वाहन चालविताना आवश्यक लायसन्स आणि आरसी बुक बाळगताना नागरिकांची होणारी तारांबळ आता संपुष्टात आली आहे. मोबाईलमध्ये ‘डीजीलॉकर’ अॅपच्या मदतीने लायसन्स आणि वाहनांची कागदपत्रे जतन केली जाणार आहेत. डिजीटल यंत्रणेमुळे लायसन्स हरवणे, वाहनांचे आरसी बुक न मिळणे, अशा तक्रारींना वाव राहणार नाही. केंद्र शासनाच्यावतीने ‘डीजीलॉकर अॅप’चे नुकतेचउद्घाटन करण्यात आले आहे. या अॅपबद्दल माहिती देण्यासाठी आरटीओ कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 25 May 2018
वाकडमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग विषयावर परिसंवाद कार्यशाळा
तुम्हाला हे माहित आहे का? पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर जेवढे पाणी लागते त्याच्या 35 ते 40 टक्के पाण्याचा पुरवठा हा भूगर्भातून होतो... शहरातील लहान-मोठ्या कंपन्या, सोसायट्या ह्यांना बोअरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते तसेच टँकरने होणारा पाणीपुरवठा हा सुद्धा बोअरवेलचाच असतो असे असले तरी पाण्याचा अतिप्रमाणात उपसा झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत कमालीची घट होतेय. भविष्यातील संकट ओळखून आपल्याला वेळीच उपाय केले पाहिजे. उपाय म्हणजे जसे आपण भूगर्भातून पाणी काढतो तसे भूगर्भात जास्तीतजास्त पाणी जिरवणे. याच विषयावर - 'भू-जलाचे सामुहिक पुनर्भरण आणि पर्जन्यजल संचयन (Rainwater Harvesting)' वाकडमध्ये दिनांक 27 मे, रविवार रोजी परिसंवाद कार्यशाळा आयोजित केली आहे.
विख्यात तज्ञ हिमांशु कुलकर्णी व शशिकांत देशपांडे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे... तेव्हा कृपया हि संधी दवडू नये
-------------------------------------------
जाहीर निमंत्रण परिसंवाद
विषय : भू-जलाचे सामुहिक पुनर्भरण आणि पर्जन्य जल संचयन
रविवार दिनांक 27 मे 2018 सकाळी 10 ते 12:30
स्थळ : सभागृह, रोहन तरंग को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, वाकड चौक, वाकड, पिंपरी-चिंचवड
अधिक माहिती - https://www.facebook.com/events/361918100968914/
विख्यात तज्ञ हिमांशु कुलकर्णी व शशिकांत देशपांडे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे... तेव्हा कृपया हि संधी दवडू नये
-------------------------------------------
जाहीर निमंत्रण परिसंवाद
विषय : भू-जलाचे सामुहिक पुनर्भरण आणि पर्जन्य जल संचयन
रविवार दिनांक 27 मे 2018 सकाळी 10 ते 12:30
स्थळ : सभागृह, रोहन तरंग को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, वाकड चौक, वाकड, पिंपरी-चिंचवड
अधिक माहिती - https://www.facebook.com/events/361918100968914/
समांतर पुलाचे डांबरीकरण सुरू
हॅरिस पुलाला बांधलेल्या समांतर पुलाचे डांबरीकरण गुरुवारी सुरू झाले असून, पिंपरीकडून पुण्याकडे जाणारा पूल वाहतुकीसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात खुला करण्यात येणार आहे. पुण्याकडून पिंपरीकडे येणाऱ्या समांतर पुलाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.
रखडलेल्या रस्त्याचे काम होणार पूर्ण: प्राधिकरणाकडुन नागरिकांना नोटिस
वाल्हेकरवाडी (पुणे) - चिंचवड-रावेत या 34.5 मीटर रस्त्याच्या अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा ताबा घेण्याकरिता अडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाच्या वतीने अंतिम नोटिसा बजावीत, घरे खाली करण्यास सागितले आहे. घरांवरती अंतिम लाल रेषांचे मार्किंग करण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात भूसंपादन अभावी रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणा पासून ते ओढ्या पर्यंतचे काम अर्धवट अवस्थेत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने कंबर कसली असून, त्याकरिता आवश्यक असणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी आज वाल्हेकर वाडी येथील 60 व्यावसायिक बांधकामांना प्राधिकरणाने खाली करण्याच्या अंतिम नोटीस बजावल्या आहेत.
लोहमार्गासाठी 2 कोटी ब्रास माती
पिंपरी - पुणे ते नाशिकदरम्यान प्रस्तावित लोहमार्ग पश्चिम घाट परिसरात येत आहे. या घाटात अनेक चढ-उतार असल्यामुळे त्यासाठी सुमारे दोन कोटी ब्रास माती लागणार आहे. या मातीच्या खरेदीपोटी रेल्वे प्रशासनाला तब्बल अठराशे ते दोन हजार कोटी रुपये खर्च लागणार आहे. त्याबाबतचा पाहणी अहवाल रेल्वे प्रशासनाने नुकताच रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे.
पवनामाईसाठी सरसावली तरुणाई
नवी सांगवी - ज्या नदीच्या पात्रात आम्ही बालपणी खेळलो, बागडलो, स्वच्छ पाण्यात पोहायला शिकलो, तिच्या काठाकाठाने फिरता-फिरता आंबट-गोड बोरे चाखली, त्या नदीची प्रदूषित अवस्था आता बघवत नाही. त्यामुळेच आमची पवनामाई स्वच्छ करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, ही भावना आहे पिंपळे गुरव येथील तरुणाईची. केवळ भावनाच नव्हे, तर प्रत्यक्ष कामाला त्यांनी सुरवात केलेली आहे.
कुणाल कुमार स्मार्ट सिटीचे प्रमुख
पुणे महापालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार यांची स्मार्ट सिटीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्याला स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केलेल्या कुमार यांना आता देशातील सर्वच शहरांमधील स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे.
रुपीनगर येथील भाजी मंडईचा प्रश्न सुटणार?
निगडी – रुपीनगर परिसरात अनेक वर्षापासून भाजी मंडईचा प्रश्न प्रलंबीत आहे. येथे अधिकृत भाजी मंडई नसल्याने भाजी विक्रेते रस्त्यावर बसून भाजी विकतात. एवढ्या मोठ्या परिसराची गरज पूर्ण करणारी मोठी भाजी मंडई रस्त्यावर उतरल्याने रोज सकाळ-सायंकाळ या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असते.
एच.ए.कंपनीची ५६ एकर जागा पोलीस आयुक्तालयासाठी घ्यावी – खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील एच.ए. कंपनीची ५६ एकर जागा राज्य सरकारने घेतल्यास एच.ए. कंपनी आर्थिक संकटातुन बाहेर येईल. पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यभागी पोलिस आयुक्तालय होईल. यासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. दरम्यान, पिंपरी येथील हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्स कंपनीच्या व तेथील कामगारांच्या प्रश्नाबाबत आज खासदार श्रीरंग बारणे यांनी कंपनीच्या मुख्य व्यवस्थापक नीरजा सराफ यांच्या समवेत बैठक घेवून चर्चा केली. या वेळी त्यांच्या समवेत सुनिल पाटसकर, अरूण बोऱ्हाडे व इतर कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वी शहर खड्डेमुक्त करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची पालिका प्रशासनाला सुचना
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वत्र खडड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर पाऊसामुळे आणि जड वाहतूकीमुळे रस्त्यावर खड्डे निर्माण होतात. पावसाळ्यात अस्तित्वातील खड्ड्यांमुळे त्यांचा आकार वाढून खोली वाढते. त्यामुळे वाहन धारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे ही बाब लक्षात घेवून येत्या पावसाळ्या अगोदर संपूर्ण शहर खड्डे मुक्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी, अशी भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका प्रशासनास लेखी निवेदनाव्दारे सुचना दिलेली आहे.
वाकड-पुनावळेत विकासकामांचा धडाका; एकाच दिवशी सहा कामांचे भूमिपूजन
पिंपरी (Pclive7.com):- वाकडमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे. गुरुवारी (दि.२४) रोजी एकूण सहा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. येत्या १८ महिन्यात ही कामे पूर्ण होणार असून या कामांची निविदा रक्कम २६ कोटींच्या घरात आहे.
वाकड – ताथवडे येथील रस्त्याच्या कामाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २५, मधील वाकड – ताथवडे येथील २४ व १८ मीटर रुंद रस्त्याचे भूमिपूजन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते संपन्न झाले.
गंगानगर ते मराठी शाळा रस्ताचे काँक्रिटिकरण सुरू
सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील गंगानगर ते मराठी प्राथमिक शाळा रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामास विद्यमान नगरसेवक व नागरीकांच्या हस्ते नारळ फोडुन सुरूवात करण्यात आली. गेली अनेक वर्षापासुन दुर्लक्षित असलेल्या या अंतर्गत रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटिकरण होत असल्याने येथील शाळकरी मुले, जवळच असलेली खाजगी हॉस्पीटल्स व नागरीकांना रहदारीसाठी सोयीचा ठरणार आहे.
सांगवी स्मशानभुमी नुतणीकर एक वर्षाच्या कामाला दोन वर्ष
सांगवी : जुनी सांगवी येथील मुक्तिधाम स्मशानभुमी नुतनिकरणाचे काम गेली दोनवर्षापासुन सुरू आहे. कासव गतीने सुरू असलेले काम एक वर्षाच्या कालावधीत पुर्ण करणे अपेक्षित होते. महापालिकेकडील संपादीत जागा व शिल्लक जागेवर काही जागामालकांनी मालकी हक्काचा दावा केला होता. जागेचा मोबदला मिळावा अशी त्यांची मागणी होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळात या कामाची सुरूवात करण्यात झाली. एका वर्षाच्या मुदतीचा कालावधी असलेले काम गेली दोन वर्षापासुन सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 17 अनधिकृत रूफ टॉप हॉटेल
पिंपरी - मुंबईत रूफ टॉप हॉटेलला लागलेल्या आगीत होरपळून 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाने अनधिकृत हॉटेलवर हातोडा उगारला. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अशी 17 अनधिकृत रूफ टॉप हॉटेल असल्याची माहिती माहिती अधिकार कायद्यातून (आरटीआय) समोर आली आहे.
पीएमपी प्रवाशांना तिकीट दरवाढीचा झटका?
इंधन दरवाढीमुळे मागील दोन महिन्यात डिझेलचा दर आठ रुपयांवर गेल्याने अडचणीत आलेल्या पीएमपीच्या तिकीट दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. जाहिराती आणि इतर माध्यमातून तग धरण्याचा प्रयत्न सुरु असला, तरी डिझेलचे भाव नियंत्रणात न आल्यास प्रवाशांना तिकीट दरवाढीचा झटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आहे.
[Video] पेट्रोल दार वाढीविरोधी राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन !
पेट्रोल दार वाढीविरोधी राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन ! दिनांक २५/०५/२०१८
[Video] पिंपरी पालिकेचे राजन पाटील यांचा पदभार काढून घ्या- नितीन यादव
पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता राजन पाटील हे अकार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांच्यावर ठपका आहे त्यामुळे त्यांच्या पदभार काढून घ्यावा असे माहिती अधिकारातील कार्यकर्ते नितीन यादव यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवडमध्ये नगरसेवक जावेद शेख यांनी अधिकाऱ्यालाच फासले काळे
पाण्याचे नियोजन होत नसल्याने राग अनावर
दिव्यांग कल्याणकारी केंद्रासाठी सल्लागार
पिंपरी – महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी कल्याणकारी केंद्र उभारण्यात येणार असून आता त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. मेसर्स के. बी. पी. सिव्हिल इंजिनिअरींग सर्व्हिसेस यांना हे काम देण्यात आले असून या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी (दि. 23) मान्यता दिली.
Subscribe to:
Posts (Atom)