Friday, 27 September 2013

Pimpri Chinchwad Municipal Corporation's BRT route to link Nigdi with e-way

The Pimpri Chinchwad Municipal Corporation has planned a new Bus Rapid Transit (BRT) route between Nigdi and Kiwale, thus taking the number of BRTS routes in Pimpri Chinchwad to five.

45 bus stations on two routes planned

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will build 45 bus stations on two BRT routes that are likely to become operational by January end.

Eligibility for grants: PCMC favours 3-year-in-existence norm for SHGs


The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has drawn severe criticism and at the same time been showered with praise for its two important decisions taken in the last one week. Citizens say both the decisions show the civic body is capable of ...

रेडझोन प्रश्नावर संसदेची पिटीशन ...

रेडझोन परिसराची पाहणी करण्यासाठी तसेच रेडझोन बाधितांबरोबर चर्चाविनिमय करण्यासाठी संसदेतील 11 खासदारांची पिटीशन समिती शनिवारी (दि. 28) भोसरीच्या दौ-यावर येत आहे. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार अनंत गीते हे या पिटीशन समितीचे अध्यक्ष आहेत.

शहर स्वच्छता करणा-यांची बीले थकवली

1 ऑक्टोबरपासून 'काम बंद'चा इशारा
शहर स्वच्छता करणा-या स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांची देयके पिंपरी महापालिकेने गेल्या तीन महिन्यांपासून रखडविली आहे. त्यामुळे साफसफाई करणा-या दीड हजार कामगारांची उपासमार सुरु आहे. महापालिकेने येत्या दोन दिवसात थकीत देयके न

काळेवाडीमध्ये मोफत रेबीज लसीकरण ...

ख्यातनाम शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांच्या स्मृतीदिनानिमित्त पेट हाऊस अ‍ॅण्ड क्लिनिकच्या वतीने काळेवाडी येथे 28 ते 29 सप्टेंबर या कालावधीत श्वान आणि मांजरांसाठी मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित केले आहे.

महापालिकेच्या नगरसचिवपदी उल्हास बबन जगताप पात्र

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसचिवपदासाठी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये समाज विकास अधिकारी उल्हास बबन जगताप पात्र ठरले आहेत. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनामार्फत आगामी विधी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. समितीच्या शिफारशीनंतर आणि महापालिका सभेच्या मंजुरीनंतर जगताप यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

च-होलीकरांचा शहर अभियंत्यांना तीन घेराव

पिंपरी-चिंचवड महापालिकेत 17 वर्षांपूर्वी समावेश होवूनही दुजाभावाच्या वागणुकीमुळे नशिबी वनवास आलेल्या च-होलीकरांनी भाजपच्या नेतृत्वाखाली आज शहर अभियंत्यांना सुमारे तीन तास घेराव घातला. नागरी सुविधा तातडीने पुरविण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बनावट ‘बाटा’ वाटपातून पिंपरी शिक्षण मंडळाचा गोलमाल चव्हाटय़ावर

हे प्रकरण म्हणजे ‘हिमनगाचे टोक’ आहे, असे अनेक ‘उद्योग’ मंडळाने वर्षांनुवर्षे बिनबोभाट केले आहेत. मात्र, सदस्य, अधिकारी व ठेकेदारांमध्ये संगनमत असल्याने त्याची वाच्यता होत नव्हती. आता थेट गुन्हा दाखल झाला आहे.

‘आम्हीही समाजाचे घटक, आमचाही विचार करा’

पिंपरी : अपंगांसाठी असलेली विशिष्ट टक्केवारीची अट शिथिल करून महापालिकेने नोकरीत सामावून घ्यावे, रोजगाराच्या योजना राबवाव्यात, या मागण्यांकडे ‘आम्हीसुद्धा समाजाचे घटक आहोत, आमच्याकडे लक्ष द्या’ असे फलक उंचावून कर्णबधिर, मूकबधिरांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. 

अनधिकृत बांधकामे थांबली; जुन्या सदनिकांना भाव

संजय माने - पिंपरी
महापालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांना पायबंद घातला आहे. मालकीची गुंठा-अर्धा गुंठा जागा असूनही परवानगी मिळत नाही, म्हणून घर बांधता येत नाही. बड्या बिल्डरच्या गृह योजनांमधील सदनिका घेणे परवडत नाही; त्यामुळे जुन्या सदनिका खरेदीचा कल वाढला आहे. या परिस्थितीमुळे जुन्या सदनिकांनाही वाढीव भाव मिळू लागला आहे. नव्या बांधकामाचे दर चार ते पाच हजार प्रतिचौरस फूट आहेत, तर दहा अथवा त्यापेक्षा जुन्या सदनिकांना तीन ते साडेतीन हजार रुपये भाव आला आहे. 

पाच किलोमीटरसाठी पाच रुपये घ्या

- मिशन पीएमपी ५-५ : स्वारगेट, कात्रज आणि हडपसरमध्ये मोहीम

पुणे : वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक समस्येने रौद्र रुप धारण केले आहे. शहरांचे अस्तित्व टिकविण्याकरीता सक्षम, सुरक्षित आणि स्वस्त सार्वजनिक वाहतूक हा एकमेव उपाय आहे. 

'वायसीएम'च्या खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा

पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएमएच) गेल्या दहा वर्षांतील विविध यंत्रसामग्री, साहित्य खरेदी आणि नोकरभरती गैरव्यवहारप्रकरणी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने चौकशी पूर्ण केली आहे.

पुरावे दिल्यास कारवाई करू - आयुक्‍त

पिंपरी - ताथवडे येथील जमिनींवर आरक्षण न टाकण्यासाठी एकरी चाळीस लाखांची मागणी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी केला होता.

निकृष्ट बूटवाटप प्रकरणी महापालिकेचे घूमजाव

पिंपरी - निकृष्ट दर्जाचे बूटवाटप केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, असे लेखी निवेदन शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी आशा उबाळे यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार पिंपरी पोलिसांना दिले होते.