MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 27 April 2020
Video: हरवूया अंधाराला |#FightAgainstCorona
आमदार_महेश_किसनराव_लांडगे यांच्या संकल्पनेतून, "तू एक दिवा मी एक दिवा उजळवू आसमंताला..आहोत जिथे आहोत जसे हरवूया अंधाराला ..!" एक गीत आपणा सर्वांच्या लढाईसाठी समर्पित
कोरोनाविरोधातील लढाईत भोसरी रुग्णालयाचा मोठा सहभाग
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भोसरीतील 100 खाटांचे नवीन रुग्णालय सध्या कोरोनाचा संसर्ग झालेल्यांसाठी जीवनसाथी ठरत आहे. या रुग्णालयातून कोरोनाचे रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी रुग्णालयातील टीम कौतुकास्पद कार्य करत आहे. वायसीएमच्या बरोबरीने भोसरी रुग्णालय कोरोनाविरोधातील युद्धाचा यशस्वी मुकाबला करत दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे […]
कोरोनाच्या संकटात पोलीस आयुक्तालयाला मनुष्यबळाची कमतरता; पोलिसांची विशेष पथके बरखास्त
एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मनुष्यबळ अपुरे पडत आहे. ‘कोरोना’ बंदोबस्तासाठी पोलीस कमी पडत असल्याने विशेष पथके बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी नुकतेच याबाबतचे आदेश दिले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण 15 पोलीस स्टेशन आहेत. आयुक्तालयात सुमारे तीन हजारांचे मनुष्यबळ सध्या उपलब्ध आहे. 500 […]
तुम्ही देखील कोव्हिड वॉरिअर्स बना… पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातद्वारे करोनाविरोधातील लढ्यासाठी सरकारकडून डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले आहे. covidwarriors.gov.in असे त्याचे नाव असल्याचे ते म्हणाले. नागरिकांना त्यांच्या इच्छेनुसार आवडीनुसार करोनाविरोधील लढ्यात सहभागी होता यावे यासाठी या डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आलेली असल्याचे सांगून, देशभरातील नागरिकांना त्यांनी या डिजिटल प्लॅटफॉर्मशी जुडून देशाची सेवा करण्याचे आवाहन केले आहे.V
डॉक्टर्स, आयटी इंजिनिअर्सकडून दररोज दीड हजार भुकेल्यांना अन्नदान
बाबा जय गुरुदेव धर्म विकास संस्थेमार्फत लोकांपर्यंत पोहचवत आहेत मदत
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १५ वर्षीय मुलाला दिलं सरप्राईज; केला वाढदिवस साजरा
वडील अमेरिकेत असून त्यांनी पोलीस आयुक्त यांना मेल करून दिली होती माहिती
पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले भाजी मंडईकडे दुर्लक्ष
पिंपरी - महापालिकेच्या वतीने शहरात 46 भाजी मंडई सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले असले तरी अद्याप केवळ 19 मंडईच सुरू झाल्या आहेत. भाजीविक्रीसाठीची जागा नेहमीच्या ठिकाणाहून दूर असणे, तेथे ग्राहक येण्याबाबत विक्रेत्यांना असलेली साशंकता, उन्हात व्यवसाय केल्यास आरोग्याला उद्भवणारा धोका यासारख्या कारणांमुळे अन्य ठिकाणी मंडई सुरू झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिक हातगाडी व्यावसायिक, रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांकडून भाजी खरेदीस प्राधान्य देत आहेत.
तणावग्रस्तांसाठी समुपदेशन केंद्र
पिंपरी : कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींचे नातेवाइक व लॉकडाऊनमुळे काही नागरिकांना नैराश्य येऊ शकते. गोंधळलेली स्थिती, भीती व चिंता वाढू शकते. याबाबत माहिती व समुपदेशन अर्थात मार्गदर्शन केंद्र महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्यूत्तर संस्थेच्या मानसशास्त्र विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.
धान्य वाटपासाठी निर्धारित वेळापत्रक पण, टोकनसाठी नागरिकांनी केली गर्दी
पिंपरी : चिंचवडगाव - तानाजीनगर येथील स्वस्त धान्य दुकानाबाहेर टोकन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी रांगा लावल्या होत्या.
'रिअल पिपल'ला सलामच करायला हवा!
पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात एकीकडे कोरोना बाधित रूग्णांवर उपचार चालू असताना 'रिअल लाईफ रिअल पिपल'नेही स्वतःचे निराधार रूग्णसेवेचे कार्य अखंडितपणे सुरुच ठेवले आहे. सध्या रूग्णालयात ४ निराधार लोकांची देखभाल केली जात आहे.
लाॅकडाउनमध्ये पेट्रोल भरताय, सावधान...
पिंपरी : विनाकारण रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना चाप लावण्यासाठी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त पेट्रोल-डिझेल देणे बंद केले आहे. तरीही रिकामटेकड्यांची गर्दी रस्त्यावर दिसून येत आहे. त्यावर उपाय म्हणून पेट्रोल डीलर असोसिएशनच्यावतीने 'पीडीएपी ईसीआरएस' ऍप तयार केले आहे. या ऍपच्या माध्यमातून आता पेट्रोल भरणाऱ्यांची कुंडलीच मिळणार आहे
...म्हणून नागरिक घेताहेत गोठ्याकडे धाव
पिंपरी : शहरातील अनेक गोठे मालकांसमोर जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हिरवा चारा मिळत नसल्याने शिल्लक कडब्यावर त्यांना अवलंबून रहावे लागत आहे.
अन्नदाता सुखी भव...
पिंपरी - लॉकडाऊनमध्ये अडकलेले नागरिकांची तसेच कष्टकरी मजुरांची अन्नावाचून होणारी तगमग लक्षात घेता शहरातील विविध संस्थांच्यावतीने सकाळी व संध्याकाळी गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे. दोन वेळचे पोटभर जेवण मिळत असल्याने "अन्नदाता सुखी भव'' असा आशिर्वादही ते देतात.... (फोटो- अरुण गायकवाड)
‘सॅनिटायझेशन टनेल’मध्ये आयुर्वेदिक द्रव्यांचा वापर व्हावा
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीची मागणी
पिंपरी – “करोना’सोबत लढत असलेल्या योद्धांना सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शरीर निर्जंतुकीकरणासाठी “सॅनिटायझेशन टनेल’ची अभिनव कल्पना पुढे आली. परंतु या टनेलमधून केली जाणारी केमिकल फवारणी आरोग्यासाठी घातक ठरु शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर “सॅनिटायझेशन टनेल’मधून आयुर्वेदिक मिश्रण द्रव्यांची फवारणी केली जावी, अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने केली आहे
सायबर सेलमुळे परत मिळाले 65 लाख
पिंपरी (प्रतिनिधी) – कंपनीच्या ई-मेल आयडीमध्ये अफरातफर करून चाकण येथील एका कंपनीची तब्बल 65 लाखांची फसवणूक करण्यात आली. मात्र, पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सायबर सेलने तांत्रिक तपास करून ही सर्व रक्कम कंपनीला परत मिळवून दिली आहे.
रुग्ण वाढल्यास खासगी डॉक्टर देणार सेवा
पिंपरी (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शहरातील खासगी डॉक्टरांशी संवाद साधला. पुणे येथील विधान भवन कौन्सिल हॉलमध्ये शुक्रवारी हे चर्चासत्र पार पडले. यावेळी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील खासगी डॉक्टर उपस्थित होते. यावेळी येणाऱ्या काळामध्ये संभाव्य करोना विषाणूचे रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेता काय उपाययोजना करता येतील याबाबत सविस्तर माहिती दिली
महापालिकेची लूट करणारे मदत करण्यापासून मात्र ‘दूर’
एकाही ठेकेदाराकडून मदतीचा हात नाहीच
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून हजारो कोटींचे कामे करून शेकडो कोटींचा मलिदा लाटणारे ठेकेदार शहरावर आलेल्या संकटापासून स्वत:ला दूर ठेवत आहेत. एरव्ही कामांसाठी पालिकेत येरझाऱ्या घालणाऱ्या ठेकेदारांपैकी एकही ठेकेदार मानवतेच्या दृष्टीकोनातून गरिबांसाठी मदतीचा हात देत नसल्याचे दिसून येत आहे. ठेकेदारांच्या या करंटेपणाची चांगलीच चर्चा शहर पातळीवर रंगली आहे.
फुलविक्रेत्याची अशीही माणुसकी; अंत्यसंस्कारासाठी...
पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना आणि इतर आजाराने निधन झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना हार फुले आणि अत्यंसंस्काराचे साहित्य मिळेनासे झाले आहे. यासाठी पिंपरीतील फुलविक्रेते गणेश आहेर यांनी 'ना नफा ना तोटा' या तत्वावर हार-फुले उपलब्ध केली आहेत.
पिंपरी चिंचवडमधील रात्रीचे दिसणारे रस्त्याचे नयनरम्य दृश्य
पिंपरी चिंचवडमधील रात्रीचे दिसणारे रस्त्याचे नयनरम्य दृश्य
पिंपरी - रावेत येथील बास्केट ब्रिज, औंध-किवळे बीआरटी रोड, भोंडवे कॉर्नर, मुकाई चौक, किवळे व तेथील बीआरटी बस टर्मिनल या ठिकाणावरील हे रात्रीचे दिसणारे सौंदर्य व रस्त्याचे नयनरम्य दृश्य पहा फोटोच्या माध्यमातून (छायाचित्रे - संतोष हांडे)
पिंपरी - रावेत येथील बास्केट ब्रिज, औंध-किवळे बीआरटी रोड, भोंडवे कॉर्नर, मुकाई चौक, किवळे व तेथील बीआरटी बस टर्मिनल या ठिकाणावरील हे रात्रीचे दिसणारे सौंदर्य व रस्त्याचे नयनरम्य दृश्य पहा फोटोच्या माध्यमातून (छायाचित्रे - संतोष हांडे)
आपल्या पाळीव कुत्र्यांची काळजी घ्या पण....
पिंपरी : 'बाळाचे बोबडे बोल ज्याप्रमाणे मातेला समजतात तशी पाळीव प्राण्यांची भाषा प्राणी प्रेमींनाच समजते. मनुष्याप्रमाणेच त्यांचेही हट्ट, भावनांचा आदर, भटकंती, व्यायाम, खाणं-पिणं हे नित्यनियमाने सुरळीत होत नसल्याने राग अनावर होऊन प्राण्यांचा चिडचिडेपणा वाढला आहे.v
रात्रीच्या "सौंदर्यात नटलेलं पिंपरी-चिंचवड"
पिंपरी- आकुर्डी खंडोबा मंदिर चौक परिसर, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी व परिसर , छत्रपती शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी या ठिकाणावरील हे रात्रीचे दिसणारे सौंदर्य व रस्त्याचे नयनरम्य दृश्य पहा फोटोच्या माध्यमातून (छायाचित्रे - संतोष हांडे)v
आंबा खातोय भाव
पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फळे विक्रीसाठी चारच तासांची वेळ दिली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी आंबा खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू होती. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा 500 ते 800 रुपये डझन या दराने विकला गेला. तर, बदाम आणि लालबाग आंब्यानेही चांगलाच भाव खाल्ला.
चिंचवडगावात “अप्रतिमच कॅट कॅच’ची चर्चा
पिंपरी – मांजर हा प्राणी कितीही उंचीवरून पडला तरी तो आपल्या पायावरच उभा राहतो, हे खरे असले तरी तिसऱ्या मजल्यावरून त्यांची सुटका करताना एका पिल्लाचा घेतलल्या अप्रतिम कॅचची (झेल) चर्चा आता पिंपरी-चिंचवड शहरात चांगलीच रंगली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)