Thursday, 7 December 2017

शहरात उभारणार किड्‌स सिटी

  • महिला व बालकल्याण समितीचा निर्णय ः चिमुकल्यांच्या शहरासाठी प्रस्तावास मंजूरी
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे. अहमदाबादच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये देखील किड्‌स सिटी साकारण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतला. शहरातील लहान व शालेय मुलांना विविध क्षेत्रांतील ज्ञान साध्या-सोप्या भाषेत अवगत व्हावे, याकरिता किड्‌स सिटी उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या स्थायी सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर होत्या.

[Video] प्लास्टिक मुक्त परिसरासाठी नागरिकांचा पुढाकार


Tackling e-waste the ‘microbial’ way

MOBILE CHARGERS are an inevitable part of our lives, but, once rendered non-functional, they are among one of the most disposed-off electronic waste items found at any e-waste scrap market.

PCMC promises to undo horrors of its dog pounds


In response to Animal Welfare Board’s recurring complaints, commissioner calls for new shelter and revised rescue rules
Following recurring complaints Pimpri- Chinchwad residents, the Animal Welfare Board of India has written to the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) commissioner about the ill treatment of animals at the PCMC pound. Their address highlighted a specific case and trailed on other such negligent incidents, which prompted a meeting with officials concerned.

PCMC zoo has no space for the snakes it's caught


Snake catchers write to municipal chief for a solution, say they haven’t even been paid for rescues that amount to 500 a month
As many as 500 snakes have been caught in a month within the Pimpri- Chinchwad Municipal Corporation (PCMC) limits, but there is no facility to provide shelter to these snakes, which has become a major cause of concern for snake catchers working with PCMC. The twin towns of Pimpri and Chinchwad have, over time, brought within their fold many villages from the fringe areas. However, PCMC-run Bahinabai Chaudhary Zoo at Akurdi has no more space for accommodating the snakes.

Cops to be zero tolerant towards traffic rule offenders from today

Pune: The traffic police will launch an indefinite 'zero tolerance drive' in various parts of the city from Thursday onwards.Strict action will be taken against the traffic violators and they will be penalised on the spot.

Deputy commissioner of police (traffic) Ashok Morale said 28 stretches, one in each traffic division in Pune and Pimpri Chinchwad, have been identified for the initiative. "Each stretch is of up

शिक्षण समितीत वाढणार स्विकृत सदस्य?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचे कारभारी म्हणून पालकमंत्री गिरीश बापट हे महापालिकेच्या कामकाजात लक्ष घालू लागले आहेत. पालिकेच्या शिक्षण समितीत पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी स्विकृत सदस्य संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळेच शिक्षण समिती स्थापनेचा विधी समितीने उपसूचनेसह मंजूर केलेला विषय सर्वसाधारण सभेत तहकूब ठेवण्यात आला. पुण्याच्या धर्तीवर शिक्षण समिती स्थापना करुन कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Maha-Metro selects Puneri Pagadi design for Pune metro stations

The Maha Metro Corporation has decided to create a ‘Puneri Pagadi’ facade for metro stations. It has now called for suggestions from the citizens on this. The Maha-Metro is erecting the metro corridor between the Pimpri-Chincwad to Swargate and Vanaz to Ramwadi corridors. Work of both the Metro corridors has already begun.

जांबाज अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले १३ जणांचे प्राण…!

भोसरी येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्पोरेट इमारतीत लागलेल्या आगीतून अडकलेले १३ कर्मचारी बचावले, त्यात ८ महिलांचा समावेश होता. अग्निशमन दलाच्या जांबाज जवानांच्या धाडसामुळे या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपअग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे आणि प्रताप चव्हाण यांच्यासह ८ जवानांच्या टीमने ही कामगिरी केली.

[Video] PMPML च्या बसला शॉर्ट सर्किट मुळे लागली आग

चिंचवड गावातील बस स्टॉप वर उभ्या असलेल्या PMPML च्या बसला शॉर्ट सर्किट मुळे लागली आग चांदखेड या गावरून ही बस प्रवासी घेऊन चिंचवडला आली होती आणि बस स्टॉप वर पुढील प्रवासा साठी उभी असताना अचानक बसला आग लागली ह्या बस मध्ये कोणी प्रवासी किंवा कर्मचारी नसल्याने मोठा अनर्थ टळला

“झिरो बॅलन्स’ खात्यासाठी दोनशे रुपये?

शिक्षण विभाग व बॅंकाचा अजब कारभार : पालकांना भुर्दंड
सुवर्णा गवारे नवले 
पिंपरी – शैक्षणिक साहित्य वाटपात भ्रष्टाचार होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा थेट लाभ मिळावा याकरिता विद्यार्थ्यांची बॅंक खाती उघडण्याआधीच गोठली आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग आणि बॅंकामध्ये समन्वय नसल्याकारणाने बॅंक खाते उघडण्यासाठी “झिरो बॅलन्स’च्या खात्यासाठी विद्यार्थ्यांकडून चक्क 200 रुपये आकारले जाण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाला भविकांची गर्दी

चिंचवड – चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी मंदिरात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, संस्कृती संवर्धन व विकास महासंघाच्या वतीने श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाला भाविकांची गर्दी झाली होती.

राष्ट्रीय योगपंच परीक्षेत प्राजक्‍ता पांगारे प्रथम

पिंपरी – योगा फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय योग संघटनेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय योगपंच परीक्षेत थिनेस क्रुप कंपनीचे मनोज पाटील तर राष्ट्रीय योगपंच परीक्षेत टाटा मोटर्सची प्राजक्ता पांगारे भारतात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

प्राप्तीकर कायद्यातील तरतुदींवर जनजागृतीसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

पिंपरी, दि.(प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने आयकर कायद्यातील तरतुदी व कार्यपध्दती संदर्भात जनजागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने पालिकेच्या सर्व आहरण वितरण अधिकारी आणि आयकर विषयक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवडच्या ऑटोक्‍लस्टरमध्ये मंगळवारी झालेल्या कार्यशाळेस मुख्य लेखापाल राजेश लांडे, प्राप्तीकर विभागाचे उपायुक्त डॉ. आदित्य साओले, प्राप्तीकर निरीक्षक अरफळे, ऍड शीतल लोहाडे, प्राप्तीकर सल्लागार दिलीप दिक्षीत, लेखाधिकारी प्रशांत झंनकर, रमेश जोशी, उपलेखापाल सुधिर शिंदे यांच्यासह महापालिकेचे लेखाधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

वासराच्या विरहाने गायीचे रौद्ररुप!

  • पिंपरी वाघेरे येथील घटना : बचावासाठी नागरिकांची धडपड
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी वाघेरे येथील सुखवानी सिटी समोरील जयहिंद शाळा ते पिंपरी वाघेरे गावात जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच रहदारी असते. पिंपरी ते काळेवाडी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोकाट गायींचे कळप दिवस-रात्र ठिय्या मांडून असतात. मंगळवार दि. 5 ला सकाळी साडेअकराच्या सुमारास गायींच्या कळपातील वासरू गायब झाले. त्यामुळे गायीने हंबरडा फोडला. याला वाहन चालकच कारणीभूत आहेत, असा समज झाला. चिडलेल्या गायीने पिंपरी वाघेरे परिसरात भर रस्त्यावर हाहा:कार माजवला. वाहन चालकांचा अक्षरशः पाठलाग करण्यास सुरुवात केली. गायीने दिसेल त्या वाहनांचा दूरपर्यंत पाठलाग केला. यामुळे दोन दुचाकी एकमेकांवर जोरात आदळल्या. कोणालाही दुखापत झाली नसली, तरी 15 ते 20 मिनिटे वाहतूक थांबली. रस्त्याच्या दोन्ही बाजुला गाय उधळत होती. गायीचे रौद्ररुप पाहून वाहन चालक जागीच थांबून स्वतःचा बचाव करीत होते.

32 गुन्ह्यातील सराईत जेरबंद

  • साडेतेरा लाखांचा ऐवज जप्त : निगडी पोलिसांची कारवाई
पिंपरी, (प्रतिनिधी)- वाहनांची तपासणी करताना संशयावरुन ताब्यात घेतलेला तरुण तडीपार गुन्हेगार निघाला. त्याने 32 गुन्हे केल्याचे तपासात समोर आले असून, त्याच्याकडून 40 तोळे सोने, रोख पन्नास हजार रुपये व एक मोटार सायकल असा एकूण 13 लाख, 57 हजार, 660 रुपयांचा ऐवज निगडी पोलिसांनी जप्त केला. निगडी ठाण्याच्या हद्दीतील पाच गुन्ह्यांसह पुणे शहरातील 27 गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. मुकेश उर्फ मुन्ना उर्फ धन्या उर्फ धनंजय बबन मुने (वय21, सध्या रा. सुतारदरा, दत्तमंदीराजवळ, कोथरुड, पुणे मूळगाव पागोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.

उद्योग नगरी गारठली!

  • ढगाळ वातावरण : “ओखी’ चा प्रभाव
पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्यभर ओखी वादळाचा परिणाम जाणवत आहे. उद्योग नगरी देखील यातून सुटली नाही. सकाळपासून वातावरण ढगाळ राहून गारवा जाणवत होता. त्यातच शहरात ठिकठिकाणी पावसाच्या सरी झाल्याने वातावरणातील गारठा वाढल्याने पिंपरी-चिंचवडकर चांगलेच गारठले. दुपारनंतर सूर्यदर्शनामुळे वातावरणात बदल झाला. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. अरबी समुद्रात ओखी वादळाचा तीन दिवस धोका आहे. सोमवार दि. 4 पासून उद्योग नगरी व परिसरात त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. सोमवारी सायंकाळी उद्योग नगरीत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. शहराच्या काही भागांत सायंकाळी, तर काही भागांत रात्री उशिरा पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. मंगळवारी सकाळी देखील वातावरणात फारसा फरक पडला नाही. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने वातावरणातील गारठा वाढत गेला. सकाळपासूनच नागरीक स्वेटर्स, जर्कीन व कानटोपी अशी उबदार कपडे घालून दैनंदिन कामाला लागले. मात्र, दुपारी लख्ख सूर्यप्रकाश पडल्याने वातावरणातील गारठा कमी झाला. शहरातील वाहतुकीचा वेग दुपारपर्यंत मंदावला होता. दुपारनंतर जनजीवन पूर्वपदावर आले.