Wednesday, 12 December 2012

रुग्णवाहिकेला ट्रेलरची धडक, रुग्णासह चालक जखमी

रुग्णवाहिकेला ट्रेलरची धडक, रुग्णासह चालक जखमी
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पतीकडून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात गॅसचा सिलिंडर घालून खून

पतीकडून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात गॅसचा सिलिंडर घालून खून
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

महापालिका करणार 'अभय योजने'चा प्रचार !

महापालिका करणार 'अभय योजने'चा प्रचार !

पिंपरी, 11 डिसेंबर
थकीत पाणीबिलांच्या वसुलीसाठी 50 टक्क्यांपर्यंतची सूट देणारी 'अभय योजना' जाहीर करुनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हतबल महापालिका प्रशासनाने ध्वनीक्षेपक, एसएमएस, पत्रकांव्दारे या योजनेचा प्रसार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये त्याला मंजुरी देण्यात आली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

'पाडापाडी' कारवाईचा पुन्हा दणका !

'पाडापाडी' कारवाईचा पुन्हा दणका !
mypimprichinchwad.com

Moneylender assaulted in shop at Kasarwadi

Moneylender assaulted in shop at Kasarwadi: Unidentified persons are suspected to have robbed gold ornaments, among other things, after severely assaulting a moneylender with sharp weapons in his shop at Pawar Chawl in Kasarwadi on Monday afternoon.

Chains worth Rs 1 lakh snatched in Bhosari, Pimple Saudagar

Chains worth Rs 1 lakh snatched in Bhosari, Pimple Saudagar: Gold chains worth Rs 1.07 lakh were snatched in separate incidents at Bhosari and Pimple Saudagar in the city on Sunday.

Corporator seeks extension of metro route

Corporator seeks extension of metro route: A local corporator from the Satara road area has demanded an extension to the proposed metro route from Pimpri to Swargate.

PMPMLचे लेखापरिक्षणच नाही

PMPMLचे लेखापरिक्षणच नाही: केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचे अनुदान तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असणा-या पीएमपीएमएलचे स्थापनेपासून आजपर्यंत लेखापरिक्षणच झालेले नाही, अशी बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. याबाबतची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विनातिकीट प्रवासी शोधण्यासाठी रेल्वेने सुरू केली झाडाझडती!

विनातिकीट प्रवासी शोधण्यासाठी रेल्वेने सुरू केली झाडाझडती!:
पुणे- लोणावळा लोकल व स्थानकांवर तिकीट तपासणीच होत नसल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेच्या वतीने तिकीट तपासणीची एक विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत केवळ चारच दिवसांत ४८१ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख १९ हजार ६१४ रुपयांचा दंडही वसूल केला आहे.
पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या गाडय़ांची संख्या मागील काही वर्षांच्या तुलनेत सध्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यानुसार प्रवाशांचीही संख्या मोठय़ा प्रमाणावर झाली आहे. अशा स्थितीत मनुष्यबळ मात्र पूर्वीप्रमाणेच आहे. त्यात तिकीट तपासनिसांची संख्याही कमी आहे. त्यामुळे पुणे स्थानकासह पुणे विभागातील सर्वच स्थानकांवर तिकीट तपासनीस अभावानेच दिसतात. लोणावळा लोकल त्याचप्रमाणे स्थानकावर तिकिटांची तपासणी होत नसल्याचा अनेक महिन्यांचा अनुभव आहे. तिकिटांची तपासणी होत नसल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही मागील काही दिवसांमध्ये वाढली आहे. विनातिकीट प्रवाशांना आळा घालण्याच्या दृष्टीने पुणे विभागामध्ये एक विशेष मोहीम राबविण्यात आली. तळेगाव, शिवाजीनगर, चिंचवड, उरुळी आदी स्थानकांवर या मोहिमेअंतर्गत विनातिकीट प्रवासी शोधण्यात आले. विनातिकीट प्रवास करताना ४२० लोकांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून एक लाख, आठ हजार १९४ रुपये दंडाची वसुली करण्यात आली. द्वितीय वर्गाच्या तिकिटावर प्रथम वर्गाच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २१ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सहा हजार ४३६ रुपये दंड वसुली करण्यात आली. विनानोंदणी मालाची वाहतूक करणाऱ्या ४० लोकांनाही या मोहिमेत पकडण्यात आले. त्यांच्याकडून चार हजार ९८४ रुपये दंडाची वसुली करण्यात आली. पुढील काळातही अशा प्रकारची मोहीम सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.   

शेतकर्‍यांनो, थेट ग्राहकांना विका माल!

शेतकर्‍यांनो, थेट ग्राहकांना विका माल!: पुणे। दि. १0 (प्रतिनिधी)

मुंबईसह राज्यातील महानगरांमध्ये आता शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्रे सुरू होणार आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरही शेतकरी शेतमाल विकताना दिसणार आहे. कृषी व पणन विभाग या योजनेचे नियंत्रण करणार असून, त्याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याची माहिती कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

शहरात विविध ठिकाणी विक्री केंद्र उभी उभारता येईल का, याबाबतही अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. यासाठी स्थानिक बाजार समितीने शेतकर्‍यांना संपूर्ण सहकार्य देण्याचे आदेश दिले आहेत. शेतकरी शहरात कोठेही माल विकू शकतील. प्रसंगी शेतकर्‍यांना पोलीस संरक्षणही पुरविण्यात येईल, असेही विखे-पाटील यांनी सांगितले. प्रादेशिक बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख म्हणाले, याबाबत बाजार समितीकडून सहकार्य मिळेल. आडत्यांच्या आंदोलनाचा शेतमालाला फटका बसल्यास, शहरात तातडीने विक्री केंद्र सुरू केली जातील.

शेतकर्‍याला जर स्वत:चा माल स्वत: विकायचा असेल, तर त्याला कोणत्याही बाजाराचे बंधन राहणार नाही. शहरातील रस्त्यांवरही तो थेट ग्राहकाला माल विकू शकेल.
- राधाकृष्ण विखे-पाटील, कृषी व पणन मंत्री

पवना नदीत जलपर्णीचे साम्राज्य !

पवना नदीत जलपर्णीचे साम्राज्य !
पिंपरी, 11 डिसेंबर

पिंपरी परिसरातून वाहणा-या पवना नदीत जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे. काळेवाडी पुलावरुन नदीकडे बघितले असता सर्वत्र जलपर्णीमुळे नदीचा पृष्ठभाग हिरवा दिसून येत आहे. या जलपर्णीमुळे नदीतील जैवविविधतेचा समतोल बिघडायला लागला असून ही जलपर्णी त्वरित काढुन टाकण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.
mypimprichinchwad.com

तयारी '12-12-12' च्या सेलिब्रेशनची !

तयारी '12-12-12' च्या सेलिब्रेशनची !
पिंपरी, 11 डिसेंबर
शतकातून केवळ एकदाच येणारा '12-12-12' अर्थात 12 डिसेंबर 2012 ही जादुई तारीख संस्मरणीय करण्यासाठी खरेदीपासून ते हॉटेलिंगपर्यंतचे 'प्लॅनिंग' अनेकांनी केले आहेत. याच दिवशी येत असलेल्या केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपिनाथ मुंडे यांच्या वाढदिवसाचे जोरदार 'सेलिब्रेशन' करण्याचा चंग बांधला आहे.
mypimprichinchwad.com

पिंपरीमध्ये मोबाईलच्या शोरुममधून 20 लाखांचे स्मार्ट फोन चोरीस

पिंपरीमध्ये मोबाईलच्या शोरुममधून 20 लाखांचे स्मार्ट फोन चोरीस
पिंपरी, 11 डिसेंबर
पिंपरी कँपातील राधिका कम्युनिकेशन्स या स्मार्ट फोन कॅफेमधून चोरट्यांनी ड्रिलरच्या सहाय्याने दुकानाची भिंत फोडून सुमारे 20 लाखांचे स्मार्ट फोन पळविल्याचे आज सकाळी उघडकीस आले.
mypimprichinchwad.com

माजी वनअधिका-याने जपले दुर्मिळ झालेले रुद्राक्षाचे झाड

माजी वनअधिका-याने जपले दुर्मिळ झालेले रुद्राक्षाचे झाड
पिंपरी, 11 डिसेंबर
शंकराचे प्रिय आणि हिंदूत्ववाद दर्शविणारे म्हणून रुद्राक्षाची जगभर ख्याती आहे. कधीकाळी भारताच्या काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळणारी रुद्राश्राची झाडे कालांतराने दुर्मिळ झाली. अशा रुद्राक्षाच्या झाडाची भोसरीतील एका माजी वनअधिका-याने दहा वर्षापूर्वी लागवड केली होती. या झा़डाला नुकतीच दुस-यांदा फुले आली आहेत. बहूपयोगी रुद्राक्षाचे झाड दिवसेंदिवस दुर्मिळ होत असल्याने या झाडाची परिसरात चर्चा सुरू आहे.
www.mypimprichinchwad.com

राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर विरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर विरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल
पिंपरी, 11 डिसेंबर
भंगार विक्रेत्याकडून एक लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक रोहित अप्पा काटे आणि अन्य दहा जणांवर भोसरी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
mypimprichinchwad.com

आता हरवलेली वाहने शोधणे झाले सोपे !

आता हरवलेली वाहने शोधणे झाले सोपे !
पुणे, 10 डिसेंबर
हरवलेल्या वाहनांचा शोध 'ऑनलाईन ' घेता येण्याची सुविधा पुणेकरांसाठी दाखल झाली असून www.findlostvehicle.com या संकेतस्थळाने ही नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते अजय अप्पासाहेब खेडेकर यांनी पुढाकार घेऊन हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आले .
www.mypimprichinchwad.com

माउलीच्या जयघोषात दुमदुमली 'अलंकापुरी' !

माउलीच्या जयघोषात दुमदुमली 'अलंकापुरी' !
पिंपरी, 10 डिसेंबर
ज्ञानोबा माऊली तुकाराम..., तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम..., निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई..., एकनाथ नामदेव तुकाराम..., आळंदीचा राजा गुरू माझा..., तोचि माझा सखा तोचि माझा सोबती... अशा माऊलीच्या जय घोषणात आज अवघी अलंकापुरी दुमदुमली. अलंकापुरीत लाखो वारकरी दाखल झाले असून जिकडे तिकडे फक्त भगव्या पताका, टाळ मुदृंगाचा गजर आणि माऊलीचा जयघोष कानावर पडत आहे.
www.mypimprichinchwad.com

सराफावर हल्ला करून सोन्याचे दागिने पळविले

सराफावर हल्ला करून सोन्याचे दागिने पळविले
पिंपरी, 10 डिसेंबर

कासारवाडी येथील एका सराफावर दोन अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने पळविल्याची घटना आज दुपारी तीनच्या सुमारास कासारवाडी येथील पवार चाळीत घडली.
mypimprichinchwad.com

स्थापनेपासून पीएमपीएमएलचे लेखापरीक्षणच नाही

स्थापनेपासून पीएमपीएमएलचे लेखापरीक्षणच नाही
पिंपरी, 10 डिसेंबर
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. चा (पीएमपीएमएल) आणखी एक तुघलकी कारभार उघडकीस आला आहे. स्थापनेपासून जेएनएनयुआरएम तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या अनुदानावर 'गाडा' ओढणा-या पीएमपीएमएलने लेखापरिक्षणच केले नाही. गेली पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे 460 कोटी रुपयांचा निधी मिळूनही त्याचे लेखापरिक्षण न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
mypimprichinchwad.com

मोशीत बुधवारपासून किसान कृषी प्रदर्शन

मोशीत बुधवारपासून किसान कृषी प्रदर्शन
पिंपरी, 10 डिसेंबर
मोशी येथे 12 ते 16 डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय किसान कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देशविदेशातील 300 कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती प्रदर्शनाचे मुख्य संयोजक निरंजन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
mypimprichinchwad.com