Friday, 9 February 2018

#MetroFromNigdi पिंपरी-चिंचवड शहराच्या अस्मितेसाठी तुम्ही कधी लढणार?

पिंपरी-चिंचवड शहराच्या अस्मितेसाठी तुम्ही कधी लढणार? पुण्याने पुन्हा मारली बाजी! वनाज ते चांदणी चौक विस्तार मंजूर, महामेट्रो करणार खर्च. पिंपरी-चिंचवड पुन्हा मागेच! पिंपरी-निगडी विस्ताराच्या DPR चे काम सुरु नाही... स्पर्धेचे अंपायर तेच आपले माननीय पालकमंत्री

सामील व्हा; एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
आंबेडकर चौक पिंपरी, रविवार 11 फेब्रुवारी सकाळी 10 वा.

#MetroFromNigdi फेसबुक प्रोफाईल फोटो-हॅशटॅगद्वारे नेटिझन्सचा उपोषणाला पाठिंबा!

निगडीपासून मेट्रो तसेच एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला तुम्ही सुद्धा अनोख्या पद्धतीने पाठिंबा देऊ शकता. खालील लिंक वापरून प्रोफाईल फोटो बदला Change your Facebook Profile Picture using below link. Also enable hashtag as shown in pic

👉 https://www.isupportcause.com/campaign/metro-from-nigdi/u4by2


#MetroFromNigdi पालिका अर्थसंकल्पात मेट्रो प्रकल्पासाठी निधीची तरतूद करावी, नागरिकांची मागणी

निगडीपासून मेट्रोची सुरुवात व्हावी ही गेल्या अनेक वर्षांपासूनची आग्रही मागणी पिंपरी-चिंचवडमधून होत आहे. यासाठी गेली पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला जात असूनही अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये नागरीकांसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या निगडी मेट्रोबाबत तरतूद करण्याची मागणी आता जोर पकडत आहे.

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटनांचे रविवारी पिंपरीत उपोषण

पुणे मेट्रो पहिल्याच टप्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘कनेक्टिंग एनजीओ’अंतर्गत येत्या रविवारी (दि.११) लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणात विविध संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन, पीसीसीएफने केले आहे. 

PCMC plans new flyover to ease Hinjawadi traffic woes

PIMPRI CHINCHWAD: The civic body plans to construct a new flyover on the Nashik Phata-Wakad BRTS route to make the daily commute more bearable for techies working in Hinjewadi

PCMC agrees to give 8 plots for parking to MahaMetro

Pimpri Chinchwad: The civic body will give eight plots to Maharashtra Metro Rail Corporation Limited (MMRCL) on rent for creating parking lots for the commuters of Pimpri-Swargate Metro route. The general body approved such a resolution at its meeting this week.

Consultants for infra work

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has decided to appoint consultants for the construction of flyovers, bridges, underpasses, roads, skywalks, subways, storm water drainage project, landscaping and interior designing.

There are 28 consultants for flyovers, bridges, underpasses and skywalks.There are 23 consultants for landscaping and interior designing. The civic body will have 23 consultants for landscaping, and 25 for land designing

Corporation to take steps to check pollution of river

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will construct three sewage treatment plants and lay 209-km-long drainage pipeline network in a bid to reduce river pollution .The total cost of the project has been pegged at Rs 147.84 crore.

‘Residential’ tax tag for private non-English medium schools

PIMPRI CHINCHWAD: From the 2018-19 financial year, private Marathi, Hindi and Urdu medium schools will fall into the residential category for property taxes.

Progress report & future plans of PMRDA

What PMRDA has done in the last 3 years and what it has planned to achieve in the next 3 years?

समाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार – महेश लांडगे

पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट ग्रामीण भागातील विकास कामांच्या माध्यमातून अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तळवडे ते च-होली मोशी पर्यंतच्या नागरिकांचा पिण्याचा प्रश्न आंद्रा व भामा आसखेडच्या प्रकल्पामुळे येत्या काळात सुटणार असल्याचे, आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

महापालिका आणि शिव व्यापारी सेनेच्या वतीने भाटनगरमध्ये स्वच्छता मोहीम

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि शिव व्यापारी सेनेच्या वतीने पिंपरीतील भाटनगर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भाटनगर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. येथे पडलेला कचरा कुजल्यामुळे त्यातून येणाऱ्या उग्र वासाने परिसरात राहणारे नागरिक त्रस्त झाले होते.  त्यामध्ये दोन ट्रक कचरा गोळा करण्यात आला. तसेच परिसरात औषध फवारणीही करण्यात आली.

भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडणारी पिंपरी-चिंचवड पालिका बरखास्त करा – सचिन साठे

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एक वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपाच्या पुढा-यांनी भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. मनपाची तिजोरी मोकळी करण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. करदात्या नागरीकांच्या पैशाची लूट आणि सावळा गोंधळ रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका बरखास्त करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

[Video] पिंपरीत शिवसेना करणार आंदोलन !


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २४ बाय ७ हि पाणी योजना राबविली जाणार असून त्यासांठी जो खर्च केला जाणार आहे त्यास शिवसेनेचा विरोध असून त्याविरोधी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करणार असल्याची माहिती शिवसेने शहर प्रमुख योगेश बाबर यांनी आज पत्रकारांना बोलताना 

पिंपरी पालिका बरखास्त करण्याची मागणी

काँग्रेसचे भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप

भाडेकरू माहिती ऑनलाइन नोंदणीमुळे गैरसोय

पुणे - भाडेकरूंची माहिती देण्यासंदर्भात पोलिसांनी सुरू केलेल्या ‘टेनंट इन्फॉर्मेशन फॉर्म’ या ऑनलाइन पद्धतीमुळे गैरसोय होत आहे. या पद्धतीविषयी पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती नसल्याचा दावा ‘असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्‌स’ या संघटनेने केला आहे. 

नायलॉनचा मांजा कर्दनकाळ

पुणे - काचेचा थर असलेला नायलॉन मांजा, तंगुस आणि गट्टू मांजा अशा नावाखाली शहर व उपनगरांत साध्या मांजापेक्षा महाग मांजा सर्रास विकला जात आहे. पतंग कापण्याच्या शर्यतीमध्ये हा नायलॉन मांजा सर्वसामान्य नागरिकांसह पक्ष्यांचे गळे कापून जिवाला धोका निर्माण करत आहे. अनेकांच्या आयुष्यात हा मांजा कर्दनकाळ ठरत आहे.

नदी पात्रातील शेतीमुळे रोजगाराचा ‘आनंद’

औंध - बोपोडी येथील आनंद काची या तरुणाने बोपोडी येथील मुळा नदीच्या पात्रातील रिकाम्या पट्ट्यात भाजीपाल्याची शेती फुलवून रोजगार तर मिळवलाच; परंतु ग्रामीण शेतीला शहरी रूप देत भाजीपाला उत्पादन घेऊन वेगळा मार्ग चोखाळला आहे. 

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पुण्यापर्यंत?

पुणे - मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणारी बुलेट ट्रेन पुण्यापर्यंत आणण्याच्या प्रस्तावावर नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) विचार करीत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून समजले. ही ट्रेन पुण्यापर्यंत आल्यास पुणे ते मुंबई अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करता येईल.

आयबीसी लीग क्रिकेट स्पर्धा

पिंपरी – इंडियन बिजनेस क्‍लबच्या वतीने येत्या शनिवारपासून (दि.10) व्हायब्रंट आयबीसी लिगचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतींमधील सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांमधील एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे, अशी माहिती आयबीसी संस्थापक अध्यक्ष अनिल मित्तल यांनी गुरुवारी (दि.8) पत्रकार परिषदेत दिली.