Monday, 12 March 2018

सायलीला तुमच्या मदतीची गरज!

पिंपरी - सामान्य मुलींप्रमाणे वाढणारी खेळकर, हसरी, खोडकर सायली गजभीव सहा वर्षांची असताना अचानक खेळताना दारात चक्कर येऊन पडली आणि मग चक्‍कर येण्याचे सत्र सुरूच झाले. डॉक्‍टरांना आधी फिट येत असेल असे वाटले. पण, निदानाअंती समजले की तिला ‘प्रायमरी पल्मोनरी हायपरटेंशन’ हा गंभीर आजार झालाय. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. सायलीचा त्रास वाढत गेला. आता तिच्यावर हृदय आणि फुफ्फुस बदलण्याची शस्त्रक्रिया करायची आहे.

भूसंपादनापूर्वी कामाचे आदेश

पिंपरी - शहरांतर्गत उपनगरांना जोडणाऱ्या सुमारे २६.४ किलोमीटरच्या प्रस्तावित एचसीएमटीआर (उच्च क्षमता द्रुतगती मार्ग) रिंगरोड प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण झालेले नाही. मात्र, महापालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यासाठी संबंधित ठेकेदाराला कामाचे आदेश दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे प्रकल्पासाठी प्रस्ताव करून स्थायी समिती सभेपुढे मांडला. त्यात २८.४५ कोटी यंदाच्या वर्षासाठी मंजूर करण्यात आले. त्यानंतर तातडीने कामाचे आदेशही दिले. याकरिता लोकप्रतिनिधींकडून प्रशासनावर मोठा दबाव आल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहर स्वच्छ सर्वेक्षण निकालाची प्रतीक्षा

पिंपरी-चिंचवड शहराचे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत गेल्या महिन्यात पाहणी करण्यात आली आहे. त्याचा निकाल मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये अपेक्षित आहे. पहिल्या वर्षी देशात नवव्या स्थानी असलेल्या शहराचे स्थान गेल्या वर्षी 72 व्या स्थानी फेकले गेले होते. यंदा हा क्रमांक सुधारतो की, शहर आणखी मागे पडते, याकडे महापालिका पदाधिकारी, प्रशासनासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. यंदा समाधानकारक स्थान मिळेल, अशी अधिकार्‍यांची अपेक्षा आहे. 

Awareness drive to cut water wastage

PIMPRI CHINCHWAD: The civic body plans to conduct a public awareness campaign to check water wastage.

पीएमपीच्या उत्पन्नाला “ब्रेक’

पिंपरी – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीसह लगतच्या ग्रामीण पट्ट्यात सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) व्यवस्थापनाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. 2014 पासून ते 2016 पर्यंत सातत्याने उत्पन्नात होत असलेल्या वाढीस 2016-17 या आर्थिक वर्षात मात्र ब्रेक लागला आहे. या आर्थिक वर्षात पीएमपीएमएलला मोठी घट सोसावी लागली आहे. 2015-16 साली पीएमपीला वेगवेगळ्या स्त्रोतांमार्फत 776.75 कोटी उत्पन्न मिळाले होते. 2016-17 या आर्थिक वर्षात मात्र त्यात 56 कोटी 18 लाखांची घसरण होऊन हे उत्पन्न 720.93 कोटींवर येऊन थांबले आहे.

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी; मोफत नोकरी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आमदार महेश लांडगेंचे आवाहन

पिंपरी (Pclive7.com):- बेरोजगार तरुणांसाठी एज्यू ब्रीज करिअर अॅकडमीने मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिली आहे. तरुणांना मोफत नोकरी विषयक संपूर्ण प्रशिक्षण प्रमाणपत्रासहित दिले जाणार आहे. मोफत नोकरी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन, आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

रेल्वे विसरली लोणावळा लोकलचा वाढदिवस

पुणे-लोणावळादरम्यान ईमू (इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट) लोकल सुरू होऊन रविवारी (दि. 11) बरोबर चाळीस वर्षे पूर्ण झाली; मात्र मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला याचा पुरता विसर पडल्याचे दिसून आले. रविवारी सकाळी 5.45 ते दुपारी 3.40 दरम्यान पुणे-लोणावळा लोकल ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या होत्या, हे जरी ग्राह्य धरले, तरीदेखील दुपारनंतर कार्यक्रमाचे आयोजन करत रेल्वेला वाढदिवस साजरा करता येऊ शकला असता; मात्र रेल्वेला लोणावळा लोकलच्या वाढदिवसाची कोणतीही कल्पना नसल्याचे दिसून आले. रेल्वे अधिकारी व प्रवासीदेखील याबाबत अनभिज्ञच असल्याचे दिसले. 

म्हणून ‘स्थायी’ अध्यक्षपद निवडणुकीत सेना तटस्थ

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी व शिवसेनेत रिंग झाली असल्याचा भाजपकडून होत असलेला आरोप अन् आपले समर्थक राहुल जाधव यांना डावलले जाऊनही आमदार महेश लांडगे यांनी घेतलेली शांत राहण्याची व संयमाची भूमिका यामुळेच शिवसेनेने स्थायी समिती अध्यक्षपद निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे .

पिंपरी चिंचवड शहरातील २ लाख बालकांना पोलिओ लसीकरण

पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील १ लाख ९५ हजार २९७ बालकांना पोलिओ लसीकरण देण्यात आले.

शहर भाजपच्या प्रवक्ते पदी अमोल थोरात यांची निवड

पिंपरी (Pclive7.com):- अमोल थोरात यांची भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी थोरात यांची नियुक्ती केली.

नागपूर मेट्रोलाच झुकते माप?

मागितले 850 कोटी, तरतूद 130 कोटींची
पिंपरी – नेहमी सरकारवर हा आरोप लावण्यात येतो की, पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत नागपूरला झुकते माप दिले जाते. शुक्रवारी राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थ संकल्पात मेट्रोसाठी प्रस्तावित करण्यात आलेले आकडे काही असेच सांगत आहेत.