Friday, 3 April 2020

Sangavi: औंध जिल्हा रुग्णालयाला कोरोनाच्या उपचारासाठी ‘विशेष रुग्णालया’चा दर्जा

एमपीसी न्यूज – कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून 2305 खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत. सांगवी येथील औंध ऊरो जिल्हा रुग्णालयाचा त्यामध्ये समावेश आहे. येथे 50 खाटांची सोय करण्यात आली आहे. […]

आनंदाची बातमी; बारावा रुग्णही ‘निगेटीव्ह’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेल्या 12 व्या रुग्णांचे 14 दिवसांचे पहिले रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. हा रुग्ण कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. दुस-या तपासणीचे रिपोर्ट उद्या निगेटीव्ह आल्यानंतर या रुग्णाला घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील संपुर्ण 12 ही रुग्ण कोरोनामुक्त होत ठणठणीत होतील. यामुळे शहरात आता केवळ दिल्लीतून आलेले दोन कोरोनाग्रस्त रुग्ण […]

पिंपरीत विनाकारण शहरात फिरणाऱ्या 117 जणांवर गुन्हे दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –  पिंपरी चिंचवड शहरात विनाकारण घराबाहेर चालत, वाहनातून फिरणा-या 117 जणांवर बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी सुरु असताना नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा नियमितपणे सुरु आहे. त्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडता येईल. घरातील केवळ एका व्यक्तीने घराबाहेर पडून जीवनावश्यक वस्तू खरेदी कराव्यात. हे करत असताना देखील नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे. प्रशासनाला एकाच ठिकाणी गर्दी आढळून आल्यास त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई केली जात आहे.

Coronavirus : पिंपरीत खोटी कारणे काढून फिरताहेत नागरिक

पिंपरी - देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कुणीही घराबाहेर पडू नका, असे सरकारकडून वारंवार सांगण्यात येत असले तरी खोटी कारणे देत फिरणाऱ्या महाभागांमुळे पोलिसांवरील ताण वाढतो आहे. परिस्थितीचे कसलेही गांभीर्य नसलेले नागरिक कधी आवश्‍यक काम आहे सांगून तर कधी जुनी औषधांची चिठी पोलिसांना दाखवून खुलेआम फिरताना दिसतात. अशी बनवेगिरी करणाऱ्या उडाणटप्पूंना आवरा रे म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं लाईट बंद करून दिवे लावा- पंतप्रधान

कोरोनाच्या आधारावर मात करायची आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या दारात, बाल्कनीत येत्या रविवारी 9 वाजता 9 मिनिटं लाईट बंद करून दिवे, मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं आहे.

Pimpri: महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांच्या घरी पोहचविणार अन्न, औषधे

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने घराबाहेर जावू न शकणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांच्या निवासस्थानी अन्न, औषधे,  इतर अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या महापालिकेच्या सारथी हेल्पनाईन 8888006666 नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे विविध पातळीवर प्रयत्न करण्यात […]

Chikhali : संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 27 वाहने चिखली पोलिसांकडून जप्त

एमपीसी न्यूज – संचारबंदीचे उल्लंघन करीत विनाकारण रस्त्यावर फिरणारी 27 वाहने चिखली पोलिसांनी जप्त केली. त्यामध्ये सहा कार, दोन रिक्षा आणि 19 दुचाकींचा समावेश आहे. संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर घुटमळणे, वाहने घेऊन फेरफटका मारणे गुन्हा आहे. संचारबंदीच्या काळात सर्वकाही बंद असते, अनेकांना बंद शहर बघण्याची मोठी हौस असते. तसेच काही जणांना विनाकारण घराबाहेर फिरण्याची सवय […]

भाजप नगरसेवकांचे एक महिन्याचे मानधन ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’ला

एमपीसी न्यूज – कोरोना विरोधातील लढाईसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप, संलग्न अशा 85 नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीला (पीएमएनआरएफ) दिले आहे. त्याची रक्कम एक कोटी 27 लाख 5  हजार रुपये होत आहे.  दरम्यान, राष्ट्रवादीच्या 38 नगरसेवकांनी यापूर्वीच मुख्यमंत्री सहायता निधीला मानधन दिले आहे. सभागृह नेते नामदेव ढाके यांनी याबाबतची माहिती दिली. सद्यस्थितीत […]

‘राष्ट्रवादी’चे नगरसेवक देणार मानधन

पिंपरी – मागील काही दिवसांपासून देशभरामध्ये “करोना’ विषाणू संसर्गामुळे हाहाकार उडाला आहे. या विषाणूचा प्रसार महाराष्ट्रसह पुणे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील झाला आहे. देशामध्ये सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रामध्ये सापडले आहेत. “करोना’ विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि अर्थिक बळ देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंगेसच्या सर्व नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री साहय्यता निधीला देण्यात येणार आहे.

‘करोना’वरील उपायांसाठी सी-डॅकतर्फे हॅकेथॉन


MahaRERA extends completion deadline for projects by three months


वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा 15 जूनपासून

पुणे - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 ते 22 जून या कालावधीत घेणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले आहे. 

करोनाचा धोका ओळखण्यासाठी केंद्र सरकारकडून “आरोग्यसेतू’ ऍप सुरू

नवी दिल्ली:  “कोविड-19’शी लढा देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज केंद्र सरकारने खासगी-सरकारी सहकार्यातून विकसित केलेले आरोग्यसेतू नावाचे नवे ऍप सुरू केले. हे ऍप प्रत्येक नागरिकाला करोना विषाणूचा संसर्ग होण्याचा कितपत धोका आहे याचे स्वतःलाच आकलन करून घ्यायला मदत करते. अत्याधुनिक “ब्लू टूथ’ तंत्रज्ञान आणि “आर्टिफिशियल इंटिलीजन्स’चा वापर करून हे ऍप प्रत्येक व्यक्तीच्या समाजातील इतर व्यक्तींशी होणारे व्यवहारांचा आधार घेऊन करोना संसर्गाच्या धोक्‍याची पातळी निश्‍चित करेल.

आता घरबसल्या ओळखाता येणार कोरोनाची लक्षणं

मुंबई : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होतो. हे टूल सर्वांसाठी https://covid-19.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून वैद्यकीय सल्ला हवा असेल तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर उपलब्ध आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले आहे.

पीएफ कार्यालय सोडवणार आर्थिक चणचण

जमा रकमेपैकी 75 टक्‍के किंवा 3 महिन्यांच्या पगाराएवढी रक्‍कम काढता येणार

पुणे – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर कंपनी कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीएफ कार्यालयार्ते नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेल्या पीएफच्या रकमेपैकी 75 टक्‍के रक्‍कम किंवा त्यांच्या मागील तीन महिन्यांच्या पगाराएवढी रक्‍कम (दोन्हीपैकी कमी असलेली रक्‍कम) नॉन-रिंडेबल ऍडव्हान्स म्हणून देण्यात येणार आहे. ही रक्‍कम थेट कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा होणार आहे.

डिजिटल वक्‍तृत्व स्पर्धेचे आयोजन

पिंपरी – डिजिटल माध्यमातून वक्‍तृत्व स्पर्धा घेण्याचे नियोजन पर्यावरण संवर्धन समिती (इसीए) व टाटा मोटर्सने केले आहे. “पाणी बचत आणि माझा सहभाग’ या विषयावर ही वक्‍तृत्व स्पर्धा होणार आहे, अशी माहिती पर्यावरण तज्ज्ञ विकास पाटील यांनी दिली.

‘मास्क’मुळे सफाई कामगारांना धोका

बेजबाबदारपणाचा कहर : नागरिकांकडून कचऱ्यात फेकले जात आहेत “मास्क’

पिंपरी – करोनापासून वाचण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी तोंडाला मास्क लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे मास्क कोणतीही खबरदारी न घेता कचऱ्यात फेकले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कचरा उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. जे सफाई कर्मचारी नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे म्हणून झटत आहेत, त्यांचेच आरोग्य धोक्‍यात आणण्याचे प्रकार शहरातील नागरिक करत असल्याचे दिसून येत आहे.

सावधान ! वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला कराल तर एनएसए अंतर्गत होणार कारवाई

नवी दिल्ली : करोनाशी लढा देण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत आहेत. दिवसरात्र एक करून करोनाबाधितांची  सेवा करत आहेत. मात्र  देशात विविध ठिकाणी यांच्यावर हल्ला होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.   दरम्यान, अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत.  मध्य प्रदेशात चार जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच एनएसए अंतर्गत कारवाई केली आहे, तर यूपीतही याच कायद्यांतर्गत कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

Coronavirus : शिव भोजन केंद्रांवरून फूड पॅकेट थाळी मिळणार

पिंपरी - शहरातील शिव भोजन थाळी केंद्रामधून आता फूड पॅकेट शाळेच्या विक्रीला देखील परवानगी देण्यात आली आहे. तसेच गरजू व गरीब व्यक्तींपर्यंत जाऊन त्यांना थाळी विक्री करण्याची मुभा केंद्र चालकांना मिळाली आहे. 

रेशन दुकानामध्ये ज्या त्या महिन्यात होणार धान्य वितरण

पिंपरी - अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे धान्य एकदम देण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे, त्यात बदल करून एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य ज्या त्या महिन्यात वितरीत करण्याचा निर्णय शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाने घेतला आहे. 

योगा, जिम्नॅस्टिक, अॅरेबिक्सच्या ऑनलाईन शिकवण्या चालू

परी - लॉकडाऊन ची परिस्थिती आणि बरीच मुले बाहेरगावी गेल्याने योगा, जिम्नॅस्टिक, अॅरेबिक्स प्रशिक्षकांनी त्यावर ऑनलाईनचा शिकवणीचा तोडगा काढला आहे. 

आता पाच मिनिटात कोरोनाचे रिपोर्ट, ‘रॅपीड टेस्ट’ला मान्यता-राजेश टोपे

मुंबई- राज्यात कोरोनाची लागण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात पाच हजार चाचणी होईल एवढी राज्यात क्षमता आहे. रॅपीड टेस्टला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाचे निदान आता पाच मिनिटात होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.