MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 27 April 2018
4 locations on list for Pimpri Chinchwad commissionerate
PIMPRI CHINCHWAD: Deputy commissioner of police Ganesh Shinde on Tuesday wrote to civic chief Shravan Hardikar regarding sites that seem feasible for the Pimpri Chinchwad police commissionerate.
रुंदीकरणानंतर मेट्रो खांब उभारणी
पिंपरी - महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत बोपोडी येथील पुणे-मुंबई महामार्ग रुंदीकरणाच्या कामामध्ये रस्ता दुभाजक आणि मेट्रोच्या मार्गाची जागा पाहणी करून निश्चित केली. महापालिकेने येथील रस्ता रुंदीकरणाचे काम गतीने केल्यास, या भागातील मेट्रोचे खांब उभारणीचे काम महिन्यात हाती घेण्यात येईल, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
मेट्रोच्या ९० टक्के जागा ताब्यात
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी आवश्यक असलेले जागेचे ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांसाठी 'महामेट्रो'ला अंदाजे ४० हेक्टर जागेची गरज होती. त्यापैकी ३६ हेक्टर जागा ताब्यात आली आहे. ही जागा सरकारी मालकीची असून उर्वरित चार हेक्टर जागा खासगी मालकांची आहे. त्यातील काही जागांच्या मालकांनी जागा देण्याची तयारी दाखविली असल्याची माहिती 'महामेट्रो'चे अधिकारी प्रकाश कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. वनाज ते धान्यगोदाम (रिच २) या मार्गाचे प्रकल्प व्यस्थापक गौतम बिऱ्हाडे या वेळी उपस्थित होते.
With 17 cities, Maha tops states studied for pollution
The Central Pollution Control Board (CPCB) has sounded the death knell to 94 cities in the country where pollution levels are not meeting the set standards. Topping the chart are Maharashtra with 17 cities, including Pune, and Uttar Pradesh with 15 cities.
Dust prime cause for poor Pune air, vehicles next
PUNE: Windblown dust, vehicles and industrial units are the top three contributors to air pollution, specifically in terms of particulate pollutants PM10 and PM 2.5, in the city.
जागा मंजूर, पण निधीच नाही!
पिंपरी न्यायालयासाठी प्राधिकरणाने जागा मंजूर करुन चार वर्ष उलटल्यानंतरही न्यायालयाची इमारत होऊ शकलेली नाही.
शहर होण्यासाठीची उत्सुकता
पिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळील गहुंजे गावाचा प्रवास ‘गाव ते शहर’ असा सुरू झाला आहे. एकीकडे विस्तारलेले शेती क्षेत्र आणि गावाचा ग्रामीण चेहरा दिसतो, तर दुसरीकडे उंच इमारती गावाच्या शहरीकरणाकडे होत असलेल्या वाटचालीकडे लक्ष वेधतात. गहुंजे स्टेडियममुळे गावाची आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली ओळख, निर्मलग्राम आणि तंटामुक्त गाव पुरस्कार, आयएसओ मानांकन असलेली ग्रामपंचायत या ठळक बाबी गावाचे वेगळेपण नजरेस आणतात. आता ग्रामस्थांना विकासाचे वारे हवे आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट होण्यास ग्रामस्थ अनुकूल आहेत.
‘आयटी’साठी खासगी बससेवेत वाढ
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी खासगी बससेवेत वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंजवडी इंडस्ट्रीअल असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल यांनी दिली. येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये ती सुरू होईल.
आययूएमएस प्रणालीसाठी स्वतंत्र समिती
पुणे - महाविद्यालयातील प्रशासकीय कामाच्या व्यवस्थापनात, परीक्षांचे वेळापत्रक, परीक्षांचे निकाल यांच्यात सुसूत्रता आणण्यासाठी सरकारने ‘इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टिम’ (आययूएमएस) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सरकारने आता स्वतंत्र समिती स्थापन केली आहे.
इंटरनेटअभावी संगणक ‘लॉगऑफ’
पिंपरी - राज्य सरकारने प्राथमिक शाळांचे सर्वच कामकाज ऑनलाइन केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला संगणक दिले. मात्र, गतवर्षापासून शाळांमध्ये इंटरनेटअभावी संगणक वापराविना धूळखात पडून असल्याने ‘लॉगऑफ’ आहेत.
तक्रारींसाठी पोलिस प्राधिकरण
पुणे - तक्रारीची दखल घेतली नाही, गुन्हा दाखल केला नाही, आक्षेपार्ह वर्तन केले, चुकीच्या पद्धतीने तपास केला, गुन्ह्याचे स्वरूप सौम्य किंवा तीव्र केले आदी विविध प्रकारच्या तक्रारी ‘विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणा’त नागरिकांना करता येणार आहेत. तक्रार केल्यावर स्वतःची बाजू नागरिक स्वतः मांडू शकतात. त्यासाठी वकीलही नियुक्त करण्याची गरज नाही. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे.
वाहन प्रशिक्षणात वशिलेबाजी
पिंपरी - महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरू केले आहे. परंतु, लाभधारक ठरवताना पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डामध्येच झुकते माप दिले आहे, अशी तक्रार काही लोकप्रतिनिधींनी केली.
पिंपरी पालिकेत बुके,श्रीफळ,शाल खरेदी,डायरी छापणे बंद
पिंपरी-चिंचवड महापालिकेने दरवर्षी विविध कार्यक्रमामध्ये मान्यवरांना सत्कारा वेळी देण्यात येणार्या बुके, श्रीफळ व शाल यासारख्या खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यक्रमांमध्ये देण्यात येणार्या या वंस्तूवर होणार्या लाखोंच्या खर्चास स्थायी समितीने पायबंद घातला आहे. तसेच, दरवर्षी छापण्यात येणारी डायरी (दैनंदिनी) या पुढे न छापण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे पालिकेचे दरवर्षी लाखो रूपयांची बचत होणार असल्याचा दावा समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांनी केला आहे.
रहाटणी व पिंपरीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने गेल्या दोन दिवसात 31 अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. या कारवाईत रहाटणी कोकणे चौक येथील 30 पत्रा शेड व पिंपरीत रिव्हर रोड येथील 1 आर सी सी बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
मोहननगरचा तलाव 10 महिन्यांपासून बंद
तलावायन भाग – 8
पिंपरी – मोहननगर येथील राजर्षी शाहु महाराज जलतरण तलाव दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल 10 महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. हा तलाव ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळेच बंद असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. मात्र 10 महिन्यांपासून बंद ठेवूनही तलावाच्या दुरुस्तीची कामे ठेकेदाराच्या वेळकाढूपणामुळे आजही पुर्ण झालेली नाहीत. अर्धवट राहिलेली कामे पुर्ण करुन लवकरात लवकर तलाव सुरु करावा अशी मागणी जलतरणप्रेमींनी केली आहे.
कुदळवाडीत टायरच्या गोदामाला भीषण आग
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी येथे टायरच्या गोदामाला दुपारी भीषण आग लागली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन केंद्राच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
पिंपरी महापालिकेच्या प्रभाग स्वीकृत सदस्यपदी या २४ जणांची झाली निवड
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यांची आज (गुरुवारी) निवड झाली. अ, ब, क, ड, ई, फ प्रभागातील स्वीकृत सदस्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. सर्वच जागांवर भाजपाचे सदस्य निवडून आले.
पिंपरी-चिंचवडमध्ये १० कोटींचं रक्तचंदन पकडलं, वाकड पोलिसांची कारवाई
पुनावळे भागात ताज ढाब्याजवळ पोलिसांची कारवाई
आता कंपनीने पीएफ न भरल्यास मिळणार मेसेज आणि ई-मेलमार्फत माहिती
चौफेर न्यूज – तुमच्या पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर कंपनीने तुमच्या पीएफ खात्यात जमा केली नाही, तर आता एसएमएस व ईमेलद्वारे त्याची माहिती मिळणार आहे. आता एसएमएस आणि ई-मेलद्वारे कर्मचारी भविष्य निधी संघटना (इपीएफओ) अलर्ट देणार असल्यामुळे पीएफची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापूनही पीएफ जमा न करणाऱ्यांना चाप बसणार आहे.
“पीसीसीओईआर’ मध्ये “इस्रो’ चे अभ्यासक्रम
पिंपरी – अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना पदवीत प्रगत तंत्रज्ञानाधारीत संगणक प्रणालीचे शिक्षण दिल्यास रोजगार मिळवण्यास उपयोग होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरातील शंभर “स्मार्ट’ शहरे विकसीत करण्यात येणार आहेत. या प्रकल्पात इस्रोचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अनेक रोजगार संधी उपलब्ध आहेत, असे मत सुपर ब्रेन्स इंडियाचे संचालक युवराज लांबोळे यांनी व्यक्त केले.
Subscribe to:
Posts (Atom)