Sunday, 25 December 2016

पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड शहराचे महत्व व वेगळेपण अधोरेखित!

देर आये दुरुस्त आये!! M Venkaiah Naidu said Pimpri Chinchwad will be allowed for Smart City Mission next level competition केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडवर अन्याय झाला हे मान्य केले, झालेली चूक सुधारण्यासाठी शहराला स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी केले जाईल असे आजच्या भाषणात सांगितले ...यामागे राजकीय तळमळ, दूरदृष्टी, गणिते, लाभ काहीही असो समाधान याचेच वाटतंय आज पहिल्यांदा पिंपरी चिंचवड शहराचे महत्व व वेगळेपण अधोरेखित होत आहे... पीसीसीएफ, connecting ngo व असंख्य सजग नागरिक ज्यांनी हा लढा सतत तेवत ठेवला त्यांचे आभार 🙏 आशा करूयात निगडीपासून मेट्रो मागणी सुद्धा लवकरच मान्य होईल
यात एकच भीती आहे कि निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पिंपरी-चिंचवडकरांना आमिषे दाखवली जात नाहीयेत ना? स्मार्ट सिटी प्रवेशाबद्दल जे काही सांगण्यात आले त्याचा सरकारी अध्यादेश शहरी विकास खाते तसेच स्मार्ट सिटी वेबसाईटवर लवकरच अपलोड झाला पाहिजे. तसेच मेट्रोचे पिंपरी ते निगडी काम पहिला टप्पा सुरु असतानाच केले जाईल यावरही आमची भूमिका अशीच असेल कि यासाठीच वाढीव खर्चाची मान्यता, सरकारी अध्यादेश काढावेत आणि मगच घोषणा करावी...

पिंपरी-चिंचवडला मानवाधिकार पुरस्कार


पिंपळे गुरव : मानवी हक्क आणि जागृतीच्या वतीने देण्यात येणारा मानवाधिकार राज्यस्तरीय पुरस्कार पिंपरी-चिंचवड शहराला मिळाल्याने शहराच्या नावलौकिकामध्ये भर पडली आहे. हा पुरस्कार निवृत्त न्यायाधीश गणेश देव यांच्या हस्ते ...

स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडही - वैकंया नायडू

एमपीसी न्यूज - पुणे व पिंपरी-चिंचवड दोन्ही शहरे मिळून स्मार्ट सिटी होणे गरजेचे. मात्र एकत्र अहवाल आल्याने पिंपरी-चिंचवडला न्याय देता…

स्मार्ट सिटीत पिंपरीला संधी


पुणे : स्मार्ट सिटी योजनत समावेश न झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेला या योजनेत परतण्याची संधी देत असल्याचे केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी शनिवारी जाहीर केले. पुणे पालिकेचे मार्गदर्शन घेऊन आता पिंपरी चिंचवड ...

टीडीआर प्रकरणावर सीमा सावळे गप्प का?- तानाजी खाडे

महापालिका सभेतील प्रकाराबाबत खाडे यांची दिलगिरी   एमपीसी न्यूज - ठेकेदार मॅनेज झाला नाही की माहिती अधिकारात माहिती काढून तोडपाणी…

विचित्र पसरलेला प्रभाग, दारू, पैसा आणि दादागिरी!


पिंपरी व चिंचवडचा काही भाग एकत्र करून तयार झालेला हा प्रभाग 'विचित्र' पद्धतीने पसरलेला आहे. झोपडपट्टय़ा आणि सोसायटय़ा अशा संमिश्र प्रभागात दारू, पैसा आणि दादागिरी हेच सूत्र राहणार आहे. माजी आमदार अण्णा बनसोडे यांचा बऱ्यापैकी ...

पुणेकरांनी मानले अनोख्या प्रकारे पंतप्रधानांचे आभार

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोच्या भूमिपूजनासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणेकरांनी अनोख्या पद्धतीने आभार मानले आहे. भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित…

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोच्या पिहील्या टप्प्याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज(शनिवारी) कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर झाले. यावेळी राष्ट्रवादीचे…