पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता अंदाजपत्रकात एकूण 407 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी पीएमपीएमएल प्रशासनाने केली आहे. महापालिका आयुक्त तथा पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना या मागणीचे लेखी पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांना मोफत बसपास, विविध घटकांना दिले जाणारे सवलतीचे बसपास, बस खरेदी आणि संचलन तुटीचा खर्च या पत्रात नमूद केला आहे. संचलन सुरळीत सुरू राहण्यासाठी दरमहा 4 कोटी 18 लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी या पत्रात केली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 28 December 2018
“थर्टी फर्स्ट’ला पहाटेपर्यंत “झिंग झिंग झिंगाट’
पिंपरी – नववर्षाच्या स्वागतासाठी केवळ तरुणाईच नाही तर या काळात कोणतीही अनुचित कारवाई होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा व राज्य उत्पादन शुल्क कर्मचारीही तयारी लागले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार शहरातील मद्य विक्रीची दुकाने पहाटे दीड वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. तर हॉटेल्स हे पार्टीसाठी पहाटे पाच वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.
“रॉंग साईड ड्रायव्हींग’ करणारे चालक पकडा बक्षीस मिळवा!
पिंपरी – “रॉंग साईड’ने वाहन चालवणाऱ्या चालकाला पकडा व बक्षीस व पुरस्कार मिळवा अशी भन्नाट “ऑफर’ पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काढली आहे.
मालासोबत शुद्धता प्रमाणपत्राचे बंधन
पुणे – पुणे शहरासह राज्यात सर्वत्र रिटेल वस्तूचे आऊटलेट असणाऱ्या डि-मार्ट कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या आऊटलेटमधून विकण्यात येणारा प्रत्येक माल हा शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय विकू नये, अशी ताकीद या कंपनीला देण्यात आली आहे.
देशभरातील कुष्ठ रोगींना सरकारी योजनेचा लाभ मिळत नसल्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सरकारचे वेधले लक्ष
चौफेर न्यूज : संपुर्ण भारतात १० लाखाच्या जवळपास कुष्ठ रोगी आहेत केंद्र सरकारच्या माध्यमातुन २००५ पर्यंत संपुर्ण देश कुष्ठ रोगी मुक्त होईल, अशी घोषणा केली होती. संपुर्ण जगाच्या तुलनेत साठ टक्के कुष्ठ रोगी एकट्या भारतात आहेत ही देशाच्या दृष्टीने अत्यंत चितेची बाब आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनेचा लाभ कुष्ठ रोगींना मिळत नाही. खासदार श्रीरंग बारणे यांनी आज लोकसभेत शुन्य काळाच्या प्रश्ना दरम्यान प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.
रावेत बंधार्याची उंची अर्धा मीटरने वाढविणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पवना नदीवरील रावेत बंधार्याची उंची अर्ध्या मीटरने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे शहराला दोन दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध होणार आहे. या कामासाठी बंधारा व मागील बाजूस 8 किलोमीटर अंतरापर्यंत नदी पात्राचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यासंदर्भात अहवाल पाटबंधारे विभागाकडे लवकरच दिला जाणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली पालिका बांधकाम करणार आहे.
बांधकाम कामगारांना आरोग्य योजनेचा लाभ
पिंपरी – महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नुकतेच बांधकाम कामगारांच्या आरोग्यासाठी सकारात्मक पाऊल टाकत नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट केल्यामुळे राज्यासह इतर राज्यातील कामगारांनाही दीड लाखापर्यंत मोफत उपचार घेता येणार आहेत याची सुरुवात आज (बुधवार) वाकड येथील अक्रोपॉलिस या साईटवर आरोग्य शिबिराचे आयोजन करून करण्यात आले.
पुणेकरांनाही ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’
पुणे – शहरातील सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधेसाठी महामेट्रोकडून प्रवाशांना कॉमन मोबेलिटी कार्ड दिले जाणार आहे. या कार्डमुळे मेट्रोसह, मेट्रो स्थानक परिसरातील “फिडर’ वाहतूक सेवांसाठी वापरता येणार आहे. त्यामुळे कोणतीही रोख रक्कम न वापरता नागरिकांना या कार्डच्या माध्यमातून सलग प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
बीआरटी’वर बस पुरविण्यास पीएमपी असमर्थ
पिंपरी- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण पाच बीआरटीएस मार्गांवर सुरु असलेली बससेवा पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी पीएमपीएमएल प्रशासनाकडे पुरेशा बस उपलब्ध नाहीत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील दोन बीआरटीएस मार्गांवर ही बससेवा सुरु करण्यास असमर्थ असल्याची धक्कादायक कबुली पीएमपीएमएल प्रशासनाने दिली आहे. अन्य मार्गांवरदेखील ही सेवा पूर्ण क्षमेतेने चालविण्यासाठी एकूण 565 अधिक बसची आवशक्यता असल्याची बाब पिंपरी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता व आळंदी बोपखेल या दोन प्रस्तावित मार्गांवर ही बस सेवा सुरु केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तीन अधिकाऱ्यांकडे स्वच्छता विषयक कामांचे पर्यवेक्षण
पिंपरी- शहर एकदम चकाचक असावे, यासाठी कमालीचे आग्रही असलेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील साफसफाईच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तीन सहाय्यक आयुक्तांवर सोपविली आहे. प्रविण आष्टीकर, चंद्रकांत इंदलकर आणि मंगेश चितळे या तीन सहाय्यक आयुक्तांनी शहरातील साफसफाईच्या कामाचे पर्यवेक्षणाचे काम करावयाचे असून, तसा अहवाल आयुक्तांना सादर करावयाचा आहे.
पिंपरी चिंचवड सीए विद्यार्थी परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद
चौफेर न्यूज – निगडी येथील दि इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या सीए विद्यार्थी परिषदेस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
Urban street design plan near Akurdi train station
Pimpri Chinchwad: The civic body will develop an urban street design project, under the smart city plan, around Akurdi railway station at an estimated.
PCMC society installs aerator taps to save water
As water scarcity looms over Pimpri-Chinchwad, a housing society in the city has decided to install aerator taps in their flats to reduce water consumption.
The committee of Bhondve Empire society, located in Ravet area of Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), has installed 200 aerator taps at 114 flats, estimating to save 10,000 litres of water every day.
महापालिका इमारत रंगीत एलईडींनी लखलखणार
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे सुशोभिकरण केले जाणार आहे. याअंतर्गत रंगीत एलईडी दिव्यांचा वापर करून रंगीबेरंगी प्रकाशयोजना केली जाणार आहे. त्याकरिता 33 लाख 40 हजार 135 रुपये खर्च येणार आहे. या खर्चाचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.
अहो आश्चर्यम … शहरात प्रथमच हिवाळी आंब्याचे दर्शन
निसर्ग नियमानुसार आंब्याचा मोहर वसंत ऋतूत येतो व होळीच्या सणानंतरच आंब्याच्या कैऱ्या पहावयास मिळतात. बदलत्या हवामानामुळे पिंपरी चिंचवडच्या नैसर्गिक वृक्ष वाढीच्या चक्रामध्ये बदल पहावयास मिळत आहे. या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाचा एक अभ्यास गट त्यामध्ये विजय मुनोत, अर्चना घाळी, संतोष चव्हाण, विजय जगताप, सतीश देशमुख, जयेंद्र मकवाना, विशाल शेवाळे, अमोल कानु, अजय घाडी, नितीन मांडवे तसेच समिती अध्यक्ष विजय पाटील हे “आपल्या शहरातील हिवाळी वृक्ष संपदा” ह्या विषयासंदर्भात निरीक्षण करीत आहेत. हे परीक्षण करीत असताना सदरचे आंब्याचे झाड निदर्शनास आले.
‘स्मार्ट’ शहरामध्ये पिंपरी-चिंचवड 41 क्रमाकांवर – आयुक्त हर्डीकर
एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी योजनेतील शहरांमध्ये देशात पिंपरी-चिंचवड 41 व्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात शहराचा तिस-या टप्प्यात समावेश झाल्यानंतरही शहराचा 41 वा क्रमांक आहे. ही चांगली बाब असून प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाल्यानंतर क्रमांकामध्ये आणखी सुधारणा होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.
अबब…शहरात 72 हजार मोकाट श्वान !
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या श्वानांच्या उपद्रवामुळे अनेक बालके, नागरिक जखमी झाल्याच्या वारंवार घटना घडत आहेत. शहरात तब्बल 72 हजार मोकाट श्वान आहेत. यावर्षी 14 हजार 907 श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
महापालिका 6 महिन्यात ‘ई-गव्हर्नंन्स’च्या दुस-या टप्प्याला सुरुवात करणार
एमपीसी न्यूज – सामाजिक मूल्य जोपासत प्रशासकीय कामकाज करीत असताना, नागरिकांना उत्तम आणि तत्पर सेवा देणे म्हणजेच सुशासन आहे. ई गव्हर्नंन्सच्या माध्यमातून सुशासनापर्यंत अधिक पोहोचता येणे शक्य असून पिंपरी चिंचवड महापालिका पुढील 6 महिन्यांच्या काळात ई-गव्हर्नंन्सच्या दुस-या टप्प्याला सुरुवात करणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
Pimpri : कचरा गोळा करण्यासाठी महापालिका आकारणार दरमहा शुल्क; ‘असे’ आकारले जाणार शुल्क
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी दरमहा 60 रुपये शुल्क आकारणार आहे. तर, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांकडूनही दरमहा 90 ते 120 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करून न दिल्यास दंड केला जाणार आहे. कचरा जाळल्यास 50 रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
महापालिकेची धूर फवारणी पद्धत बंद करावी
पिंपरी : शहरामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत की, जेथे डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात रोज होत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी महापालिका स्थानिक नगरसेवकांच्या सूचनेनुसार परिसरात धूर फवारणी करीत असते. मात्र एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशनने केलेल्या पाहणीनुसार अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे ही धूर फवारणी होय. धूर फवारणी करताना नजरेस आलेल्या गोष्टी इसिए टीम सदस्यांनी महापालिका वैद्यकीय संचालक डॉ.पवन साळवी यांच्याशी चर्चा केली. धूर फवारणी ऐवजी कीटक नाशकांची औषध फवारणी करावी, असा उपाय यावेळी महापालिका अधिकार्यांना सूचविण्यात आले.
घरकूल वाटप न केल्याने सहाय्यक आयुक्तांना सक्त ताकीद
पिंपरी : महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन प्रकल्पाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी अजंठानगर, मिलिंदनगर प्रकल्पातील घरकुलाचे वाटप अद्याप केलेले नाही, तसेच वेताळनगर पुनर्वसन प्रकल्पाबाबत तक्रारी प्रचंड वाढल्याने सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांना आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.
वरिष्ठ अधिकार्यांना अतिरिक्त पदभार देवू नका
पिंपरी चिंचवड : अतिरिक्त पदभारामुळे अनेक अधिकार्यांना एकाही विभागाचे सुरळीत कामकाज करणे कठीण झाले आहे. त्यांना नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यास वेळ देखील मिळेना झाला आहे. महानगरपालिका आस्थापनेच्या वर्ग 1 व 2 पदांवरील विविध विभागातील वरिष्ठ अधिकार्यांकडे अतिरिक्त पदभार देण्यात येवू नये.अशी मागणी विधी सभापती माधुरी कुलकर्णी यांनी केली. याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)