Pimpri-Chinchwad Mayor Nitin Kalje, who resigned on Tuesday, tells Indian Express about the ups and downs during his one-and-a-half-year-long tenure Why did you resign before completion of your tenure? I resigned on my own. It was a voluntary decision. Did your party direct you to quit, especially after CM’s visit to Chinchwad on Monday? No. […]
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 29 July 2018
झाडांवर फलक, खिळे ठोकल्यास गुन्हा दाखल होणार
पिंपरी-चिंचवड शहरात झाड्यांवर खिळे ठोकून फलक व पोस्टर लावले जातात. तसेच पोस्टर, भिंतीपत्रे व जाहिराती लावल्या जातात. त्यामुळे शहराच्या सौदर्यास बाधा पोहचत असून विद्रुपीकरण वाढत आहे. त्यामुळे पालिका अशा प्रकारे फलक व पोस्टर लावण्यावर गुन्हे दाखल करणार आहे. येत्या तीन दिवसांमध्ये हे फलक, पोस्टर व जाहिराती काढून घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
पिंपरीतील रस्त्यांवर एलईडींचा झगमगाट
पिंपरी - ऊर्जाबचतीसाठी शहरातील सर्व पथदिवे एलईडी प्रकारातील बसविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे सुमारे ४० टक्के वीजबचत होऊन वीजबिलाच्या रकमेतही ४० टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे.
‘रिक्षा अॅप’ला गती मिळणार
पुण्यातीलच कंपनीने घेतला पुढाकार; आरटीओचे सहकार्य मिळणार
'कॅब'च्या स्पर्धेत टिकण्यासाठी मदत म्हणून शहरातील रिक्षाचालकांना 'रिक्षा अॅप' देण्याच्या योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) हे अॅप तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुण्यातीलच कंपनीला त्यासाठी पाचारण केले आहे.
'कॅब'च्या स्पर्धेत टिकण्यासाठी मदत म्हणून शहरातील रिक्षाचालकांना 'रिक्षा अॅप' देण्याच्या योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) हे अॅप तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पुण्यातीलच कंपनीला त्यासाठी पाचारण केले आहे.
निगडी-दापोडी बीआरटी मार्गाची पुन्हा चाचणी
पिंपरी - निगडी-दापोडी रस्त्यावरील बीआरटी बसमार्ग सुरू करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर येत्या गुरुवारी (ता. २) अंतिम सुनावणी होणार आहे. बीआरटी बससेवा सुरू झाल्यास, सुमारे सव्वा लाख प्रवाशांना शहरातून या मार्गावरून वेगाने ये-जा करता येईल. सेवा रस्त्यावरील बसगाड्यांच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे तेथील वाहतूक कोंडीही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीसमित्र संघटनेची कार्यकारीणी जाहीर !
पुणे-महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारीणी प्रदेश अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी जाहीर केली आहे. पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी नगरसेवक संदीप नखाते यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी कमलेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. नखाते यांनी या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
बिलवाटपाचा खर्च चौपट
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पाणीपट्टी देयके (बिले) वाटप करण्याचा खर्च महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महावितरण कंपनीच्या तुलनेत चौपट असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपट्टीची देयके वाटप करणाऱ्या कंपनीचे काम बंद करून होणारे नुकसान पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून वसूल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पवनामाईचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते ‘जलपूजन’, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरणावर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभहस्ते पवनामाईचे जलपूजन करण्यात आले. तसेच पवना धरण ९७ टक्के भरले असून धरणातून पाणी सोडण्याचा शुभारंभ खासदार बारणे यांच्या हस्ते पाणी विसर्ग करण्यात आला.
पवनाचे पाणी झाले दूषित!
धरणातून 1200 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग
पिंपरी-चिंचवड : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पवना नदी पात्रातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे पवना धरणातून आज (शुक्रवारी)एक तासासाठी पवना धरणातून 1200 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदी पात्रातील दूषित पाणी वाहून जाऊन शहरवासियांना स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून दिवसाला नदीपात्रत 30 ते 35 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. नदीपात्रातील पाणी रावेत येथे उचलून शुद्ध करुन शहरविसांना सोडले जाते. आजमितिला पवना धरणात 95.80 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले असून शहरवासियांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.
पिंपरी-चिंचवड : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पवना नदी पात्रातील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे पवना धरणातून आज (शुक्रवारी)एक तासासाठी पवना धरणातून 1200 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदी पात्रातील दूषित पाणी वाहून जाऊन शहरवासियांना स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून दिवसाला नदीपात्रत 30 ते 35 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. नदीपात्रातील पाणी रावेत येथे उचलून शुद्ध करुन शहरविसांना सोडले जाते. आजमितिला पवना धरणात 95.80 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित झाले असून शहरवासियांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.
नाट्य परिषदेचा ‘आशा भोसले पुरस्कार’ ज्येष्ठ पार्श्वगायक पद्मभूषण उदित नारायण यांना जाहीर
पिंपरी (Pclive7.com):- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत भारतीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारा संगीतकार आणि गायकास प्रसिद्ध गायिक आशा भोसले यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मभूषण उदित नारायण यांना जाहिर झाला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली .
माळी समाजाचाच महापौर करा… अन्यथा परिणामास सामोरे जा; माळी समाजाचा भाजपाला इशारा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर पदावर माळी समाजाच्याच सदस्याची निवड करावी अशी एकमुखी मागणी शहरातील माळी समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांनी केली. यावेळी माळी समाजाला महापौर पदासाठी डावलले गेले तर आगामी निवडणूकांमध्ये भाजपला होणा-या परिणामास सामोरे जावे लागेल, असा इशारा माळी समाजाकडून देण्यात आला आहे
पिंपरी पालिकेत संरक्षक जाळी बसली, पण सर्वसामान्यांच्या व्यथा कायम…!
पिंपरी (Pclive7.com):- मुंबई मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे मंत्रालयात सुरक्षा जाळी बसविण्यात आली होती. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे. या जाळीची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत संरक्षक जाळी तर बसली, परंतू सर्वसामान्यांच्या व्यथा कायमच आहेत अशी टिका पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
अनधिकृत 18 शाळांवर फौजदारी करण्याच्या शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांच्या आयुक्तांना सूचना
पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 18 अनधिकृत खासगी शाळा आहेत. त्या शाळांना नोटीसा बजावूनही त्यास संस्थाचालक प्रतिसाद देत नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून त्या शाळांवर फौजदारी कारवाईचा सूचना शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
पालिकेच्या हॉलची मागणी
पिंपरी-चिंचवडची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना शहराची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी पालिकेच्या वतीने सद्यस्थितीत एकही हॉल अथवा नाट्यगृह उपलब्ध नाही. त्यामुळे पालिकेच्या वतीने हॉल उपलब्ध करून देण्याची मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील हॉल सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश आयुक्तांनी तातडीने द्यावेत, अशी मागणी मानव कांबळे, दिलीप काकडे, प्रदीप पवार, उमेश इनामदार, गिरिधारी लढ्ढा, प्रताप लोके, अशोक मोहिते आदींनी केली आहे.
धनादेशांच्या दाव्यात फिर्यादीला दिलासा
पुणे - धनादेश न वटल्याच्या दाव्यातील वादीला (फिर्यादी ) दिलासा देणारा बदल कायद्यात करण्यात आला आहे. या बदलानुसार धनादेशावरील रकमेच्या २० टक्के रक्कम ही प्रतिवादीने वादीला देण्याचे बंधन टाकण्यात आले आहे.
कचराकुंडीसाठी मारलेले शेड पडले की पाडले?
जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील मुळानदी किनारा रस्त्यावरील संतगोरोबा कुंभार उद्यानामागील बाजुस रस्त्यावर येणारा कचऱ्याला प्रतिबंध करण्यासाठी येथील दोन कचराकुंड्या रस्त्याकडेला मागे हटवुन कचराकुंड्या भोवती पत्राशेड मारण्यात येणार होते. या रस्त्यावर दोन कचराकुंड्या आहेत. नागरीक येता जाता दुचाकी, चारचाकी वहानातुन भिरकवलेला कचरा कुंडीत न टाकता कचराकुंडी भोवती भिरकवतात परिणामी कचरा रस्त्यावर येतो.
“जेट पॅचर’प्रकरणी आता चौकशी
ठेकेदार, अधिकारी रडारवर : सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची ग्वाही
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने खड्डे बुजविण्यासाठी “जेट पॅचर’ मशीनचे सुमारे साडेआठ कोटींचे काम काढले आहे. परंतु, त्याचा फायदा होत नसून या ठेकेदाराला एक खड्डा बुजवण्यासाठी महापालिका 18 हजार रुपये देत आहे. ही बाब समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली आहे.
PCMC starts repairing pockmarked stretches
PIMPRI CHINCHWAD: Much to the relief of Chikhali residents, ..
One-way demand to ease Hinjewadi IT park snarl
PIMPRI CHINCHWAD: Vande Mataram Shetakari Sanghatna (VMSVS) ..
नवनियुक्त अधिकार्यांसमोर ‘स्ट्रीट क्राईम’चे आव्हान
नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत डॅशिंग अधिकार्यांची एन्ट्री झाली आहे. तर, पुण्यातही अनेक ठिकाणी नव्या अधिकार्यांची वर्णी लागली आहे. पुण्यातील स्ट्रीट क्राईम आणि पिंपरी-चिंचवडमधील टोळी युद्ध, गोळीबार आणि तोडफोडीचे सत्र रोखण्याचे आव्हान या नव्या अधिकार्यांना असेल. वाढत्या गुन्हेगारीमुळे आधीच भयग्रस्त अवस्थेत असलेल्या नागरिकांना नवनियुक्त अधिकार्यांकडून शहर भयमुक्त होईल, अशी अपेक्षा आहे. धडाकेबाज अधिकार्यांना हे आव्हान पेलवणार का? हे येत्या काळात समोर येईल.
वहातूक पोलिसांवरील हल्ले निंदनीय – पोलिस निरिक्षक किशोर म्हसवडे
हिंजवडी वहातूक कर्मचार्यांना रेनकोट चे वाटप
निर्भीडसत्ता न्यूज –
हिंजवडी वहातूक विभागामधे नुकतेच रूजू झालेले पोलिस निरिक्षक किशोर म्हसवडे यांच्या पुढाकारातून सुमारे 50 कर्मचार्यांना पावसापासून संरक्षण होण्याकरिता एकाच प्रकारच्या रेनकोट चे वाटप करण्यात आले. दिवस भर अधूनमधून पावसाच्या मुसळधार सरी चालू असतात या पार्श्वभुमीवर वहातूक पोलिसांना मात्र आपले कर्तव्य बजावण्यासाठी प्रसंगी भर पावसात सुद्धा तासनतास उभे रहावे लागते, त्यातच प्रामुख्याने हिंजवडी वहातूक निवारण समस्या हा आता वरिष्ठ पातळीवर सुद्धा ज्वलंत विषय बनला आहे. कर्मचार्यांना आपले कर्तव्य बजावताना कसलीही अडचण होणार नाही याची काळजी घेत मागील आठवड्यात बदली होऊन आलेले पोलिस निरिक्षक किशोर म्हसवडे यांनी स्वत: पुढाकार घेत रेनकोट ची व्यवस्था केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी नम्रता पाटील आणि विनायक ढाकणे यांची पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती
पिंपरी (Pclive7.com):- नव्याने सुरू होत असलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी दोन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि.२७) काढलेल्या आदेशान्वये भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदावरील राज्यातील ९५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दोन तडफदार पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. नम्रता पाटील आणि विनायक ढाकणे यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शंकर आवताडे यांनी स्विकारला चिखली पोलिस स्टेशनचा पदभार
चौफेर न्यूज – चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी या परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे सुरु करण्यात येणार आहे. यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने गुरुवारी (दि. 26) दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यामध्ये चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून शंकर आवताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शंकर आवताडे चिखली पोलीस ठाण्याचे पहिले वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. चिखली पोलीस ठाण्यात निगडी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही भाग देण्यात येणार असून या दोन पोलीस ठाण्यांमधून आणि पोलीस मुख्यालयाकडून फौजफाट्याची गरज भागवली जाणार आहे. शासकीय पातळीवर पोलीस ठाण्यास मान्यता मिळाली असून चिखली येथील महापालिकेच्या शाळेच्या इमारतीत हे नवीन पोलीस ठाणे सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
चऱ्होली साई मंदिरात माध्यान्ह आरतीला भाविकांची गर्दी
चौफेर न्यूज – गुरूपौर्णिमेनिमित्त पुणे-आंळदी रस्त्यावरील च-होली येथील श्री साई मंदिरात श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे व विश्वस्त शिवकुमार नेलगे यांच्या हस्ते (शुक्रवारी दि. 27 जुलै) दुपारी 12 वाजता भक्तीपुर्ण वातावरणात श्रींची माध्यान्ह आरती करण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार दौंडकर आणि हजारो भक्त भाविक उपस्थित होते.
वाहतूककोंडी सोडवण्यासाठी नवीन दुचाकी!
वाहतूक पोलिसांकडे दाखल; महत्त्वाच्या व्यक्ती, मोर्चा बंदोबस्तासाठी उपयुक्त
पुणे : वाहतूककोंडी झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिसांची गाडी पोहोचू शकत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वाहतुकीतील बदलांची माहिती देण्यासाठी ध्वनिवर्धक, भोंगा, वाहतूक नियंत्रण करण्यासाठीचे एलईडी बॅटन अशा सुविधा असलेल्या पाच दुचाकी वाहतूक पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच राजकीय नेत्यांच्या बंदोबस्तासाठी लागणाऱ्या ताफ्यातदेखील या दुचाकींचा समावेश केला जाणार आहे.
पुणे : वाहतूककोंडी झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिसांची गाडी पोहोचू शकत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वाहतुकीतील बदलांची माहिती देण्यासाठी ध्वनिवर्धक, भोंगा, वाहतूक नियंत्रण करण्यासाठीचे एलईडी बॅटन अशा सुविधा असलेल्या पाच दुचाकी वाहतूक पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच राजकीय नेत्यांच्या बंदोबस्तासाठी लागणाऱ्या ताफ्यातदेखील या दुचाकींचा समावेश केला जाणार आहे.
धर्मादाय आयुक्तांचा संस्था, ट्रस्ट नोंदणी प्रस्ताव फक्त ऑनलाईन स्विकारणाचा आदेश रद्द
उच्च न्यायालयाचा निर्णय
पूर्वीप्रमाणेच प्रस्ताव फाईल स्वरूपात स्विकारावेत
वकिलांच्या लढ्याला यश
पूर्वीप्रमाणेच प्रस्ताव फाईल स्वरूपात स्विकारावेत
वकिलांच्या लढ्याला यश
आरटीईनुसार राखीव जागांची आता संकेतस्थळावर माहिती
पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव जागा असणाऱ्या सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांची जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय यादी आता शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षात आरटीईच्या पोर्टलवरदेखील या यादीची लिंक असेल. शैक्षणिक वर्ष 2019-20पासून ऑनलाइन प्रणालीत हे बदल करण्यात येणार आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)