Sunday, 9 September 2012

Pune transport utility okays Rs1 fare hike

Pune transport utility okays Rs1 fare hike: PMPML proposal will be placed before the district transport authority; civic activists to launch protest.

रस्त्यावर खिळे टाकण्याचा प्रकार पुन्हा सुरू

रस्त्यावर खिळे टाकण्याचा प्रकार पुन्हा सुरू
पिंपरी, 8 सप्टेंबर
फुगेवाडी येथे आज रात्री पुणे-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात खिळे पडलेले आढळून आल्यामुळे खिळे टाकून वाहने पंक्चर करण्याचा गोरखधंदा पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
www.mypimprichinchwad.com

विदयार्थ्यांना परिपूर्ण बनविण्याची पालक आणि शिक्षकांची जबाबदारी

विदयार्थ्यांना परिपूर्ण बनविण्याची पालक आणि शिक्षकांची जबाबदारी
पिंपरी, 8 सप्टेंबर
टक्केवारीच्या चक्रात अडकेल्या पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आवडीकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये असलेल्या कमतरतेला ओळखून ती भरून काढणे हे पालकांचे व शिक्षकांचे काम आहे. शिक्षण व तरूणाईच्या जोरावरच भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
www.mypimprichinchwad.com

बाबांच्या संस्कारातूनन मिळाला समाजकार्याचा वसा- प्रकाश आमटे

बाबांच्या संस्कारातूनन मिळाला समाजकार्याचा वसा- प्रकाश आमटे
पिंपरी, 8 सप्टेंबर
आनंदवनात कुष्ठरोग्यासोबत घालवलेले बालपण.... जवळून पाहिलेले बाबांचे कार्य.. त्यातून झालेली सामाजिक जाणीव.. वैद्यकीय शिक्षणादरम्यान मंदाताईंशी झालेली जवळीक.... बाबांनी हेमलकसावरील लोकबिरादरी प्रकल्पाची सोपवलेली जबाबदारी.... तेथील माडीया गोंड आदिवासी लोकांचे जीवन.. काम पाहून पुढे आलेले मदतीचे हात... जंगली प्राण्यांबरोबरचे स्नेहबंध......आणि याच कार्यासाठी लढत असलेली आमटे कुटुंबाची तिसरी पिढी.., ! असे अनेक पैलु प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये पिंपरी-चिंचवडकरांना उलगडून दाखविले.

घर बचाओ कृती समिती'ची स्थापना

'घर बचाओ कृती समिती'ची स्थापना
पिंपरी, 8 सप्टेंबर
महापालिका व प्राधिकरणाकडून अनधिकृत बांधकामांवर सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात शिवसेना, भाजप, काँग्रेस, मनसे, आरपीआय तसेच नागरी हक्क सुरक्षा समितीसह शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत शनिवारी पिंपरी-चिंचवड घर बचाओ कृती समितीची स्थापना केली. समितीचे उद्‌घाटन येत्या 12 सप्टेंबर रोजी चिखली येथे ह.भ.प. बंडातात्या कराडकर आणि मुंबई महापालिकेचे माजी पोलीस उपायुक्त गो. रा. खैरनार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

रंगरेषे पलिकडचा चित्रकार

रंगरेषे पलिकडचा चित्रकार
पिंपरी, 8 सप्टेंबर, सुरेश पाटील
रंगरेषांशिवाय चित्रांची कल्पना कोणी करुन शकेल ? होय हे खरे आहे. निगडी येथील चित्रकार चंद्रकांत होनकळस बिंदु, वर्तुळ या भुमिती रचनांचा वापर करुन चित्र साकारतात. चित्रकलेप्रमाणे त्यांचा मूर्तीकलेतही हातखंडा आहे. मात्र त्यातही वेगळेपण जपले आहे. त्यांनी लाकडापासून तयार केलेल्या व्यक्तीरेखा तोंडात बोटे घालायला लावतात.

Kudalwadi road problem

Kudalwadi road problem
www.youtube.com
पालिकेच्या सौजन्याने कुदळवाडीत 'मोटोक्रॉस'चा थरार कुदळवाडी, चिखली, मोशी प्राधिकरणाच्या परिसरातील सातत्याने वाढत्या नागरिकरणामुळे कुदळवाडीतून जाणा-या स्पाईन र...

शहरातील फक्त 48 टक्के गणेश मंडळे नोंदणीकृत

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33050&To=9
शहरातील फक्त 48 टक्के गणेश मंडळे नोंदणीकृत
पिंपरी, 8 सप्टेंबर
शहरामधील परिमंडळ तीनमध्ये सुमारे 1200 गणेश मंडळे असून या मंडळापैकी फक्त 48 टक्के गणेश मंडळे पोलिसांकडे नोंदणीकृत आहेत. तर गणेश मंडळांच्या निष्काळजीपणामुळे गणेश उत्सव तोंडावर येऊन ठेवल्यानंतरही उर्वरीत 52 टक्के गणेश मंडळांची नोंदणी झालेली नाही. यावरून पोलिसांकडे शहरातील एकूण मंडळांपैकी अत्यल्प मंडळाची नोंदणी पोलिसांकडे झालेली असल्याचे उघडकीस आले आहे.

पालिकेच्या सौजन्याने कुदळवाडीत 'मोटोक्रॉस'चा थरार

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33034&To=10
पालिकेच्या सौजन्याने कुदळवाडीत 'मोटोक्रॉस'चा थरार
पिंपरी, 7 सप्टेंबर
कुदळवाडी, चिखली, मोशी प्राधिकरणाच्या परिसरातील सातत्याने वाढत्या नागरिकरणामुळे कुदळवाडीतून जाणा-या स्पाईन रोडवर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वाहतुकीमुळे याच रस्त्यावरील कुदळवाडी चौकात वाढत्या अपघातांचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाने रस्त्यावर खड्डा खोदून गेल्या दीड महिन्यापासून हा रस्ता बंद केला आहे. मात्र, बंद रस्त्यामुळे येथील रहिवाश्यांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करून येथे उड्डाणपुल बांधण्याची मागणी कुदळवाडीतील रहिवाश्यांकडून करण्यात येत आहे.

8-storey building at Vaibhav Nagar razed

8-storey building at Vaibhav Nagar razed: It was an illegal construction on river bed PIMPRI: An eight-storey building illegally constructed on the Pavana river bed in Vaibhavnagar was razed to the ground as part of an anti-encroachment drive launched by the Pimpri Chinchwad Municipal Corporation on Thursday.
8-storey building at Vaibhav Nagar razed

अवघ्या बारा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी सुरू !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33031&To=6
अवघ्या बारा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी जय्यत तयारी सुरू !
पिंपरी, 7 ऑगस्ट
तू सुखकर्ता..तू दुःखहर्ता....
तूच कर्ता..आणि करविता..
सकल कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचे आगमन आता अवघ्या बारा दिवसांवर आले असल्याने कारागीर आता गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यामध्ये व्यस्त झाले आहेत. काही दुकानांमधून चौकातील स्टॉल्समधून गणेशमूर्ती विक्रीसाठी सुध्दा ठेवण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी चौकाचौकात बाप्पाचे आगमन होणार असे सांगणारे 'मी येतोय !' हे फलक सुध्दा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याशिवाय यंदा विसर्जनाच्या दिवशी रात्री पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी दिली गेल्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आत्तापासूनच उधाण आले आहे.

पिंपरीत आठ मजली इमारत पडली

पिंपरीत आठ मजली इमारत पडली: पिंपरी-चिंचवड महापालिकेने विशेष मागविलेल्या हायराईज बूम पोकलेनच्या सहाय्याने वैभवनगर येथील आठ मजली इमारत गुरुवारी पाडली. महापालिकेच्या ड प्रभागांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

Pavana dam 95.26% full

Pavana dam 95.26% full: PCMC to release water only if there are heavy rains.

संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांना आशा भोसले पुरस्कार जाहीर

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33023&To=5
संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांना आशा भोसले पुरस्कार जाहीर
चिंचवड, 7 सप्टेंबर
अखिल भारतीय म्रराठी नाट्य परिषदेची पिंपरी चिंचवड शाखा, कलारंग प्रतिष्ठान आणि सिध्दीविनायक ग्रुपतर्फे दरवर्षी दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार यंदा सुप्रसिध्द संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांना जाहीर करण्यात आला आहे. देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या संगीतकारास हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याबाबतची माहिती नाट्य परिषदेच्या शहरशाखेचे कार्यकारिणी सदस्य किरण येवलेकर यांनी दिली आहे.

लेखकांनी कसदार लेखनासाठी लेखनतंत्राचा अभ्यास करावा- हेमंत एदलाबादकर

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_33021&To=9
लेखकांनी कसदार लेखनासाठी लेखनतंत्राचा अभ्यास करावा- हेमंत एदलाबादकर
पुणे, 8 सप्टेंबर
आजकाल माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये लेखन तंत्रविषयक अनेक पुस्तके, वेबसाईट उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे पुस्तक वाचून लेखन शिकावे का, असा कोतेपणाचा विचार न करता नवोदित किंवा प्रतिथयश लेखकांनी दर्जेदार साहित्यनिर्मितीसाठी नवनवीन तंत्राचा अभ्यास करावा असे आवाहन सुप्रसिध्द लेखक, पटकथाकार हेमंत एदलाबादकर यांनी केले.