Saturday, 7 December 2013

शहर सुधारणा समितीला केरळ दौ-याचे वेध

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीला केरळ दौ-याचे वेध लागले आहेत. सुमारे पाच लाख रुपये खर्च करुन हा दौरा केला जाणार असून त्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

ताथवडय़ातील फेरबदलामुळे ६०० घरे वाचली

ताथवडे गावच्या विकास आराखडय़ावरून शिवसेना व सत्तारूढ राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच असल्याने हा विषय चिघळू लागला आहे. १७४ कोटी रुपये किमतीच्या जागांचे आरक्षण बदलताना राष्ट्रवादी नेत्यांनी कोटय़वधींची माया गोळा केल्याचा आरोप शिवसेनेने केला.

पीएमपीच्या बसमध्ये 'आयटीएस' यंत्रणा

पुणे -&nbsp बस किती वाजता कोणत्या थांब्यावर थांबणार आहे?, पुढचा थांबा कोणता असेल?, किती अंतर असेल, बसचे वेळापत्रक आदी विविध प्रकारची माहिती आता "पीएमपी'च्या बसमध्येच प्रवाशांना मिळणार आहे.

'अक्षरधारा' तर्फे निगडीत शनिवारपासून मायमराठी शब्दोत्सव

वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अक्षरधारा संस्थेचा 'मायमराठी शब्दोत्सव' शनिवारपासून (दि. 7) निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनात मराठी, इंग्रजी अशा विविध विषयांची नामवंत लेखकांची एक लाखाहून अधिक पुस्तके वाचकांना पाहता येणार आहेत.

चायनीज पदार्थ विक्रेत्यांकडून टाकाऊ पदार्थ रस्त्यावर

पिंपरी-चिंचवड शहरातील चायनीज विक्रेत्यांकडून टाकाऊ पदार्थ रस्त्यावरच टाकले जात असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. थेरगावमध्ये रस्त्यावरच मांस टाकून दिले जात असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
शहरात चायनीज