Tuesday, 23 May 2017

नाशिक महामार्गावर अनधिकृत ‘मंडई’

पिंपरी - भोसरीमध्ये पुणे- नाशिक मार्गावर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. त्यावर कारवाई न करता महापालिकेने त्यांच्यासाठी ‘लक्ष्मणरेषा’ आखली असून, त्याचे पालन करण्याचे फर्मानही सोडले आहे. यामुळे महामार्गाची मंडई झाली आहे.

रिंगरोडसाठी पिंपरीत आठशे इमारती पाडणार

पिंपरी - शहरातील नियोजित रिंगरोडच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या रहाटणी, थेरगाव आणि वाल्हेकरवाडी येथील सुमारे साडेआठशे इमारती भुईसपाट करणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांनी सोमवारी ‘सकाळ’ला दिली.

पवना धरणात ३० टक्के पाणी

पवनानगर - पवना धरणामध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक असून जुलैअखेर पाणी पुरेल एवढे पाणी शिल्लक असल्याची माहिती पवना धरण अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.

Quality control engineer of PMPML suspended for poor upkeep of buses

The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) has suspended its quality control engineer Anant Waghmare for dereliction of duty.

पीएमपीचे ई-नियोजन

पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील १३ आगारे ई-तिकिटिंगद्वारे जोडण्याचा पीएमपीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे सर्व आगारप्रमुख एका क्‍लिकवर मार्गावरील बसमधील प्रवासीसंख्येचा आढावा घेऊ शकतील. प्रवासीसंख्येनुसार वेळापत्रक ठरविण्याचे नियोजन करणेही शक्‍य होणार आहे. प्रवाशाला तिकीट दिल्यापासून ते वाहकाने रोकड जमा करेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करणारी पीएमपी ही देशातील पहिली सार्वजनिक परिवहन संस्था असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 

[Video] पिंपरी-चिंचवडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत 9,458 सदनिका; 885 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागातील 10 ठिकाणी 9 हजार 458 सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी 885 कोटी 12 लाख रुपये खर्च येणार आहे. गृहयोजनेच्या ठिकाणी विविध मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी 50 कोटी 15 लाख रुपये खर्च होणार आहे. या दोन्ही खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर आला आहे.

उत्तर प्रदेशमधील पेट्रोल घोटाळ्याचे सूत्रधार पिंपरी चिंचवडमध्ये

पिंपरी-चिंचवड, दि. 22 - उत्तर प्रदेशमधील विविध ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर मायक्रोचिप बसवुन रिमोट कंट्रोलद्वारे पेट्रोल भरण्याची यंत्रणा नियंत्रित करून ग्राहकांचे पाच ते दहा टक्के पेट्रोल हडप करीत त्यातून कोट्यवधी रूपयाची माया पंप ...

पिंपरीतील दारुण पराभवामुळे अजित पवारांची नाराजी कायम

प्रारंभी गावखाती असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा पूर्ण कायापालट केला तरीही मतदारांनी नाकारले म्हणून तीव्र नाराज असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खप्पा मर्जी अद्यापही कायम आहे. पिंपरीतील सत्तांतर होऊन तीन महिने ...