Monday, 30 April 2018

रेल्वे प्रवाशांसाठी सुखद गारवा

पिंपरी - तुम्ही जर लोकल किंवा रेल्वेने लोणावळ्याकडे जात असाल तर पिंपरी स्टेशनपासून पुढे तुम्हाला लोहमार्गाच्या दोन्ही बाजूला गर्द हिरवाईचा अनुभव घेता येईल.

PCMC to construct parallel road in Dapodi

Pimpri Chinchwad: Thousands of commuters from Pimpri Chinchwad using the Dapodi-Bopodi road can hope to get rid of the daily traffic congestion as the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be constructing a parallel road.

Uncovered, haphazardly-placed drains pose a threat to residents

EARLIER this month, a yoga teacher, who was cycling from Gurav Pimple to Durga Tekdi, fell unconscious after her cycle hit a drainage chamber at Morwadi Chowk. She was rushed to the hospital by two passersby, said a member of her family. Her treatment cost about Rs 23,000, the family member added. The drainage chamber was placed in such a way that it did not align with the surface of the road, making the stretch susceptible to accidents. The woman said she did not realise that a drainage chamber would suddenly pop up on a smooth road, a view seconded by many residents.


शासनाची मान्यता नसताना रस्ता रुंदीकरणाचा घाट?

पिंपरी – दापोडीतील महात्मा फुले नगरमधील प्रस्तावित रस्ता रुंदीकरणातील बाधितांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र, या विकास आराखड्याला राज्य सरकारची मान्यता नसल्याने या नोटीसा बेकायदेशीर असून, मुळ मालकांना या प्रक्रियेत सामावून न घेतल्याची तक्रार दापोडीकरांनी केली आहे.

यमुनानगर जलतरण तलावाची अवस्था बिकट

तलावायन भाग – 10
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण तलावांपैकी निगडीतील यमुनानगर येथील मिनाताई ठाकरे जलतरण तलावाची सर्वाधिक दूरवस्था झाली आहे. या तलावातील फरश्‍या फुटल्या असून बाजुचे कड्डपे तुटले आहेत. जलतरण तलावाची स्वच्छता न केल्याने तळात शेवाळ साचले आहे. तसेच तलाव परिसरात व कार्यालयातील विद्युत व्यवस्थेचीही बोंब झाली आहे. तलावातील स्टीलच्या शिड्या तुटल्या असून स्वच्छतागृहातील शॉवरचीही तोडफोड करण्यात आली आहे.

Maha govt decision to change land tenures: In Pimpri, over 1,000 properties to benefit

More than 1,000 properties in Pimpri Camp are likely to benefit by the state government’s decision to convert land tenures of all such properties from leasehold to freehold. The decision to convert land tenures from leasehold to freehand was taken by the state Cabinet last week, thereby clearing the decks for the redevelopment of such properties.

pimpri chindwad, maha govt, land tenure rules, freehold, lease, indian express

निवडणुकीतील चित्रीकरण; खर्च साडेसात लाख

महापालिकेची निवडणूक गेल्यावर्षी फेबु्रवारी महिन्यात झाली. त्यास सव्वा वर्षे होत आले आहेत. निवडणूक काळात निवडणूक कार्यालय व सर्वच प्रभागात करण्यात आलेले व्हिडिओ चित्रीकरणाचे बिल मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आले आहे. त्याचा एकूण खर्च 7 लाख 36 हजार 920 रूपये आहे. 

[Video] पिंपरी - चिंचवडच्या आजोबांचा सर्वांना थक्क करणारा सायकल प्रवास

पिंपरी - चिंचवडच्या आजोबांचा सर्वांना थक्क करणारा सायकल प्रवास, गेल्या 50 वर्षांपासून फक्त सायकलनेच करतात प्रवास

रोटरीच्या प्रयत्नामुळे पवनामाई जलपर्णीमुक्त होतेय – आमदार लक्ष्मण जगताप

स्वच्छ व सुंदर पवनामाई उपक्रमाचा 176 वा दिवस उत्साहात संपन्न
निर्भीडसत्ता- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या प्रयत्नामुळे पवना नदी जलपर्णीमुक्त होत आहे. यामुळे शहराचे आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यासाठी मोठी मोठी मदत होणार आहे. तसेच नदी स्वच्छतेमुळे शहराच्या सौंदर्यात देखील दिवसेंदिवस भर पडत आहे, असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

घरात कचरा जिरविणा-यांना करात ५ टक्के सवलत द्या: इसिएची पालिकेला सूचना

निर्भीडसत्ता – पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे सुरु असलेली शून्य कचरा व्यवस्थापन प्रोत्साहन बाबतची मोहीम यशस्वी होणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेने घरातला कचरा घरात जिरविणा-या नागरिकांना व सोसायट्यांना मिळकत करात सरसकट ५ टक्के सूट द्यावी, अशी सूचना पर्यावरण संवर्धन समिती (इसिए ) ने केली आहे.

शहरात छत्तीस ‘ब्लॅक स्पॉट’

पुणे  - वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्याच्या घटनांमुळे झालेल्या अपघातांमध्ये शहरात तीन वर्षांत तब्बल १३३१ जणांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्ती अपंगत्वाचे आयुष्य जगत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विशेषतः दर एक किलोमीरटच्या परिसरात अपघात घडत असून, दररोज किमान एकाचा जीव जात असल्याची सद्यःस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी वाहतूक शाखेने ३६ अपघातप्रवण क्षेत्राची (ब्लॅक स्पॉट) निवड करून उपाययोजना सुरू केल्या आहेत. 

हिंजवडीत जाळला जातोय कचरा

पुणे - राजीव गांधी आयटी पार्क म्हणून देशात ख्याती मिळविलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधील नामांकित कंपन्या आणि लगतचे रहिवासी उघड्यावरच कचरा जाळतात. त्यामुळे प्रदूषण होत असून, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरीकरण व औद्योगिकीकरणामुळे वाढलेल्या घनकचऱ्याचे संकलन व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे अज्ञातांकडूनच कचरा जाळला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधनाची निर्मिती

पुणे - प्लॅस्टिक कचऱ्याचा पुन्हा वापर आणि त्याचे होणारे प्रदूषण टाळता येईल का, या विचारातून पुण्यात टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीच्या कामास सुरवात झाली. त्यातून स्वस्तात आणि कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनाची निर्मिती करणारे ‘पायरॉलिसिस युनिट’ तयार झाले. हे साकार झालंय पुण्यातील ‘सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क’च्या जीडी एन्व्हॉयर्न्मेंटल प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपमुळे.

भाजपचे धोरण म्हणजे ‘मोरीला बोळा अन्‌ दरवाजा उघडा’

भंकस कारभारावर मराठीत फार जुनी एक म्हण आहे. ‘मोरीला बोळा अन्‌ दरवाजा सताड उघडा’. आजवरचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे धोरण त्यातलेच आहे. यावर्षापासून सत्ताधारी भाजपने काही अंशी त्याला मुरड घातली, हे बरे केले. पूर्वी काय चालत होते त्याचे थोडे विस्ताराने दर्शन घडविले म्हणजे इथे किती लूट चालत होती ते करदात्यांना समजेल. दरवर्षी शहरात होणाऱ्या महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी सोहळे, विविध महोत्सव, क्रीडा स्पर्धा, येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत म्हणजे जनसंपर्क विभागासाठी एक पर्वणी असे. निव्वळ पुष्पगुच्छ आणि शाल, श्रीफळ यावर ही मंडळी २५ चे ३० लाख रुपये खर्च करत. त्यातले खरे किती खोटे किती ते अधिकारीच जाणो. त्याहीपुढे आणखी कहर म्हणजे भूमिपूजन, उद्‌घाटन कार्यक्रमांसाठीचे जे छोटे मंडप उभारतात त्या सर्व मांडवांचा वर्षाचा खर्च साडेचार ते पाच कोटींच्या घरात आहे. गेले पंचवीस-तीस वर्षे एक-दोन ठेकेदार आलटून पालटून हे काम करतात. पुढाऱ्यांचे खासगी कार्यक्रम, वाढदिवस, गणेशोत्सव, अगदी लग्नसुद्धा त्यातच उरकतात. तिसरा मुद्दा म्हणजे कार्यकर्त्यांसाठी दरवर्षी छापण्यात येणाऱ्या डायऱ्या. ८-१० हजार डायऱ्या (दैनंदिनी) छापून घेण्यासाठी १० लाख रुपये खर्च होतात. दामदुप्पट दराने हे काम ठराविक ठेकेदार करत. ही उधळपट्टी आहे, करदात्यांच्या पैशावर दरोडा आहे असे म्हणत भाजपने हे सर्व खर्च बंद करायचा निर्णय घेतला. म्हणून त्यांना धन्यवाद. काटकसरीचे हे धोरण चांगले आहे, पण खर्चच वाचवायचे तर त्याहीपेक्षा मोठी मोठी कामे आहेत. जिथे आजवर शेकडो कोटींना महापालिका झोपली, ते थांबवा. मोरीला बोळा लावण्यापेक्षा दोन्ही दरवाज्यांवाटे जो पैसा वाहून चालला आहे त्याचा बंदोबस्त करा.

भाजपमुळे ‘वेस्ट ऑफ वोट’ अशी मतदारांची भावना – सचिन साठे

निर्भीडसत्ता – केंद्रात व राज्यात भाजपा सेनेचे सरकार येऊन चार वर्षे झाली. तर पिंपरी चिंचवड मनपात भाजपाला एक वर्ष झाले. एक वर्षापुर्वी भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर आरोप करणारे भाजपा सेनेच्या पदाधिका-यांनी नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करीत बहुमताच्या जोरावर ‘वेस्ट टू एनर्जी’ सारखी कोट्यावधी रुपयांची भ्रष्टाचाराची कामे मंजूर करुन घेतली. त्यामुळे मतदारांमध्ये ‘वेस्ट ऑफ वोट’ची भावना निर्माण झाली आहे, अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

संगणक साक्षरतेत महिलांची आघाडी

पिंपरी - महिला व मुलींना संगणक साक्षर करण्यासाठी, महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाने महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान प्रमाणपत्र (एमएससीआयटी) हा संगणक साक्षर अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत गेल्या पाच वर्षांत ७ हजार ८९७ महिला प्रशिक्षणार्थी संगणक साक्षर झाल्या आहेत. 

घरफोडी उघडकीचे प्रमाण केवळ 30 टक्के?

पिंपरी - उन्हाळा आणि दिवाळीच्या सुटीत अनेकजण गावी जातात. याचा फायदा घेत बंद सदनिका हेरून चोरटे डल्ला मारतात. दरवर्षी या कालावधीत घरफोड्यांचे प्रमाण वाढते. घरफोड्या होऊ नये किंवा झाल्यास त्यामध्ये किमती ऐवज चोरीस जाऊ नये म्हणून पोलिस सोसायट्यांमध्ये जाऊन जनजागृती करीत आहेत. मात्र, मार्चअखेर शहरात 43 घरफोडी झाल्याचे आकडेवारी सांगते. घरफोडीचे 60 टक्‍के गुन्हे उघडकीस आणल्याचा दावा पोलिस करीत असले, तरी हे प्रमाण 25 ते 30 टक्‍के इतकेच असल्याचे समजते. 

डिजिटल व्यवहारांवर मिळणार “सूट’

केंद्र सरकारचा प्रस्ताव : उद्योजकांनाही मिळणार कॅशबॅक 
नवी दिल्ली – नोटाबंदीच्या काळात वाढलेल्या डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. या योजनेत ग्राहकांना वस्तूच्या निर्धारीत किमतीवर सूट आणि कॅशबॅक देण्यात येणार आहे. ही सूट 100 रूपयांपर्यंत असून उद्योजकांनाही कॅशबॅक मिळणार आहे.

महाराष्ट्र दिनी मराठी भाषेचा सन्मान; यापुढे स्थानकांची नावे मराठीत

नवी दिल्ली : रेल्वेच्या तिकीटांवरील भाषेबद्दल रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या महाराष्ट्र दिनापासून रेल्वे तिकिटांवर स्थानकांची नावे मराठी भाषेत छापली जाणार आहेत.

‘पीएमपी’च्या 178 कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत घेणार

पिंपरी – पीएमपीएमएलच्या 178 कर्मचाऱ्यांना पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत सामावून घेतले जाणार आहे. तसा प्रस्ताव तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. महिनाभराच्या कालावधीत ते कर्मचारी पुन्हा महापालिका सेवेत रुजू होतील, अशी माहिती महापालिका आयुक्त व पीएमपीएमएलचे प्रभारी अध्यक्ष श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टोमॅटो झाला स्वस्त!

पिंपरी – यंदा बाजारात टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारात टोमॅटो 8 ते 10 रूपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे एकीकडे ग्राहकाला दिलासा मिळाला असला तरी शेतकरी आणि व्यापाऱ्याला त्याचा फटका बसला असल्याचे चित्र बाजारात बघायला मिळत आहे.