चिंचवड – सिटीझन फोरम (पीसीसीएफ) च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या वर्षीपासून प्रथमच मप्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 12 May 2018
वाकडमधील पलाश सोसायटीत ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत
पिंपरी (पुणे) : कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत असताना वाकडमधील पलाश सोसायटी मात्र, स्वतःचा कंपोस्टींग प्रकल्प उभारून महिन्याला सुमारे आठशे किलो कंपोस्ट खत तयार करत आहे. या खताचा वापर सोसायटीतील झाडांना किंवा त्याची विक्री करून सोसायटी खर्चास हात भार लावला जात आहे.
जीएसटीने घोटला औषधांचा गळा
पिंपरी - चिंचवड येथील 78 वर्षांचे अंकुश वाळुंज वायसीएम रुग्णालयात उपचार घेताहेत. पण त्यांच्यावरील उपचारांसाठी असलेली औषधीच वायसीएममध्ये उपलब्ध नाहीत. डॉक्टरांनी लिहून दिलेली चारपैकी तीन औषधे बाहेरून खरेदी केल्याने त्यांना आठशे रुपयांचा खर्च आला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने वाळुंज यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचे ठरविले होते. मात्र, येथेही खासगी रुग्णालयामधीलच परिस्थिती असल्याने ते हतबल झाले आहेत. हीच परिस्थिती वायसीएममधील अनेक रुग्णांची आहे.
भोसरी परिसरात विजेचा खेळखंडोबा
भोसरी - गवळीमाथा गुलाब पुष्प उद्यानाजवळील टेल्को रस्त्यालगत महावितरणकडून शुक्रवारी (ता. 11) केबल दुरुस्तीसाठी जेसीबीद्वारे खड्डा खोदताना झाड उन्मळून पडले. त्यामुळे उद्यान विभागाने केलेल्या कारवाईत जेसीबी आणि क्रेन ताब्यात घेतले. त्यामुळे केबल दुरुस्तीचे काम बंद राहिले. त्यामुळे वीजपुरवठा बंद झाला. पाण्याचीही गैरसोय झाली. महापौर नितीन काळजे यांच्या मध्यस्थीनंतर जेसीबी, क्रेन महावितरणकडे सोपविल्याने काम पुन्हा सुरू झाले. सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत झाला.
PMPML's night bus service system goes for a toss
PUNE: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited’s initiative of night servicing of buses has come to a naught, prompting a spurt in bus breakdowns.
The transport body recorded over 15,000 bus
The transport body recorded over 15,000 bus
‘वायसीएम’मध्ये रुग्णांची सुरक्षा वार्यावर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) रुग्ण सुरक्षा वार्यावर आहे. वॉर्डमधील रुग्णांवर रुग्णालयाचे लक्ष नसते. उपचारासाठी आलेला रुग्ण बाहेर फिरत असतात. रुग्णालयाच्या या अनास्थेमुळे गुरुवारी (दि. 10) एका रुग्णाचा रुग्णालयीन आवारात मृत्यू झाला. ‘वायसीएम’ची रुग्णांविषयी असणार्या या अनास्थेला आळा बसणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
खोदाई शुल्काबाबत बैठक घ्या - साबळे
पिंपरी - पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या खोदाई शुल्कामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे भारत संचार निगमला शहरात काम करता येत नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी भारत संचार निगम आणि महापालिका यांनी समन्वय बैठक घ्यावी, अशी सूचना खासदार अमर साबळे यांनी केली.
डॉ. रॉय यांचा पदभार काढला
- डॉ. पवन साळवे यांना “न्याय’?
- महापालिका वर्तुळात चर्चा : दोघांच्या वादात प्रशासन अडचणीत
पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे विभागप्रमुख आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांचा पदभार काढून अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
डॉ. रॉय आणि डॉ. पवन साळवे यांच्यामध्ये पदोन्नतीवरून अनेक वर्षापासून वाद सुरु होता. या दोघांच्या पदोन्नतीच्या वादामध्ये पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था झाली होती. उच्च न्यायालयाची प्रकरणाला स्थगिती असल्याने यावर भाष्य करणे चुकीचे आहे असे विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सांगण्यात आले होते.
डॉ. रॉय आणि डॉ. पवन साळवे यांच्यामध्ये पदोन्नतीवरून अनेक वर्षापासून वाद सुरु होता. या दोघांच्या पदोन्नतीच्या वादामध्ये पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था झाली होती. उच्च न्यायालयाची प्रकरणाला स्थगिती असल्याने यावर भाष्य करणे चुकीचे आहे असे विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सांगण्यात आले होते.
पक्षाच्या सूचनेनुसार नगरसेवक वसंत बोराटे यांचा राजीनामा – सभागृह नेते एकनाथ पवार
निर्भीडसत्ता – पक्षाच्या सुचनेनुसार भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते नाराज नसून त्यांच्या जागी आश्विनी बोबडे यांना विधी समितीवर संधी दिली जाणार आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली आहे.
पिंपरीतील आमदारांविरोधात तक्रारी
खासदार व गटनेत्यांची फूस असल्याची चर्चा; भाजपमधील गटबाजीचे राजकारण पुन्हा तापले
पिंपरी शहर भाजपमधील गटबाजीच्या राजकारणाने पुन्हा उचल खाल्ली असून त्याचाच एक भाग म्हणजे, कारभारी आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या विरोधात भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला आहे. खासदार अमर साबळे तसेच पक्षनेते एकनाथ पवार यांची फूस यामागे असल्याचे पक्षवर्तुळात मानले जात असले तरी असा काही प्रकार नसल्याचे साबळे व पवारांच्या समर्थकांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरी शहर भाजपमधील गटबाजीच्या राजकारणाने पुन्हा उचल खाल्ली असून त्याचाच एक भाग म्हणजे, कारभारी आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या विरोधात भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला आहे. खासदार अमर साबळे तसेच पक्षनेते एकनाथ पवार यांची फूस यामागे असल्याचे पक्षवर्तुळात मानले जात असले तरी असा काही प्रकार नसल्याचे साबळे व पवारांच्या समर्थकांनी स्पष्ट केले आहे.
पिंपरीत मनसेचा आता एकच शहराध्यक्ष; सचिन चिखले यांच्यावर जबाबदारी!
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सचिन चिखले यांच्यावर सोपविण्यात आली. पूर्वी शहरात दोन शहराध्यक्ष होते. मात्र आता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार एकच शहराध्यक्ष असणार आहे. मुंबईत ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी झालेल्या बैठकीत चिखले यांच्या जबाबदारी सोपविण्यात आली.
[Video] पिंपरी पालिका कुटुंब नियोजन कार्यक्रमात पिछाडीवर !
पिंपरी पालिका महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन कार्यक्रमात प्राप्त आकडेवारीवरून पिछाडीवर असल्याचे दिसून येते !
जुन्या सांगवीत मुख्य बस थांब्याची दुरावस्था
जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथील वसंत दादा पुतळा मुख्य बस थांब्यावरील प्रवाशी निवारा शेडची दुरावस्था झालेली आहे. मुख्य बस थांबा असल्याने येथुन पुणे व उपनगराकडे जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
Subscribe to:
Posts (Atom)