पिंपरी - शहरातून वाहणाऱ्या पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या सुधार प्रकल्पांचा प्राथमिक अहवाल अजूनही राज्य सरकारच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे. गेल्या सहा वर्षांपासून यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने विस्तृत प्रकल्प अहवालाला मुहूर्त मिळालेला नाही. नद्यांची सद्यःस्थिती बघता त्यावर तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या प्रकल्पात नदीतील वाढते प्रदूषण रोखणे तसेच नदीकाठ विकसित करण्यात येणार आहेत. सर्वेक्षणानंतर विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल. त्यासाठी प्रकल्प सल्लागारांकडून निविदा प्रस्ताव मागविले आहेत. सरकारचीही मान्यता व अनुदान न मिळाल्याने हा प्रकल्प राबविणे महापालिकेला शक्य होत नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 20 January 2018
लोणवळ्यापर्यंत धावावी मेट्रो !
तळेगाव दाभाडे – पुणे ते पिंपरी मेट्रो या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची व्यापकता वाढावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे. पहिल्या टप्प्यात मेट्रो पिंपरीपर्यंत धावणार आहे, परंतु पहिल्याच टप्प्यात मेट्रोला निगडीपर्यंत घेऊन जावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहराचे नागरीक करत असतानाच मेट्रो लोणावळ्यापर्यंत धावावी अशी मागणी आता मावळातून येऊ लागली आहे.
More citizen service hubs on the cards
Pimpri Chinchwad: A total of 56 additional citizen facilitation centres (CFCs) will be started in Pimpri Chinchwad in March to offer civic as well as Mahaonline services through public-private partnership for three years.
PCMC chief warns against interference
Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad municipal commissioner, Shravan Hardikar, has sent letters to all corporators, warning them that they will face disqualification if they supported unauthorized constructions or interfered in the drive against illegal constructions.
निगडीपर्यंत “मेट्रो’ राज्याच्या कोर्टात
पिंपरी – पुणे महामेट्रोच्या 31 किलोमीटर या मार्गाला केंद्र सरकारने सात डिसेंबर 2016 रोजी मान्यता दिली आहे. पुणे महामेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत राज्य सरकारने उचित निर्णय घ्यावा, असे पत्र केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो नेण्याचा निर्णय आता राज्य सरकार घेणार आहे. हा निर्णय तातडीने घेण्यात यावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पालकमंत्र्यांच्या भूमिकेचा पीसीसीएफकडून निषेध
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या निगडी आणि कात्रजच्या विस्तारामध्ये पुणे-पिंपरीचे कारभारी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीच खोडा घातला आहे. ‘आधी पिंपरीपर्यंतची मेट्रो धावू दे, मग निगडीच्या विस्ताराचे पाहू,’ अशा शब्दांत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विस्ताराच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे, आता मेट्रोचा निगडी आणि कात्रजचा विस्तार पहिल्या टप्प्यात होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मेट्रोच्या निगडीपर्यंतच्या प्रवासाला पालकमंत्र्यांचा खोडा
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या निगडी आणि कात्रजच्या विस्तारामध्ये पुणे-पिंपरीचे कारभारी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीच खोडा घातला आहे. ‘आधी पिंपरीपर्यंतची मेट्रो धावू दे, मग निगडीच्या विस्ताराचे पाहू,’ अशा शब्दांत त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विस्ताराच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यामुळे, आता मेट्रोचा निगडी आणि कात्रजचा विस्तार पहिल्या टप्प्यात होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती; चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात – श्रीरंग बारणे
पिंपरी (Pclive7.com):- पुणे महामेट्रोच्या ३१ किलोमीटर या मार्गाला केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. पुणे महामेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्याबाबत राज्य सरकारने उचित निर्णय घ्यावे, असे पत्र केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्य सरकारला दिले आहे. मंत्री पुरी यांनी हे पत्र खासदार श्रीरंग बारणे यांना देखील पाठविले आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.
पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो - श्रीरंग बारणे
पिंपरी - पुणे महामेट्रोच्या 31 किलोमीटर मार्गाला केंद्र सरकारने सात डिसेंबर 2016 रोजी मान्यता दिली आहे. मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. याबाबत राज्य सरकारने उचित निर्णय घ्यावा, असे पत्र केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी राज्य सरकारला दिले आहे. पत्राची प्रत खासदार श्रीरंग बारणे यांनाही पाठविली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.
मुंढेंबाबत कुरघोडीचे राजकारण
पिंपरी - ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा प्रशासकीय सेवेत धाडा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी एकीकडे लावून धरलेली असतानाच महापालिकेच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त करीत शिस्तप्रिय व धडाकेबाज सनदी अधिकाऱ्याची गरज लक्षात घेऊन पालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिंगरोडबाधितांच्या घर बचाव संघर्ष समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
'पीएमआरडीए'चे अधिसूचित क्षेत्र घोषित
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अधिकारक्षेत्रातील गावांची सुधारित हद्द निश्चित करून त्याला "अधिसूचित क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. तसेच पीएमआरडीएला "विशेष नियोजन प्राधिकरण' म्हणून मंजुरी दिल्याची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे.
अनधिकृत बांधकामप्रश्नी आयुक्तांच्या दालनात खलबते
पिंपरी – राज्य शासनाने 31 डिसेंबर 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. परंतु, बांधकाम नियमित करण्यासाठी केवळ सात ते आठ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामप्रश्नी सत्ताधारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नुकतीच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात बैठक घेवून जाचक अटी-शर्तींवर तोडगा काढण्यात यावा, तसेच बांधकाम नियमितकरणात सूसुत्रतता आणण्यात यावी, अशी मागणी केली.
समाविष्ट गावांच्या विकासाला प्राधान्य
पिंपरी – भविष्यात पिंपरी-चिंचवडचा जो भाग विकसित होणार आहे, याचा विचार करूनच तेथील भागाला सोयी सुविधा देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी येवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे काढली आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
चिंचवडच्या ऑटो क्लस्टरमध्ये तोडफोड
चिंचवड – मोफत घरांची जाहिरात देऊन एका खासगी गृहकर्ज कंपनीने भरवलेल्या प्रदर्शनात संतप्त नागरिकांनी तुफान तोडफोड केली. प्रदर्शनाला सुरुवात झाल्यानंतर येथे केवळ गृहकर्जाविषयी माहिती मिळत असल्याचे कळताच सकाळपासून रांगा लावून थांबलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांचा सहनशीलतेचा बांध फुटला. हातात येईल ते साहित्य घेऊन नागरिकांनी इथल्या टेबल, खुर्च्या फेकून देण्याबरोबरच गृहकर्जाची माहिती देणारी पोस्टर्स फाडली.
चार पोलीस निरिक्षकांच्या बदल्या
पिंपरी – परिमंडळ तीनमधील चार पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाकड, सांगवी, भोसरी व पिंपरी या पोलीस स्टेशनमधील निरिक्षकांचा समावेश आहे.
आता शाळांमध्ये “अग्निशमन समिती’
पिंपरी – आपल्या कार्यकक्षेतील एका शाळेत आगीपासून बचाव करता येऊ शकेल अशा विद्यार्थी, शिक्षक व पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या शालेय अग्निशमन व्यवस्थापन समितीसह विविध स्तरांवरील एकूण दहा समित्या स्थापना करण्याचे निर्देश महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. याशिवाय येत्या रविवारी (दि. 21) आगीपासून बचाव करण्याची प्रात्यक्षिके आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई करा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील अनाधिकृत हॉटेल, रुफ टॉप टेरेस हॉटेल, बार, हुक्का बार पार्लर यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष अमोल उबाळे यांनी पुण्याच्या जिल्हा अधिकाऱ्याकडे केली आहे.
आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने कसली कंबर
पिंपरी – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापासून कंबर कसली आहे. तब्बल 50 हजार क्रियाशील सदस्यांची नोंदणी करण्याचे उदिष्ट राष्ट्रवादीने ठेवले असून या सदस्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रभागात जावून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिली.
चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे भुईसपाट
चिंचवड – ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 16, 17 व 18 मध्ये महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चालु असलेले अनधिकृत पत्राशेड व आर. सी. सी. बांधकामावर कारवाई केली.
भोसरीतील ‘मराठा वॉरियर्स’ची पुणे ते वाघा सायकलस्वारी पूर्ण
चौफेर न्यूज – समाजातील अनेक ध्येयवेडी माणसे स्वत:चा उदरनिर्वाह करून समाजासाठी आणि देशासाठीही काम करत असतात. अशाच प्रकारे देशाच्या रक्षणार्थ ‘जॉईन इंडियन आर्मी’ हा संदेश घेऊन भोसरीतील ‘मराठा वॉरियर्स’ या ग्रुपच्या १० ध्येयवेड्या तरुणांनी सायकलीवर पुणे ते वाघा बार्डर हि अनोखी मोहीम नुकतीच यशस्वीरीत्या पार पाडली.
नागरी प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यासाठी प्रभाग स्तरावर विशेष बैठका – एकनाथ पवार
चौफेर न्यूज – महापालिकेच्या सर्व प्रभागातील नागरी प्रश्न व समस्या जलद गतीने मार्गी लावण्यासाठी सर्व प्रभाग स्तरावर विशेष बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. तर बैठकीत पदाधिकारी नगरसदस्य, नगरसदस्या यांनी केलेल्या सुचनांचे पालन करण्याबाबत व प्रभागातील प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज अ प्रभागात आयोजीत करण्यात आलेल्या प्रभागस्तरीय विशेष बैठकीमध्ये ते बोलत होते.
निगडीतील राष्ट्रध्वजाची रंगीत तालीम यशस्वी: प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती उद्यानामध्ये सुमारे १०७ मीटर उंच राष्ट्रध्वजाचे येत्या प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्याचे काम पूर्ण झाले असून उपमहापौर शैलजा मोरे व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत त्याची रंगीत तालीम शुक्रवारी (दि. १९) घेण्यात आली.
भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटन सरचिटणीसपदी प्रमोद निसळ यांची निवड
एक व्यक्ती, एक पद या तत्त्वानुसार पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पक्षाच्या शहर संघटन सरचिटणीसपदी प्रमोद निसळ यांची निवड केली आहे. तसेच संघटनेत यापुढे सहाऐवजी चार सरचिटणीस असतील. भाजपच्या पक्ष संघटनेतील संघटन सरचिटणीसपद हे शहराध्यक्षानंतरचे दुसरे महत्त्वाचे पद आहे.
महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण
सांगवी – नवी सांगवीतील भक्ती सामाजिक संस्था आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या मोफत महिला प्रशिक्षण शिबिराची सांगता नुकतीच झाली.
“त्या’ अधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांचे पाठबळ?
पिंपरी – महापालिकेच्या प्रशासकीय कमकाजात अफरातफर करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांचे हात दगडाखाली अडकल्यामुळे त्यांच्यावर कारवाई अटळ असताना सत्ताधारी पदाधिकारी कारवाई करण्यास चालढकल करीत आहेत. सत्ताधाऱ्यांवर राजकीय दबाव वाढवत असल्यामुळे दोषी अधिकाऱ्यांच्या आपील अर्जांवर निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांचे तीन प्रस्ताव स्थायीने पुन्हा तहकूब ठेवले आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)