे, अतिरीक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे, आशादेवी दुरगुडे, सतीश कुलकर्णी, शहाजी पवार, प्रभाग अधिकारी पांडुरंग झुरे, दिलीप बंब, ए. वाय. कारचे, ज्ञानेश्वर ढेरे, शिक्षणाधिकारी एस. एस. कांबळे, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, संगणक अधिकारी नीळकंठ पोमण, विशेष अधिकारी सुभाष माछरे आदी उपस्थित होते.
mypimprichinchwad.com

मला गर्व आहे, वडिलांच्या खुनाचा सूड घेतल्याचा !

मला गर्व आहे, वडिलांच्या खुनाचा सूड घेतल्याचा !
पिंपरी, 3 डिसेंबर
'सहा वर्षांपूर्वी गोट्या धावडे याने माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांचा खून केला... गोट्या तुरूंगातून बाहेर पडल्यानंतरही त्याची टारटूर सुरूच होती... कधी गणपती मिरवणुकांमध्ये दगडफेक, तर वारंवार घरातील मंडळींना शिवीगाळ एवढंच नाही, तर माझा भाऊ रवी यालाही संपविण्याचे षडयंत्र गोटयाने गतवर्षी आखले होते. मग मात्र मनाशी पक्क केलं... गोट्याला संपवायचे....त्याला संपवल्याचा मला गर्व आहे...' गोट्या धावडेच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल लांडगे सांगत होता......

'गोट्याचा त्रास माझ्या जवळील मित्रांनाही होता. त्याच्या त्रासाला कंटाळून बालपणीच्या सवंगड्यांना हाताशी धरून गोट्याला संपविण्याचा बेत आखला... पिस्तुल, तलवारी, कोयत्यांची जमवाजमव केली... पिंपरी कॅम्पातून माकड टोप्यांचीही खरेदी आटोपली.. आणि भोसरी तळ्यावरून दुर्बिणीतून धावडेवस्तीची टेहाळणी सुरू झाली... काम फत्ते व्हावे, यासाठी आठ दिवसांपूर्वी आमच्या जीममध्ये 'जीम'चा कोचर किशोर यांनी पिस्तुलातून गोळीबार करीत गोट्याला संपविण्याची रंगीत तालीम केली... गोट्यावरील 'वॉच' सत्र फळाला आलं... गोट्याला 'परफेक्ट' ठिकाणी गाठून त्याचा पत्ता कट केला... '

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अंकुश लांडगे यांची सहा वर्षांपूर्वी हत्या झाली. ही हत्या करणा-या गोट्या धावडेला संपवून वडिलांच्या हत्येचा बदला घेतल्याचे सांगत राहुल लांडगे याने पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या पुढे आपण केलेल्या खुनाचे समर्थन केले.

या हल्ल्याची रंगीत तालीम राहुलच्या जीममध्ये झाली. यासाठी लागणारे पिस्तुल नारायणगाव येथून 40 हजार रूपयाला, तर विकी गुप्ता याने एक पिस्तुल बिहार येथून 20 हजार रूपयांना आणले होते. भोसरीतील धावडेवस्ती येथे 29 नोव्हेंबर रोजी भरदुपारी गोट्या धावडे याचा कोयता, तलवारीने खून केला. त्यावेळी चुकून गोळी लागून राहुलचा मित्र अंकुश लाडके ठार झाला.

त्यानंतर राहुल लांडगे, किशोर साखरे, अभिषेक झरे, अब्दुल अहमद, विकास ऊर्फ विक्रांत लांडगे, प्रवीण ऊर्फ चिम्या लांडगे, अजित ऊर्फ विकी गुप्ता हे सात जण टेम्पो धावडेवस्ती परिसरात लावून आय-20 मोटारीतून कुदळवाडीमार्गे देहूगावात पोहोचले.

तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिराजवळ इंद्रायणी नदीत एक पिस्तुल, चार कोयते, कु-हाड टाकून नगरला गेले. त्यावेळी राहुल, किशोर, अभिषेक तिघे मोटारीतून पुन्हा नगरहून पिंपरीला आले. मुंबईला नातेवाईकांकडे जाताना पोलिसांनी तिघांना निगडी नाक्याजवळ 29 नोव्हेंबरच्या रात्री पकडले. तर अन्य आरोपींना इंद्रायणीनगर परिसरात रविवारी (दि. 2) सायंकाळी पकडले.

राहुल लांडगे (वय-20), किशोर मधुकर साखरे (वय-22), अभिषेक शिवाजी जरे (वय-22, सर्व रा. धावडेवस्ती, भोसरी), अब्दुल वसीम सत्तार अहमद (वय-22, रा. आळंदी रोड, भोसरी), विकास ऊर्फ विक्रांत पोपट लांडगे (वय-22, रा. धावडेवस्ती, भोसरी), प्रवीण ऊर्फ चिम्या पोपट लांडगे (वय-20, रा. धावडेवस्ती, भोसरी), अजित ऊर्फ विकी रामलाल गुप्ता (वय-22, रा. पांजरपोळ, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या सात जणांची नावे आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
mypimprichinchwad.com

Puneites play perfect hosts to ‘hesitant’ northeasterns

Puneites play perfect hosts to ‘hesitant’ northeasterns: Jankalyan Samiti organises dinner for NE students in Chinchwad

अधिवेशन चालू देणार नाही : खडसे

अधिवेशन चालू देणार नाही : खडसे: पिंपरी । दि. २ (प्रतिनिधी)

सिंचनाबाबत श्‍वेतपत्रिका काढून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करीत आहे. श्‍वेतपत्रिकेला उत्तर देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात ब्लॅकपत्रिका काढली जाणार असून, अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज दिला.

खान्देशवासीयांच्या रावेत येथील मेळाव्यात खडसे बोलत होते. शहरातील कार्यक्रमांत आज राष्ट्रवादी व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी परस्परांवर सिंचन श्‍वेतपत्रिकेवरून टीका केली.

चिंचवड येथे दुपारी झालेल्या राष्ट्रवादीच्या ग्राहक संरक्षण समिती मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी श्‍वेतपत्रिकेवर भाष्य केले. ‘आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होत आहे. सिंचनाबाबत निघालेली श्‍वेतपत्रिका मिळाली. त्यात आम्ही किती

चांगले काम करतो, हे दिसून आले आहे. येत्या अधिवेशनात विरोधकांना जशास तसे उत्तर देऊ,’ असे पिचड म्हणाले. सायंकाळी झालेल्या खान्देशवासीयांच्या मेळाव्यात श्‍वेतपत्रिकेवरून अधिवेशन चालू न देण्याचा इशारा खडसे यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘सिंचन श्‍वेतपत्रिका अपूर्ण आहे. सिंचनावर खर्च किती झाला, कोणती कामे केली, क्षेत्र कसे वाढविले याचा आढावा सिंचन श्‍वेतपत्रिकेत घेतला आहे. योग्य माहिती मिळालेली नाही. मात्र, कोणी चुकीची टेंडर दिली. टेंडर का वाढविले, खरेच क्षेत्र वाढले का, याची माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, पवारांना क्लीन चिट देण्यासाठी श्‍वेतपत्रिका काढल्याचे दिसून येते. पवार, तटकरे यांना हे सरकार व मुख्यमंत्री पाठीशी घालत आहे. सिंचन गैरव्यवहार दडपण्याचा हा प्रयत्न आहे. याचा निषेध आम्ही नागपूरच्या अधिवेशनात करणार आहोत. काळीपत्रिका काढणार असून एसआयटीमार्फत याची चौकशीची मागणी करणार आहोत. सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्यास अधिवेशन चालू दिले जाणार नाही.’’

१२ डिसेंबरला घोषणा करण्याची पद्धत आहे. गेल्या काही वर्षांत भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे आश्‍वासन दर वर्षी दिले जाते. यंदा १२-१२-१२ चा मुहूर्त आहे. त्या वेळीही हेच आश्‍वासन दिले जाईल. ते कधी पूर्ण होणार? पाळता येत नसतील तर आश्‍वासने देऊ नका.

- एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते, विधानसभा

Flop show: Only eight turn up with complaints at PMPML commuters’ day

Flop show: Only eight turn up with complaints at PMPML commuters’ day: The third Pravasi Din, (commuters’ day) an initiative of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) to address issues raise by commuters and also get their feedback received a dismal response with only eight commuters turning up with complaints on Saturday at PMPML depots.