Saturday, 28 September 2013

Parliamentary committee to check civic body's red-zone areas

The petition committee of the Parliament will conduct an inspection of Bhosari and adjoining areas, which fall in the 'red zone' (no-development zone around ammunition depots) in Pimpri Chinchwad, on Saturday.

'Reject button on electronic voting machines will empower voters'

Citizens and activists from the city have welcomed the Supreme Court's decision giving voters the right-to-reject option on electronic voting machines (EVMs).

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने अभियंत्याच्या श्रीमुखात भडकाविली

कार्यालयाच्या बाहेर पथदिवे उभारणीस विलंब झाल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे दापोडी प्रभागाचे नगरसेवक रोहित काटे यांनी कनिष्ठ अभियंत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत त्याच्या श्रीमुखात भडकाविली. याविरोधात संबंधित अभियंत्याने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव लांबणीवर

महापालिकेतील स्थानिक अधिका-यांना संधी देण्याच्या नावाखाली विधी समितीने आज प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांना मुदतवाढ देण्याचे प्रस्ताव महिनाभर लांबणीवर टाकला. 'कायद्याचे बोला' म्हणणा-या आयुक्तांमुळे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी नियमबाह्य काम करण्यास धजावत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकांनी 'अडवा आणि जिरवा’चे धोरण स्वीकारल्याची चर्चा आहे.

महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारावा - सुलभा उबाळे

महापालिकेतील शिक्षण मंडळावर आयुक्तांची पकड नसल्यामुळे शालेय साहित्य खरेदीमध्ये होणारा भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे शालेय साहित्य खरेदी खरेदी यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका पूर्णपणे बदनाम झालेली आहे. 

महापालिकेच्या हंगामी कामगारांची माहिती होणार संकलित

महापालिकेत मानधनावर काम करीत असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांची आणि कंत्राटी कामगारांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. ही माहिती संकलित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत.

ब्रह्मदेवाचे छायाचित्र असलेले फ्लेक्स काढण्याची मागणी

सगळ्य़ांची काहीतरी इच्छा असते, माझी देखील इच्छा आहे, सगळ्यांना शांतता हवी असते, मला देखील शांतता हवी आहे. असे उदगार ब्रह्मदेव काढत असलेल्या जाहिरातींचे फ्लेक्स शहरभर लावण्यात आले आहेत. जाहिरातींसाठी देवदेवतांच्या छायाचित्रांचा वापर म्हणजे हिंदू देवदेवतांचा अपमान आहे.

पिंपरीत जलवाहिनी फुटली ; लाखो लिटर पाणी वाया

चिंचवडगाव ते पिंपरीगाव पर्यंत नव्याने जोडण्यात आलेली जलवाहिनी पिंपरी स्मशानभूमीजवळ काल रात्री आठच्या सुमारास फुटली. मात्र उशिरा जागे झालेल्या महापालिकेने आज (शुक्रवारी) सकाळी अकराच्या सुमारास जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. दरम्यान लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली.    

'दांडीबहाद्दर' सफाई कामगाराची 'उपस्थिती' समाधानकारक

महापालिकेत 'प्रोबेशन पिरेड'वर कामाला असताना 583 दिवस विनापरवानगी गैरहजर राहणा-या सफाई कामगाराला नियमित वेतनश्रेणीत नेमणूक देण्यासाठी चक्क त्याच्या कामकाज आणि वर्तणुकीसह उपस्थितीही समाधानकारक असल्याचा अजब अहवाल आरोग्य निरीक्षकांनी सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

अजितदादांची कृपादृष्टी, नेत्यांची कुरघोडी उपमहापौरांच्या पथ्यावर; बिनबोभाट मुदतवाढ

राष्ट्रवादीशी संलग्न आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांना िपपरीच्या महापौरपदी अघोषित मुदतवाढ मिळाली. बराच काथ्याकूट होऊनही महापौर बदल होणार नसल्याचे पुरते स्पष्ट झाले असल्याने आता उपमहापौर बदलण्याची शक्यताही मावळली आहे.

पालिकेला ‘मार्केनॉमी’ मराठी पुरस्कार

पिंपरी : उत्तम पायाभूत सुविधा व नियोजनबद्ध शहर आणि स्वच्छतेसाठी मुंबई येथील मार्केनॉमी संस्थेच्या वतीने ‘मार्केनॉमी मराठी पुरस्कार २0१३’ साठी महापालिकेची निवड झाली आहे. हा पुरस्कार उपमहापौर राजू मिसाळ व सहआयुक्त पांडुरंग झुरे यांनी गुरुवारी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात स्वीकारला.

ही कसली खर्चाला कात्री?


- अंदाधुंदी : शासकीय अधिकार्‍यांकडून वाहनांचा खासगी वापर

विश्‍वास मोरे - पिंपरी

वित्तीय आणि चालू खात्यातील तुटीला नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी केंद्र सरकारने भलेही खर्चात कपात करण्याचे निर्णय घेतले असले तरी त्याच्याशी आपले काहीही देणे-घेणे नसल्याचे या अविर्भावात पिंपरी-चिंचवड परिसरातील काही शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी असल्याचे दिसून येते. शासकीय कामांसाठी असलेल्या वाहनांचा वापर खासगी कामांसाठी होत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले.

शिक्षण मंडळात नाट्यमय घडामोडी

पिंपरी : हलक्या प्रतीचे बूट, मोजे पुरवणार्‍यांवर कारवाईची सदस्यांची मागणी, सभापतींची पुरवठादारास फूस असल्याचा संशय, सदस्यांच्या आग्रहास्तव शिक्षण मंडळ प्रशासन अधिकार्‍यांचे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे पत्र, लगेच दुसर्‍या दिवशी माघार, सभापतींवर संशय घेणार्‍या सदस्यांचे घूमजाव.. अशा एकापाठोपाठ एक नाट्यमय व गमतीशीर घडामोडी घडल्याने मंडळाच्या कारभाराबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे.

डरकाळीऐवजी केकावली


संदीप पवार - पिंपरी

तारा आणि जेरी या बिबट्यांच्या डरकाळ्यांनी दणाणून जाणार्‍या पिंजर्‍यात आता मोर आणि लांडोरीची केकावली ऐकू येत आहे. संभाजीनगर येथील महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण आणि विस्तारीकरण सुरूअसल्याने आबालवृद्धांची लाडकी तारा-जेरी ही बिबट्यांची जोडी आता कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात कायमची स्थलांतरित करण्यात आली आहे. त्यांच्यासह ९ माकडेही कात्रजला हलविण्यात आल्याने संग्रहालयात आता एकही सस्तन प्राणी नाही.

एलबीटी विभागापुढे उत्पन्नवाढीचे आव्हान

एलबीटीची शहरात प्रभावी अंमलबजावणीद्वारे महापालिकेचे उत्पन्न वाढीचे आव्हान आहे. आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या धोरणाला अनुसरून ज्या उपाययोजना आवश्यक वाटतात, त्या राबवून एलबीटी उत्पन्न वाढीचे प्रयत्न राहतील. हे सांगत होते महापालिकेचे एलबीटी विभागप्रमुख यशवंत माने.

सामान्य लोक घरांपासून दूर

- रावेत, किवळे : निवासी क्षेत्र, रेड झोन बांधकामांवर निर्बंध

देवराम भेगडे - किवळे

रावेत, विकासनगर , किवळे, मामुर्डी परिसरातील जागेची उपलब्धता झपाटयाने कमी होत असल्याने उर्वरित भागातील बांधण्यात येत असलेल्या सदनिकांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत . तर रेडझोनमुळे बाधित भागात नवीन बांधकामे करण्यास शासनाने निबर्ंध घातल्याने तेथील मिळकतीच्या किमती कवडीमोल झाल्या आहेत. 

राजकीय नेते सावध; सर्वसामान्यांकडून स्वागत

पिंपरी - सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना दिलेल्या नकाराधिकाराचे शहरातील राजकीय वर्तुळातून सावध स्वागत झाले.

सर्व आरक्षणांचा विकास केल्यास 200 कोटींचे उत्पन्न

पिंपरी - महापालिकेने केवळ वीस टक्‍के आरक्षणांचा विकास केला असून, त्यातून चांगले उत्पन्न मिळते.

Pune industrial belt to get 5 police stations

Five new police stations have been sanctioned for the industrial area comprising Ranjangaon, Chakan and Kurkumbh. District collector Vikas Deshmukh said that a meeting of Jilha Udyog Mitra Samiti (committee of well-wishers of industry) was held on Friday.

Malaria, dengue under control in PCMC limits

Though the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) area is known for having among the highest number of cases of dengue and malaria in the state, this year the civic authorities’ efforts have managed to reign in the cases.