पिंपरी (Pclive7.com):- आशिया खंडातील ‘श्रीमंत’ महापालिका म्हणून लौकिक मिळवलेले पिंपरी चिंचवड शहराचा गेल्या ३६ वर्षात ‘गाव ते स्मार्ट सिटी’ असा प्रवास आहे. उद्योगनगरी म्हणून नावारूपाला आलेले हे शहर ‘आयटी हब’ म्हणून ओळखू लागले आहे. देश पातळीवरील ‘बेस्ट सिटी’च्या पुरस्काराने तर शहराच्या शिररेचात ‘मानाचा तुरा’ रोवला गेला आहे. आता या शहराने ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 11 October 2018
Social groups renew drive to remove water hyacinth
PIMPRI CHINCHWAD: Over a dozen social organizations have sta ..
PCMC's old trash tender stays at new rates
PIMPRI CHINCHWAD: The standing committee of the PCMC on Tuesday suspended the fresh tender for garbage collection and transportation while approving the appointment of the contractors, who were selected on the basis of the old tender, after reducing its rates.
कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात दुप्पट वाढ
पिंपरी - महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत कुशल, अर्धकुशल, अकुशल व शिकाऊ कामगारांसह सफाई कामगारांच्या मूळ वेतनात जवळपास दुपटीने वाढ केली आहे. दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेतनवाढ झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मूळ वेतन आणि विशेष भत्ता मिळून त्यांना एक जुलैपासून ३१ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी किमान वेतन दिले जाणार आहे. याबाबत कामगार कल्याण विभागाने महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना कळविले आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वर्धापनदिनानिमीत्त गुणवंतांचा सत्कार
चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिना निमित्ताने विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा तसेच औद्योगिक क्षेत्रातील गौरविलेल्या उद्योजकांचा आणि गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार गुरुवार दि. ११ ऑक्टोबर २०१८ रोजी पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.
चिंचवडचे जागृत कालिकामाता मंदिर
चिंचवड येथे नवरात्रोत्सवास मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. तानाजीनगरमधील श्री कालिकामाता मंदिरात भक्तांची रेलचेल दिसून येत आहे. 1965 साली सरदार रामभाऊ रखमाजी गावडे यांनी या मंदिरात कालिकामातेची प्रतिष्ठापना केली. प्रतिष्ठापनेपासून चिंचवडगावात कालिकामातेचा जागर सुरू झाला असून, आजवर अनेक भक्तांनी कालिकामातेच्या आशीर्वादाचा लाभ घेतला आहे.
मनुष्यबळ, वाहनांचा प्रश्न लवकरच सोडविणार
नवीन पोलीस ठाणे, आयुक्तालय झाल्यानंतर अनेक समस्या असतात हे खरं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया संदर्भात यापूर्वी जागा, वाहने, मनुष्यबळ या विषयी मीटिंग झाल्या आहेत. त्यासाठी मोठा पाठपुरावा होणे गरजचे आहे. नवीन आयुक्तालयातील समस्या सोडविण्यासाठी नक्की प्रयत्न करणार असून येणाऱ्या काही महिन्यात हे प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीष बापट यांनी बुधवारी चिखली येथे दिले.
औद्योगिक आस्थापनांना लागू करण्यात आलेला शास्ती कर रद्द करावा – लघुउद्योग संघटनेची मागणी
एमपीसी न्यूज – शास्तीकर रद्द करण्याबाबत स्वत राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला असून लघुउद्योजकांच्या अडचणी सोडविणार आहे. शास्तिकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करावा व बांधकामे अधिकृत करावीत असा ठराव महानगरपालिकेमध्ये मंजूर करून घेतला जाईल, असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी कुदळवाडी येथे झालेल्या बैठकीत दिल्या. भोसरी विधान सभेचे आमदार महेश दादा […]
फक्त 45 गाड्यांवर धावतंय पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय; लोकप्रतिनिधींसह पोलीस महासंचालकांचेही दुर्लक्ष
एमपीसी न्यूज – केवळ आयुक्तालय सुरु झाले म्हणजे सगळे चांगले होत नाही. ते सुरळीत चालू होण्यासाठी कित्येक गोष्टींची आवश्यकता असते, त्याची पूर्तता करणं शासनाचे काम आहे. परंतु पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सध्या मनुष्यबळापासून ते वाहनांपर्यंत अनेक अडचणींचा सामना करीत आहे. 15 पोलीस ठाणे असलेल्या आयुक्तालयात केवळ 45 पोलीस वाहने आहेत. त्यातील बहुतांश कारची अवस्था अतिशय वाईट […]
चौकशी करून उपमहापौरांच्या फलकांवर कारवाई – आयुक्त
पिंपरी-चिंचवड : उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी वाढदिवसानिमित्त लावलेले फलक अधिकृत आहेत. काही फलक अनधिकृत असल्यास त्याची चौकशी केली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे पिंपळे गुरव येथील फ्लेक्स बेकायदेशीर ठरवत ते कार्यक्रमापुर्वीच तात्काळ काढून टाकण्याची तत्परता महापालिका प्रशासनाने काही दिवसांपुर्वी दाखविली होती. परंतु, सत्ताधार्यांचे फलक काढण्यास विलंब करत प्रशासन दुटप्पी करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
PCMC examines Delhi's syllabus
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) officials led by the mayor Rahul Jadhav went to Delhi on Monday to examine the curriculum and education system of the Municipal Corporation of Delhi (MCD).
११३ कंपन्यांना व्यवसाय बंदच्या नोटिसा - गिरीश बापट
पुणे - ॲपच्या माध्यमातून विनापरवाना खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ११३ कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून त्यांच्या विक्रीला चाप लावला आहे. या कंपन्यांना प्रशासनाने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या सर्व कंपन्या स्विगी, झोमॅटो, फुडपांडा आणि उबर इट्स या कंपन्यांशी संलग्न आहेत. अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
पिंपरीतील शंभर उद्योगांचे स्थलांतर (व्हिडिओ)
पिंपरी - महाराष्ट्राच्या तुलनेत मध्यम उद्योगांना अन्य राज्यांमध्ये मिळणाऱ्या रेड कार्पेट सुविधांमुळे शहरातल्या सुमारे १०० उद्योगांनी गुजरात, उत्तरांचल, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये स्थलांतर करण्यास पसंती दिल्याचे समोर आले आहे.
याचसाठी केला होता अट्टाहास ?
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने कचरा उचलण्याच्या सुमारे 350 कोटींच्या निविदेला मान्यता दिली आहे. मात्र, जुन्याच निविदांमध्ये काही बदल करुन, नव्याने मान्यता द्यायची होती, तर मग नवीन निविदा काढण्याची गरजच काय होती? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे जुनीच निविदा योग्य होती, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
PCCOE score huge win
Dr DY Patil Institute of Hotel Management and Catering Technology (HMCT) won an eight-goal thriller against Prof Ramkrishna More ACS College winning 5-3, while Pimpri Chinchwad College of Engineering ran up a huge scoreline in the college boys’ category at the RFYS football tournament, at the Hedgevar ground on Wednesday.
डी.वाय.पाटीलमध्ये वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन
वन्यजीव संवर्धनाबाबत जागृती होण्यासाठी
आकुर्डी : वन्यप्राण्यांबद्दल सर्वसामान्य लोकांना माहिती होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वन्यजीव सप्ताह हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे विविध शाळांमधून आणि महाविद्यालयांमधून वन्यजीव सप्ताहाचे साजरा होतो. डॉ.डी.वाय.पाटील महाविद्यालयात दि.1 ते 7 सप्टेंबर रोजी वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वन्यजीवांची माहीती तसेच त्यांच्या संर्वधनाची जागृती निर्माण व्हावी, या मुख्य उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन केले जाते. सप्ताहाचे उद्घाटन भीमाशंकर येथील वन अधिकारी शिवाजी फंटागरे यांच्या हस्ते करण्यात आले. फटांगरे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना भारतातील वनांची माहीती दिली. त्याचप्रमाणे भारतातील अभयारण्ये तसेच राष्ट्रीय उद्याने, त्यामध्ये आढळणारे प्राणी-पक्षी यांचे पी.पी.टी.द्वारे सादरीकरण देखील केले. विद्यार्थ्यांना माहिती नसलेल्या पक्षांची देखील यावेळी फोटोच्या आधारे विद्यार्थ्यांना माहिती दिली.
विलास लांडे पुन्हा शिरूरच्या आखाड्यात
पिंपरी – शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत माजी आमदार विलास लांडे, ऍड. देवदत्त निकम आणि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे विलास लांडे पुन्हा एकदा शिरूर लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
राष्ट्रवादीत मतभेदाची ठिणगी
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समिती व “स्मार्ट सिटी’ अंतर्गत महापालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा दिल्ली दौरा उरकला आहे. मात्र, या दौऱ्यावर नगरसेवक मयूर कलाटे यांनी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या या दौऱ्यात सहभाग असल्याने कलाटे यांच्या टीकेमुळे राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली आहे. याशिवाय स्थायी समितीमध्ये मंजुर झालेल्या 350 कोटींच्या कचरा उचलण्याच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीच्या स्थायी सदस्या गीता मंचरकर यांनीच विरोध केला अन्य दोन नगरसेवकांची चुप्पीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ग्रीन अॅपल बाजारात दाखल
पिंपरी – फळांचे दर वाढलेले असले तरी आजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या असणाऱ्या फळांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. परदेशी फळांच्या यादीत असणाऱ्या ड्रॅगन फ्रूट आणि किवी पाठोपाठ “ग्रीन अॅपल’ची आवक बाजारात झाली आहे. ग्रीन ऍपल मधुमेहावर गुणकारी मानले जात असल्याने त्याला मोठीमागणी आहे.
प्रा. मोरे महाविद्यालयातर्फे माहिती अधिकार आठवडा
पिंपरी – महापालिकेतर्फे 6 ते 12 ऑक्टोबर हा माहिती अधिकार आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने महापालिका व प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातर्फे “माहिती अधिकार कायद्यातील तरतुदी’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
जमिअत-ए-इस्लामी हिंद तर्फे ‘नशा विरोधी जनजागृती’
निगडी – जमिअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र आकुर्डी शाखेच्या वतीने नशा विरोधी अभियानांतर्गत शहरात जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. “नशेचा नाश : देशाचा विकास’ या ध्येयाने आकुर्डी, रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, निगडी परिसरातील विविध शाळा, मस्जिद, झोपडपट्टीतील युवकांना नशेपासून परावृत्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बॅनर्स, स्टिकर्स, पोस्टर, पत्रके आणि व्याख्यानांद्वारे प्रबोधन केले.
‘मास्क’ वापरताय; सावधान!
स्वाईन फ्लूची धास्ती : अधिकवापराचा मास्क धोकादायक
पिंपरी – शहरात स्वाईन फ्लू’च्या फैलावामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संसर्गजन्य आजारामुळे शहरात सरकारी व खासगी रुग्णालयात तोंडाला मास्क लावलेले नागरिक दिसून येत आहेत. मात्र, मास्क सहा तासाहून अधिक वापरणे धोकादायक असून वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. कालावधीपेक्षा अधिक तास मास्क वापरल्यास विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे, नागरिकांनी बहुतांशी प्रमाणात तोंडाला मास्क न वापरता कापडी रुमालाच अथवा कापडी मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य तज्ञांनी केले आहे.
पिंपरी – शहरात स्वाईन फ्लू’च्या फैलावामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संसर्गजन्य आजारामुळे शहरात सरकारी व खासगी रुग्णालयात तोंडाला मास्क लावलेले नागरिक दिसून येत आहेत. मात्र, मास्क सहा तासाहून अधिक वापरणे धोकादायक असून वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. कालावधीपेक्षा अधिक तास मास्क वापरल्यास विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे, नागरिकांनी बहुतांशी प्रमाणात तोंडाला मास्क न वापरता कापडी रुमालाच अथवा कापडी मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य तज्ञांनी केले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)