Tuesday, 26 June 2018

विनापरवाना रस्ते खोदल्यास दंड

पिंपरी - विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी केलेले खोदकाम त्वरित बुजवावेत, नागरिकांची गैरसोय टाळावी, यासाठी महापालिकेने धोरण आखले आहे. त्यामुळे रस्त्याची विनापरवाना खोदकाम केल्यास खोदाई शुल्काच्या दुप्पट दंड आकारणी केली जाणार आहे. शिवाय सकाळी १० ते सायंकाळी पावणेसहा या वेळेतच खोदकाम करता येणार असून त्यानंतर ते त्वरित बुजवावे लागणार आहे. 

वृक्ष लागवडीसाठी ‘जीपीएस’द्वारे पाहणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पावसाळ्यात 60 हजार झाडांचे रोपण केले जाणार आहे. त्यासाठी ठिकाणे निश्‍चित करण्यासाठी जीपीएस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. वृक्ष लागवडीसाठी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक महासंघ, हाउसिंग सोसायट्या, सार्वजनिक मंडळांचा सहभाग घेण्यात येणार आहे, असा निर्णय वृक्ष प्राधिकरण समितीच्या सोमवारी (दि.25) झालेल्या सभेत घेण्यात आला.

वनौषधींच्या रोपांना मागणी

पिंपरी - महापालिकेच्या भोसरी आणि चिंचवड एमआयडीसीमधील आयुर्वेदिक वनौषधी उद्यानांमध्ये वनौषधींच्या रोपांना नागरिकांकडून चांगली मागणी आहे. महापालिकेच्या अन्य उद्यानांमध्येही याचा वापर होत आहे. 

FSSAI Gets Serious Against Food Adulteration, Proposes Life Term, Rs 10 Lakh Fine For Culprits

The Food Safety and Standards Authority of India (FSSAI) has proposed stringent punishment of fine of Rs 10 lakh and imprisonment up to life term for those adulterating foodstuff. Besides, the regulator has also suggested creating a 'Food Safety and Nutrition Fund' to support promotional and outreach activities among food businesses and consumers.

food adulteration

पालिकेची स्वच्छतेत पिछाडी नेमकी कशामुळे?

स्वच्छतेत २०१६ मध्ये देशात नवव्या आणि राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेले पिंपरी-चिंचवड शहर एकदम पिछाडीवर गेले. याचा सरळ अर्थ असाही होतो, की दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता असताना प्रगती होती आणि भाजपकडे सत्ता येताच अधोगती झाली. केंद्रात आणि राज्यातही भाजप सत्तेत असताना शहराची घसरगुंडी झाली. पैशाची बिलकूल कमी नाही. सर्वांची इच्छाशक्तीही दांडगी आहे. भरभक्कम राजकीय पाठबळसुद्धा आहे. अशाही परिस्थितीत शहराची अवनती कशी झाली, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांना द्यावे लागणार. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्वच्छ भारत’चा नारा इथे त्यांच्याच शागिर्दांनी धुळीस मिळविला. कारण यांना स्वच्छतेपेक्षा टक्केवारीतच अधिक रस आहे. तमाम जनतासुद्धा त्यामुळे नाराज आहे. कचऱ्याच्या निविदांमध्ये प्रतिटन २०० रुपये भागीदारी मागणारे भाजपचेच नगरसेवक आहेत. महापालिका आयुक्तांनी सर्व बाजू तपासून ८०० कोटींच्या निविदा काढल्या; पण कायमस्वरूपी भागीदारी मिळाली नाही म्हणून खुसपट काढून निविदाच रद्द करणारा भाजप आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्पसुद्धा टक्केवारीत गुंफलेला आहे. भाजपचा पालिका तिजोरीच्या स्वच्छतेवर डोळा असल्याने शहराची स्वच्छता वाऱ्यावर उडत गेली. किमान आतातरी उपरती होऊ द्या. मरगळ झटकून कामाला लागा. यापुढे माझ्या वॉर्डमध्ये कचऱ्याचा ढीग काय कागदसुद्धा रस्त्यावर दिसणार नाही, असा निश्‍चय करा. लोकांना बातम्या आणि फोटोपुरती स्वच्छता मोहीम नको आहे. प्रशासन मनापासून प्रयत्न करते, असे दिसले तर लोक स्वतःहून सहभागी होतील. पूर्वीचे स्वच्छ शहर परत दिसू द्या. ते सहज शक्‍य आहे.

राज्यातील प्राध्यापकांसाठी ‘टॅफनॅप’ सरसावली

शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेबाबत संताप; अन्यायाविरोधात न्यायालयीन लढाईच्या तयारीत

महाविद्यालय बंद करणे, एकाचवेळी अनेक प्राध्यापकांना काढून टाकणे, वेतन थकवणे अशा प्रकारांमुळे राज्यभरातील प्राध्यापक मेटाकुटीला आले आहेत. सातत्याने आवाज उठवूनही शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभाग काहीही कारवाई करत नसल्याने प्राध्यापकांवरील अन्यायाविरोधात टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्स (टॅफनॅप) ही संघटना न्यायालयीन लढाईच्या तयारीत आहे. राज्यभरातील विनाअनुदानित संस्थांतील गैरकारभारामुळे प्राध्यापकांमध्ये सरकारबाबत संतापाचे वातावरण आहे.

पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची राष्ट्रीय स्तरावरील फॉर्म्युला रेसिंग सुप्रा स्पर्धेत ‘हॅट्रिक’

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग च्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी दिल्ली, ग्रेटर नोएडा येथे झालेल्या ‘मारुती सुझुकी एसएइ सुप्रा इंडिया २०१८’ या राष्ट्रीय फॉर्म्युला रेसींग स्पर्धेमध्ये  सलग तिस-या वर्षी प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केली.

पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची राष्ट्रीय स्तरावरील फॉर्म्युला रेसिंग सुप्रा स्पर्धेत 'हॅट्रिक'

पिंपरी चिंचवडमधील कचराकुंड्या ‘ओव्हरफ्लो’, स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा

पिंपरी (Pclive7.com):- एकेकाळी क्लीन सिटी म्हणून बहुमान मिळविलेल्या पिंपरी चिंचवड शहरात आता स्वच्छ भारत अभियानाचा बोजबारा उडाला आहे. केवळ सर्वेक्षणात गुण प्राप्त व्हावेत, याकरिता कागदोपत्री स्वच्छ भारत अभियान राबविणारे अधिका-यांच्या उदासीन धोरणाने स्वच्छ शहरात अस्वच्छता दिसू लागली आहे. यामूळेच महापालिका हद्दीतील नवी सांगवी परिसरात कचराकुंडी ओसडूंन वाहू लागल्या आहेत. याबाबत स्थानिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रारीकडे दुर्लक्ष करुन कचरा उचलला जात नसल्याचे नागरिकांने आरोग्य धोक्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडमधील कचराकुंड्या 'ओव्हरफ्लो', स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा

पिंपरी महापालिकेचे दोन अभियंते निलंबित

पिंपरीः कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पिंपरी महापालिकेच्या दोन अभियंत्यांना आयुक्तांनी आज निलंबित केले. रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या गैरहजेरी व परिणामी दुर्लक्षामुळे चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे गटाराचे पाणी रहिवाशांच्या घरात घुसले होते. तसेच त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा आला होता.

नाना काटे सोशल फाऊंडेशनच्यावतीने पिंपळे सौदागरमध्ये २० हजार कापडी पिशव्यांचे वाटप

पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी-पिंपळे सौदागर हा परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी गेल्या ८ महिन्यांपासून राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे व  शितल काटे यांचे विविध माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. या प्लास्टिक बंदी अभियाना अंतर्गत आज या परिसरातील नागरिकांना नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने २० हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे.

नाना काटे सोशल फाऊंडेशनच्यावतीने पिंपळे सौदागरमध्ये २० हजार कापडी पिशव्यांचे वाटप

कॅरीबॅगचे कारखाने बंद

चिखली - प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयानंतर शहरातील बहुतांशी कॅरिबॅग बनविणारे कारखाने बंद झाले आहेत. त्याचा परिणाम रोजगारावर झाला आहे. अनेक उद्योजकांनी दुसरा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे उद्योगांना लागणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या आणि पुनर्वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी नसल्याने उद्योजकांचा जीव भांड्यात पडला आहे. 

आता प्लॅस्टिकशिवाय बुके

पिंपरी - प्लॅस्टिकबंदीचा फुलांचे उत्पादक, किरकोळ विक्रेत्यांना फटका बसत आहे. बुके करण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर बंद झाल्याने नागरिक भेटवस्तू देण्यास प्राधान्य देत आहेत. 

प्लॅस्टिकबंदीचा वारकऱ्यांमध्ये संभ्रम

आळंदी - आषाढी पालखी सोहळा दहा-बारा दिवसांवर आलेला आहे. सरकारच्या प्लॅस्टिकबंदी धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे वारकरी व दुकानदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

नॉन ओव्हेन पिशवीविषयी व्यापाऱ्यांत संभ्रम

  • तीन महिन्यांपासून व्यापार ठप्प ः ठोस माहिती देण्याची मागणी
पिंपरी – राज्य सरकारने प्लॅस्टिक बंद करून चांगला निर्णय घेतला असल्याची चर्चा शहरात होत आहे; परंतु नॉन ओव्हेन पिशव्या विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मनात संभ्रम असल्याने त्यांचे व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे सरकारने नॉन ओव्हेन पिशवीविषयी नियमावली जाहीर करून ठोस माहिती देण्याची मागणी शहरातील नॉन ओव्हेन पिशवी विक्रेते करीत आहेत.

[Video] प्लॅस्टिकबंदीचा फूल व्यावसायिकांवर परिणाम

पिंपरी: प्लॅस्टिकबंदीचा फुलांचे उत्पादक, किरकोळ विक्रेते यांना फटका बसू लागला आहे. फुलांचा बुके करण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर बंद झाल्याने नागरिक एखादी भेटवस्तू देण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत.

'ओपनबार' म्हणजे दिव्याखाली अंधार

पिंपरी (पुणे) : बेकायदा धंद्यांना पायबंद घालून संबंधितांवर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य. मात्र, पोलिसांसमोरच असे अवैध धंदे चालत असतील, तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा तरी कोठे? याचा प्रत्यय पिंपरी चौकात रविवारी सायंकाळी गस्तीवर आलेल्या पोलिसांमुळे आला. चौकात मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर हातगाड्या, टपऱ्या व पदपथावर तळीराम मद्य पीत असतात. मात्र, पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप असतो. त्यामुळे गस्तीवरील दोन पोलिस गाडीतून उतरले. मद्याच्या दुकानात जात काही तरी चौकशी करू लागते. मात्र, बाहेर हातगाड्यांवर मद्य पीत असलेले तळीराम व हातगाडी, टपरी चालकांमध्ये कोणतेच भीतीचे वातावरण नव्हते. 

व्यसन करणाऱ्यांची संख्या चिंताग्रस्त

पिंपरी - मानसिक ताण हलका करण्यासाठी अनेकजण व्यसनाचा आसरा घेतात. कालांतराने ही नित्याची सवय बनते. गेल्या काही वर्षांपासून व्यसन करणाऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी ३० टक्‍क्‍यांनी वाढत आहे. यामध्ये किशोरवयीन मुलांबरोबरच आयटीमध्ये काम करणाऱ्यांचा समावेश असल्याचे विमल फाउंडेशनतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पुढे आले आहे. 

महासभेतील भाजप नगरसेवकांचे भांडण म्हणजे ‘बोका-मांजरीचा’ वाद – मारूती भापकर

पिंपरी (Pclive7.com):- इंद्रायणीनगरमधील शंभर कोटींच्या रस्त्यावरून महापालिका सभेत सत्ताधारी भाजपच्या दोन गटांतील ऐकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप टोकाला गेल्याने भाजपच्या नगरसेवकांचे भांडण म्हणजे ‘बोका-मांजरीचा’ वाद असल्याची उपरोधित टिका माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते दत्ताकाका सानेंच्या लेटरपॅड मध्येही महापालिकेचा भ्रष्टाचार

भांडार विभागाचा कारभार, तातडी साहित्य रजिस्टर (लोन रजिस्टर) मध्येही फेरफार 
 चौफेर न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाने भ्रष्ट्राचाराचा कळस गाठल्याची प्रचिती सोमवारी विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात आली. महापालिकेच्या भांडार विभागाने थेट विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांच्या नावाने असलेल्या लेटरपॅड खरेदीतही भ्रष्ट्राचार केल्याचे साने यांनी उघडकीस आणले. यातून पुन्हा एकदा महापालिकेचा “खाओ और खाने दो” असा अनागोंदी कारभार असल्यास आरोप विरोधी पक्षनेते साने यांनी केला आहे.